लैंगिक शिक्षणावर निबंध | Essay on Sex Education in marathi
लैंगिक शिक्षण काळाची गरज –
समाजात फोफावलेली कुप्रवृत्तीची विषवल्ली पाहता माणूस आपली सद्सद्विवेक बुद्धी गहाण टाकून २१व्या शतकाकडे करीत असलेली की खोट्या प्रतिष्ठेपायी स्वतःच्याच चुकांवर पांघरुण घालत ‘तो मी नव्हेच’ म्हणणारा लखोबा लोखंडे! असा प्रश्न उपस्थित होतो. आधुनिकतेच्या नावाखाली आपण चालविलेले पाश्चात्यांचे अंधानुकरण, दागिन्यांचा हव्यास, चढाओढ, स्पर्धा, देहप्रदर्शनात स्त्रियांची चालणारी रस्सीखेच, पैशासाठी मॉडेल्स म्हणून वावरण्याचा स्वीकारलेला मार्ग (?) त्यावर पडणारी आंबटशौकिनांची झुंबड व त्याहीपेक्षा आपल्या समाजाने जाणूनबुजून स्वीकारलेला बदल पाहता मतीच गुंग होते. घसरलेली नीतीमूल्ये, प्रसारमाध्यमांचा धुमाकूळ, अश्लील साहित्य, कामूक चित्रपट-नाट्य, दिशाभूल करणाऱ्या विविध जाहिराती, स्वार्थासाठी सर्वच क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार या साऱ्याचा मानवी जीवनावर झालेला प्रतिकूल परिणाम मानवाला अधोगतीच्या, विनाशाच्या गर्तेकडे घेऊन जातो. त्यातूनच लैंगिक विकृती, बलात्कार, कुमारी माता, आत्महत्या, खून यसारख्या अनेक समस्यांची बिजे नकळत रोवली जातात, ती उगवतात नि फोफावतातदेखील! आणि यातूनच पत्र संस्कृतीला उदारपणे आश्रय देणारी एक नवीन तरुणाईची पिढी निर्माण होते. पौगंडावस्थेत मुला-मुलींच्या नैसगिक भावनांना काबूत ठेवण्यासाठी व योग्य दिशा दाखविण्याची फार मोठी जबाबदारी पालकांवर असते. परंतु पालकच जर एकमेकांपासून दुरावल्यास मुलांचे भावविश्व उन्मळून पडते. अपरिपक्व वानको गोष्टीचा मारा होऊ लागला तर अनेक विकृती निर्माण होतात. त्याचबरोबर भरपूर पैसा ब भरपूर वेळ यासारख्या गोष्टींना जर चांगल्या विचार शक्तीची, चांगल्या कृतीची जोड नसेल तर ती माणसाला निष्क्रीयच बनवितात.
लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळेच सारे मानवी जीवन उद्ध्वस्त करून टाकणारा एक गहन प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभा आहे तो म्हणजे एडस् !…. इ. स.. १९८३ मध्ये फ्रान्सचे शास्त्रज्ञ डॉ. ल्यूक मॉटॅग्नियर यांनी सर्वप्रथम या रोगाचा विषाणु शोधण्यात यश मिळविले. त्याच सुमारास अमेरिकेच्या रॉबर्ट गले या शास्त्रज्ञालाही हा विषाणू सापडला. माणसाची सारी प्रतिकार शक्तीय संपुष्टात आणणान्या या ए आपल्या देशासह साऱ्या जगात खळबळ माजविली. १९८१मध्ये अमेरिका, १९८६मध्ये भारत व त्यानंतर महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यावरही एडस्ने केलेले अतिक्रमण ही फार चिंताजनक बाब आहे. स्त्री-पुरुषांचा स्वैर विवाहबाह्य संबंध असुरक्षित संभोग, बेजबाबदार लैगिक वर्तन, निर्जंतुकीकरण न केलेल्या सुया व सिरींज, तर काही वेळा वयात येणाऱ्या तरुण-तरुणींना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन चोरट्या शरीरसंबंधांना बळी पडावे लागल्यामुळे, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या जीवन पद्धतीमुळे एकापेक्षा अधिक पुरुषांशी संबंध आल्यामुळे व त्याहीपेक्षा काम व्यवहारासाठी सुरक्षित साधनांच्या अभावामुळे एडसूचा संसर्ग होतो.
वाढत्या वयाबरोबर निर्माण होणारे लैंगिक प्रश्न फक्त पुरुषांनाच असतात, असे नाही तर स्त्रियांच्याही बाबतीत तर ते फारच नाजूक बनतात. म्हणूनच स्त्री असो वा पुरुष त्यांना लैंगिक अवयव, त्यांची रचना, वाढ, कार्य, लैंगिक सुख, त्यातील धोके, सुखी लैंगिक जीवनासाठी आवश्यक गोष्टी हे सारे योग्य वयात व योग्य रितीने अनौपचारिकपणे शिकविले पाहिजे. लैंगिक विषयाबद्दल अजूनही आपल्याकडे म्हणावी तशी मनमोकळी चर्चा होत नाही. पालकांनी आपल्या मुलांशी या विषयावर सुसंवाद साधायला हवा. त्यांच्या चर्चा करून, त्यांचे प्रश्न, शंका सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासंबंधीचे दृकश्राव्य साहित्य उपलब्ध करून द्यायला हवे. शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाच्या अंतर्भावाबद्दल एकमत दिसून येत नाही, तर मतभेदच जाणवतात, ही दरी दूर करून विविध शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थ्याच्या वयोगटाप्रमाणे लैंगिक विषयासंबंधी मुला-मुलींना कॅसेटही तक्ते, पुस्तके याच्या सहाय्याने योग्य मार्गदर्शन करायला हवे. गावातील युवक क्रिकेट, नाट्य, अंताक्षरीसारख्या स्पर्धांबरोबरच समाज प्रबोधन करताना शिक्षणाबद्दल, लैंगिक आरोग्याबद्दल खुली चर्चा, मेळावे, तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन यातून मंडळांनीही जनजागृती, समाजप्रबोधन करणे गरजेचे आहे. महिला मंडळांमधून पाककृती, फॅन्सी ड्रेस, लैंगिक रांगोळी स्पर्धा, साड्यांचा सेल, दागिने याबाबत जशा मनमोकळ्या चर्चा होतात, तशाच त्यांनी समाजातील गरीब, अडाणी, अशिक्षित स्त्रियांमध्येही निःसंकोचपणे मिसळून त्यांच्यामध्येही लैंगिक शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायला हवे. वृत्तपत्रे, मासिके, दूरदर्शन यासारख्या प्रसार माध्यमांवर अंकुश ठेवून समाजविघातक कार्यक्रमांना तिलांजली देऊन विधायक कार्यक्रम हाती घ्यावेत, असे मला वाटते.
समाजाला लैंगिक शिक्षण देऊन समाजजागृती करण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवीत आहे. ‘हे वयच असं असतं’ या नाटकामध्येही पौगंडावस्थेतील मुला-मुलींच्या समस्येवर प्रकाश टाकला आहे. मध्यंतरी आकाशवाणीवरूनही लैंगिक शिक्षणाबद्दल मार्गदर्शन करणारा ‘उंबरठा’सारखा कार्यक्रम लोकप्रिय झाला होता. लैंगिक शिक्षणासंबंधी माहिती देणारी व मराठी विज्ञान परिषदेने प्रकाशित केलेली डॉ. अश्विनी भालेराव लिखित ‘स्त्री शरीर विज्ञान प्रश्नोत्तरी’ ही कादंबरी विशेष उल्लेखनीय म्हणता येईल. मुंबईमधील डॉ. मोहाडीकर दाम्पत्य, त्याचप्रमाणे सिंधुदुर्गचे डॉ. विवेक रेडकर यांच्या ‘आरोग्याचे पोस्टमार्टम’ या वृत्तपत्रीय सदरामधून तसेच इतर तज्ञांमार्फतही अलीकडे लैंगिक शिक्षणाबद्दल मार्गदर्शन मिळते. लैंगिक शिक्षणाच्या प्रचार व प्रसाराला ‘इंडियन पॉप्युलेशन प्रोजेक्ट-८’ या संस्थेने वाहून घेतले असून कलकत्तासारख्या झोपडपट्टीतील तरुणींनी त्याचे स्वागत केले आहे. एवढेच नव्हे तर जागतिक बँकेनेही या योजनेला अर्थसहाय्य देऊ केले आहे. ही भारतीयांच्या भावी जीवनातील सुखाची नांदी असेच म्हणावे लागेल. म्हणजेच अंतिम, चिरंतन, शाश्वत सत्य म्हणजे सुस्थिर, सुखी व आदर्श समाजासाठी, जीवनासाठी शिक्षणाची गरज अटळ आहे.
Also read:-