सार्वजनिक उत्सव निबंध मराठी | Essay On sarvajanik utsav In Marathi
प्रणम्य शिरसा देवम्
गौरीपुत्रम् विनायकम्
भक्ता वासस् स्मरेन् नित्यम्
आयुष्कामार्थ सिद्धयेत् ॥
संपूर्ण विश्वात भारत हा महान देश आहे. ही पुण्यभूमी आहे. अनेक देवतानी येथे अवतार घेतले आहेत. अनेक ऋषीमुनींनी येथे नदीतीरी व गिरीशिखरी बसून वर्षानुवर्षे तपस्या केली आहे. येथील नद्यांचे जल पवित्र आहे. स्वर्गीय नंदनवन याचे शिर आहे. रामचरणानी पावन दक्षिण सागर, याचे चरण स्पर्श करीत आहे. येथील आर्य संस्कृती विश्वाला वंदनीय आहे. त्या भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी येथील सनातन धर्मात अनेक उत्सवाची योजना केली आहे. या उत्सवांनी मानवी जीवन परिपूर्ण, आनंदमय, चैतन्ययुक्त यथार्थ बनविले आहे. सुरुवातीला या उत्सवांचे स्वरूप धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक राहिले. पुढे राजकीय व राष्ट्रीय भावना जागृतीसाठी लोकमान्य टिळकांपासून ते सार्वजनिक झाले. आता तर ते इंटरनेटद्वारे वैश्विक होऊ पाहत आहे. कारण आपला आदर्श सनातन धर्म, सर्व मानवजातीच्या कल्याणाचीच काळजी वाहण्यासाठी निर्माण झालेला आहे. हा विषय बराच व्यापक आहे. सार्वजनिक उत्सवाची आवश्यकता व सद्यःस्थिती, इतक्या मर्यादित शब्दांत सविस्तरपणे मांडणे अवघड आहे.
विशाल व उदार भारतीय संस्कृतीचे, अनंतकाळपर्यंत पारंपरिक पद्धतीने रक्षण करण्यासाठी या सार्वजनिक उत्सवांची आवश्यकता सर्वाधिक आहे. संस्कृती रक्षण करीत असताना, राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करणे, राष्ट्रभक्तीची ज्योत सतत प्रज्वलित ठेवणे यासाठीही त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. शिवाय कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक कालमानानुसार अत्याधुनिक व्यवहार्य व परिवर्तनशील कसे राहील हे पाहणे आवश्यक आहे. सार्वजनिक सामाजिक जीवनात “पारदर्शकता” सुद्धा मोलाची असते. नाहीतर भ्रष्टाचार व नैतिक मूल्यांची घसरण त्या उत्सवांचे स्वरूपच बदलून टाकील. या सर्व दृष्टिकोनातून स्वातंत्र्योत्तर पंचावन्न वर्षात बदलत जाणान्या या सार्वजनिक उत्सवांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करू या.
गणेशोत्सवांना सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी दिले. निद्रिस्त समाजात, पारतंत्र्याबद्दल चीड व स्वातंत्र्याची ज्वलंत भावना जागृत करणे हे त्याचे प्रथम उद्दिष्ट होते. त्या दृष्टीने त्यांनी कार्यक्रमांची आखणी केली. प्रखर राष्ट्रभक्तीने प्रेरित पोर पुढाऱ्यांची, समाजमन हेलावणारी भाषणे करणे, हे त्यांचे प्रथम लक्ष्य होते. नंतर करमणुकीसाठी तरुण महिला-पुरुषांचे, राष्ट्रगीत प्रधान मेळे लाऊ वृत्ती- वीरश्री निर्माण करणारे पोवाडे, कीर्तने व नाट्य प्रसंग (प्रवेश) सादर करणे, स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणारे, वक्तृत्व स्पर्धासारखे कार्यक्रम यात समाविष्ट असत. या सार्वजनिक उत्सवांसाठी लागणारे आर्थिक साहाय्य करण्यासाठी, सोज्वळ प्रामाणिक प्रयत्न होत घरोघर फिरून धार्मिक व राष्ट्रभक्तीच्या भावनेतून लोकांना आवाहन करण्यात येई. धनाचा सदुपयोग (विनियोग) निःस्वार्थ भावनेतून इष्ट कार्यासाठीच केला जाईल, याची त्या जनतेला शंभर टक्के खात्री असे. अशा कार्यक्रमाद्वारे तळमळीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची परंपराच युवकांच्या समुदायांतून निर्माण झाली व स्वातंत्र्यासाठी पूरक योग्य पार्श्वभूमी निर्माण झाली.
पण स्वातंत्र्योत्तर काळात हे स्वरूप बदलत चालले. स्वातंत्र्यासाठी बलिदान करणारे विसरले गेले. करमणुकीला प्राधान्य मिळाले. जनतेकडून वर्गणी मिळण्यासाठी खंडणी जबरदस्ती आदी अनैतिक मार्गांचा आश्रय घेतला गेला. अर्थातच त्याचा दुरुपयोग होणे क्रमप्राप्तच होते, चित्रपट संगीताचा जल्लोष, पॉप व प्रेमगीतांचा धांगडधिंगा असे कार्यक्रम ठेवले जाऊ लागले. आगमन व विसर्जन समयी मिरवणुकीमध्ये रेकॉर्ड, डान्स, अश्लील हावभावयुक्त नाच-गाणी, छक्के लोकांचे नाच यांचा समावेश झाला. या मिरवणुकीत युवक-युवतींचा भरणा असतो. या सार्वजनिक उत्सवांचे नेतृत्व, गुन्हेगारी जगत व राजकीय गुंड, तस्कर, दारूगुते प्रमुख यांच्या हाती आले. लाखो रुपयांची उधळण सुरू झाली. कार्यक्रमांना बाजारी स्वरूप येऊ लागले. मध्यमवर्गीय पांढरपेशा वर्गाने आपले अंग काढून | घेतले व अयोग्य व्यक्तींच्या हाती त्यांची सूत्रे गेली. पैसा मिळविण्यासाठी व्यापारी जाहिराती, मागच्या दाराने अधिक पैसा घेऊन गणेश दर्शन असे प्रकार चालू झाले. अशा रितीने सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप सद्य स्थितीत बदललेले दिसते.
पुढे सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. लोकांनी दुर्गा पूजेची प्रथा सुरू केली. प्रथम यात सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर असे. महिलांचा समावेश असे. पुढे यात ‘गरबा’ ही घुसवला गेला. चित्रपट नट-नट्यांना भाव मिळाला. पूर्वीचे सोज्वळ स्वरूप अंधश्रद्धा जोपासणाऱ्या कार्यक्रमांना वाव मिळाला. गणेशोत्सव व नवरात्र उत्सवात ‘ध्वनी प्रदूषण’ कमालीचे वाढले. रात्र जागवण्यासाठी जुगाराचे अड्डे सुरू झाले. राजकारणी पुढान्यांचा सहभाग वाढला. नाच, गाणी, तमाणे, चित्रपट यांचा समावेश या कार्यक्रमात होऊ लागला. सर्वसामान्य जनतेची या उत्सवांवरील श्रद्धा कमी होऊ लागली..
गेल्या पाच-सात वर्षांपासून मात्र थोडा आशेचा किरण दिसू लागला आहे. हे विघडणारे स्वरूप थोडेफार सुधारू लागले असल्याचे जाणवते. सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यात भाग घेण्यास सुरुवात केली. धार्मिक मंदिरांचे न्यास यात सहभागी होऊ लागले. नैसर्गिक आपत्तीपीडित जनतेला व प्रदेशांना या कार्यक्रम निधीमधून सहाय्य देण्याचे उपक्रम सुरू झाले. शिबिरे, स्पर्धा, संगीत कार्यक्रम, साक्षरता प्रसार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, गुणवत्ताप्राप्त व उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना आर्थिक मदत असे उपयुक्त कार्यक्रम यामुळे काही सार्वजनिक उत्सव मंडळे अधिक सकारात्मक व रचनात्मक कार्य करू लागली. या कार्यक्रमामधील अवाजवी राजकीय पुढान्यांचा हस्तक्षेप टाळला गेला व कार्यक्रम समाजाभिमुख बनविण्याचे कार्य समाजसुधारकांवर सोपवले गेले तर सार्वजनिक कार्यक्रमांचा दर्जा सुधारू शकेल, अशी आशा वाटू लागली. या दोन कार्यक्रमांव्यतिरिक्त आणखी काही उत्सवांना सार्वजनिक महत्त्व येऊ लागले आहे.
थोर राष्ट्रपुरुष वा युगपुरुषांच्या जयंत्या राष्ट्रीय व राजकीय पातळीवर सार्वजनिक स्वरूपात साजऱ्या केल्या जातात, तसेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारीसारखे राष्ट्रीय उत्सव, राष्ट्रीय एकात्मता टिकविण्याच्या दृष्टीने सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप पेतील तर तेही सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरेल. प्रगत (विकसित देशांतही सार्वज उत्सवांचे लोण पोचत आहे असे प्रसारमाध्यमांवरून दिसते. माहिती, तंत्रज्ञान व इंटरनेटच्या माध्यमातून आपले भारतीय सार्वजनिक उत्सव आता वैश्विक उत्सव बनण्याच्या मार्गावर आहेत असे दिसते.
नवयुवकांनी व शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मनात आणले तर सार्वजनिक भारतीय उत्सवांचे स्वरूप ते सुधारू शकतील. त्यांना नैतिक पाठिंबा व प्रोत्साहन ज्येष्ठ नागरिक व समाजधुरिणांनी दिले पाहिजे. या उत्सवाचे स्वरूप संपूर्ण भारतीय संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल याची काळजी घेतल्यास, भारतीय रक्षण व वर्धन करणारे हे कार्यक्रम अधिक यशस्वी होतील. भारताचे नाव पुन्हा एकदा सांस्कृतिकदृष्ट्या विश्वात उज्ज्वल होईल, अशी आशा करू या.
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ॥
Also read:-