आजच्या तरुणांपुढील मराठी निबंध | AAJCHA TRUNAPUDHIL ESSAY IN MARATHI

आजच्या तरुणांपुढील मराठी निबंध | AAJCHA TRUNAPUDHIL ESSAY IN MARATHI

लोककलांचा ऱ्हास होतोय…

“खाटकाच्या दावणीला बांधली जात आहेत सगळी तत्त्वे” दुष्काळातील निराश्रीत दोन दोरासारखे आदर्शाची सापळे मृत्यूची मोहर वागवीत शेवटचा दम काढत आहेत आणि अंधार हरिकेनच्या वेगाने पावत आहेत. लाखो वर्षाच्या उत्क्रांतीवरून हात फिरवीत आणि प्रतिमेचे अत्युच्च कळसही दिसेनासे होत आहेत. अशी ही लोककला.”

भारतीयांच्या संस्कृतीचा इतिहास म्हणजे लोककला. भारतीयांच्या जीवनाच्या मूल्यांचे अंकगणित म्हणजे ‘लोककला’ हिंदुस्थान्याच्या चारित्र्याची आणि धर्माची, जातीव्यवस्थेची अगदी तळहातावरील फोडाप्रमाणे जपवणूक करणारी आणि त्या संरक्षण देणारी संस्कृतीची आराध्यदेवता म्हणजेच ‘लोककला.’ लोककलेने भारतीयांचे जीवनमान नुसते उंचावलेच नाही तर जीवनाच्या प्रवाहाला एक योग्य दिशा देऊन तिला मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या कलेकडे आज डोळेझाक केली जात आहे. लोककला न्हास होण्यापाठीमागची प्रमुख आधार आहेत.

भारतामध्ये १९ व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या लोककलांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम केले गेले. परंतु २० व्या शतकात विज्ञानाने राक्षसी स्वरुप धारण केल्याने लोककलेला अगदी सहज गिळंकृत केले आणि त्यामुळे त्याकडे मागे वळून पाहण्यास कोणास वेळही मिळाला नाही. ही मोठी शोकांतिका आहे. १६ व्या शतकात ‘पोवाडा’ या लोककलेच्या माध्यमातून अनेक शाहिरांनी जनजागृती केली. लोकाच्या मनात राष्ट्रभक्ती ठसठसून भरण्याचे कार्य केले आणि त्यात ते यशस्वीही झाले. त्याच काळातले अनेक पोवाडे आजही मानवी मनाचा वेध घेऊन जातात. परंतु ते ऐकणारे मात्र अगदीच बोटावर मोजण्याइतकेच सापडतील. ही चिन्हे म्हणजे लोककलेला नाहिसे करणारेच नाहीत काय?

डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे हृदयाचे पाणी पाणी करणारा आहे. त्यातील ती डोंबारीन ज्या दोरीवर चालून प्रेशकांची मने हेलावत ठेवते, तिचा तो दोरीवरचा प्रवास पूर्ण होईपर्यंत हृदय धडधडतं. डोंबारीदेखील आपला जीव मुठीत धरून आपल्या सहचारिणीला प्रतिसाद देतो. त्या माध्यमातून डोंबान्याला एकच सुचवायचे की ‘स्त्री’ जातीला उभ्या आयुष्यात तारेवरची कसरत करावी लागते आणि ती करत असताना कोणी तरी एकजणच तिला साथ देणारा असतो. बाकीचे नुसते बघ्याची भूमिका घेतात. हेच ते स्त्री जागृतीचे एकमेव साधन नव्हे काय?

खेड्यापाड्यात पूर्वी गोपाळ येत असत. जे की ‘मल्ल’ असत आणि ते उंच चौकट उभी करून त्याला जाळ लावून त्यातून ते सहीसलामत बाहेर पडत असत. तीही एक लोककलाच आहे. त्यातून पुरुषांनासुद्धा अग्नीदिव्यातून बाहेर पडावे लागते अशाच हेतू असावा. कारण माणूस जगत असताना त्याला अनेक छोट्या-मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत असते आणि त्याने त्यातून त्या गोपाळाच्या मल्लाप्रमाणे अगदी सहीसलामत सुटावे हाच उदात्त हेतू त्या लोककलेच्या पाठीमागे होता.

त्यानंतर गारुडी होऊन गावाच्या चौकात आपला जादूचा खेळ करत आणि कागदाचे पैसे करून दाखवत म्हणजे जादूने पैसे तयार होतात, असे नव्हे तर त्यातून त्यांना लोकांच्या मनात ज्या अंधश्रद्धा आहेत, त्यांचे निर्मूलन करण्याचे कार्य करत त्यांच्याजवळ ज्या छोटया बाहुल्या, कवटी, वेगवेगळे साहित्य होते ते जवळ बाळगल्याने कुठल्याही प्रकारे जादू करता येत नाही किंवा भुताटकी करता येत नाही. ते केवळ एक थोतांड आहे, याचा प्रचार आणि प्रसार ते बिचारे गारुडी करत होते. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या संत-महंतांनीही भारुडे, गवळणीच्या रचना करून आणि त्यांचे एकपात्री प्रयोग करून लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे ईश्वराला पावन करून घ्यायचे असेल, तर वेगवेगळे नवससायास बोलून तो तुमच्याशी समरस होणार नाही तर त्यासाठी तुमच्या मनात ‘ईश्वर भक्ती ओलंबून वाहिलेली असली पाहिजे.

दारामध्ये एखादे वेळेस डोक्यावर मोरांच्या पिसांचा टोप त्याला पांढया गोल मिंगच्या बाहूवर खण हाताच्या पाचही बोटांना दोरीने आवळून तळहातावर टाळाचा गजर करत येतो तो ‘वासुदेव’ त्याच्याभोवती गावातील चार लेकरंही जमा झालेली असतात. आपल्या मुखातून तो म्हणतो “टिल्लम टिल्लम टाळ वाजितो मुखी हरीचे नाम गर्जतो” म्हणजे जगात ईश्वर आहे, हे सांगण्यासाठी आणि मानवात अनैतिकता पसरू नये म्हणजेच नैतिकतेचे जतन करण्यासाठी अशा वेगवेगळ्या स्वरुपात लोककला निर्माण केल्या गेल्या आणि वासुदेवाला दान दिल्याबरोबर तो घरातल्या खानदानीचा उद्धार करून दीर्घ लाभण्याचा आशीर्वादही देऊन जातो. आयुष्य

अशाप्रकारे भारतात एक ना अनेक लोककला आहेत. ज्यांनी भारतीय संस्कृतीला सुंदर, सुशील आणि चारित्र्यसंपन तर बनवतेच, त्याचबरोबर भारतीयांनादेखील, वर उल्लेख केलेल्या तर सर्वमान्य लोककला आहेत. याशिवाय भारतात अनेक जाती आहे. त्यात बलुतेदार आणि आलुतेदार यांनाच आपण आपल्या सोप्या भाषेत अठरा पगड जाती असे संबोधतो. त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या लोककला आहेत. त्या काहीशा प्रमाणात आजही जोपासल्या जात आहेत. तर काही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत.

विज्ञान युगात लोककलेचे महत्त्व कमी झाले आहे. पूर्वीची संस्कृती ही व्यवसायभिमुख होती. परंतु आता ती बदलली आहे. आज कोणताही व्यवसाय कोणीही करू लागला आहे. त्याला बंधन राहिले नाही. चांभाराची हस्तकला परंतु लोककला म्हणून उदयास आलेल्या मोटेची जागा आज विद्युत मोटारीने घेतली म्हणजेच चांभारकीच्या जीवनाचा सारच आज लोप पावत चालला आहे आणि अशा वेगवेगळ्या तऱ्हेने बहुतांश लोककला आज घडीला हास पावताना दिसू लागल्या आहेत.

पूर्वीचे मासे हे जनजागृतीचे खंदे समर्थक होते. परंतु आज त्यांची अवस्था पाहिली तर चित्रपटातील गीतांशिवाय काहीच दिसत नाही आणि शिवाय अश्लीलतेचे प्रदर्शन। करताना सर्रास दिसत आहेत, हे कशाचे द्योतक आहे. ‘धनगरांच्या’ पोंगड्यांची जागा रगीनी घेतली, सुताराच्या बाजा पांगुळगाडे आणि शेती अवजारांची जागा आधुनिक पलंग, तीनचाकी सायकल आणि ट्रॅक्टरने घेतली. कुंभाराच्या या मटकी, माठ यांना डी तांबे आणि शितपेयांनी या मातीच्या भांड्यांना मातीत गाडले. म्हणून मला शेवटी एकच म्हणायचेय

धगीवर शेकलेली कवणं त्यांची उरात पहाड़ा-पहाडावर घुमणारे आलाप ओठात मानवी स्वातंत्र्याचे शाहीर आता, डफ घुमवितात फक्त चित्रात ॥

Also Read:-