भ्रष्टाचार निबंध मराठी | Essay on Corruption in Marathi

भ्रष्टाचार निबंध मराठी | Essay on Corruption in Marathi

भ्रष्टाचार निर्मूलन : आपले कर्तव्य…

भ्रष्टाचारी क्षेत्रातील आपले कर्तव्य है एवाया अर्थाांतरित खांबाप्रमाणे डळमळू लागले आहे. आज आपण पाहिले तर देशाबद्दलचा राष्ट्राभिमान कमी झाला आहे. देश भयानक अशा परिस्थितीला अनेक संकटाना तोंड देऊन मुकाबला करीत आहे. त्यात प्रमुख संकट म्हणजे सर्व क्षेत्रात राजरोस चाललेला भ्रष्टाचार हा होय.

भ्रष्टाचार या शब्दाचा अर्थ भ्रष्ट आचार तो भ्रष्टाचार होय. पन्नास वर्षांपूर्वी एखादी व्यक्ती धर्माच्या तत्त्वानुसार वागली नाही, तर ती व्यक्ती भ्रष्टाचारी होय, असे संबोधले जात होते. या अपप्रवृत्तीमधून पैसा मिळविण्यातून भ्रष्टाचार जन्माला आला आहे. लाचलुचपत, वशिलेबाजी यांना भ्रष्टाचार म्हणून ओळखले जाते. हा सर्वत्र समाजात पसरला आहे. सार्वजनिक जीवनकाळ निर्माण झाली आहे.

भ्रष्टाचार मूळतः कशामुळे होतो तर आपल्या देशामध्ये आर्थिक विषमतेची मोठी दरी आहे. देशामधील प्रत्येक मालक वर्ग, व्यापारी, नागरिक हे कायद्याच्या पळवाटा शोधून भ्रष्टाचाराला वाट मोकळी करून देत असतात. ज्यावेळी बाजारात जीवनावश्यक वस्तूची मागणी वाढते आणि वस्तू मर्यादित किंवा पुरवठा कमी होत असेल तर भ्रष्टाचार वाढला जातो. शिवाय उत्पादक आणि राज्यकर्ते यांच्या संमतीनेच खऱ्या भ्रष्टाचारास सुरुवात होत असते. भ्रष्टाचारामुळे गुंडगिरी वाढली जाते व मुंडगिरीच्या जोरावर उमेदवार अनेक प्रकारच्या निवडणुका लढवितात. मतदानामध्ये भ्रष्टाचार करून लायकी नसलेले उमेदवार निवडून येतात आणि भ्रष्टाचार करू लागतात. सर्वत्र भ्रष्टाचार इतका खोल मुरला आहे की त्याचे निर्मूलन करणे अवघड होऊन बसले आहे.

देशांमध्ये राजकारण, समाजसेवा, भ्रष्टाचार या तीन बाबी वेगळ्या करावयास पाहिजेत. तेव्हाच भ्रष्टाचारास आळा बसेल. कमी कष्टामध्ये आणि काही भांडवल नसताना राजकारणाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन झाला आहे. उमेदवारास तिकीट मिळविण्यापासून ते आपली खुर्ची टिकविण्यापर्यंत फार पैशाची गरज भासत असते. अशा वेळी कोणी स्वतः पैसा खर्च करीत नाहीत. उदाहरण द्यावयाचे झाले तर मुंबईच्या महापौराची निवडणूक जिंकण्यासाठी कोटीत रुपये खर्च केले जातात. तेव्हा यांची झळ सर्वांनाच बसणार आहे. यामुळे खून, दरोडे, टोळीयुद्ध निर्माण होते. वेळ पडल्यास राजकीय नेत्यांची हत्या केली जाते, जर प्रत्येकाने ठरविले की भ्रष्ट उमेदवारास मत देणार नाही, तर देशांत सर्वत्र निःस्वार्थी व स्वच्छ उमेदवार निवडून येतील. प्रत्येक सामाजिक कार्यकत्याने प्रथमतः खेडेगावच्या स्तरावरून कार्य करून भ्रष्टाचाराला वाचा फोडली पाहिजे. केवळ अण्णा हजारे, शेषन हे दोघेजण भ्रष्टाचार निर्मूलन करू शकत नाहीत, तर त्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे की मी लाच देणार नाही आणि घेणार नाही. तेव्हा कुठे तरी भ्रष्टाचारास काही प्रमाणात मज्जाव होईल. खेडेगावात ७/१२ चा उतारा किंवा शेतकीची कागदपत्रे यासाठी प्रत्येक वेळी तलाठी किंवा सरकारी अधिकारी यांचेकडून काम करून घेणेसाठी त्यांचे हातावर काही ना काही पैसे ठेवावे लागतात. तसेच बसमध्ये कंडक्टर सुटे पैसे देत नाहीत. पाण्याचा नळ, टेलिफोन, लाईट मीटर कनेक्शनच्या वेळी काही प्रमाणात पैसा मागितला जातो. अशा प्रकारे जवळजवळ सर्व शासकीय नोकरदार पट्टेवाल्यापासून ते मंत्र्यापर्यंत भ्रष्टाचार करीत असतात. मग आपण थोडा केला तर काय होणार आहे, असा विचार म्हणजे भ्रष्टाचाराला साथ दिल्यासारखे होईल.

“विकास आणि निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग राहत नाही, तोपर्यंत आपली लोकशाही भक्कम होणार नाही.” देशाला स्वातंत्र्य मिळून ५५ वर्षे झाली, तरीही ते सामान्य माणसापर्यंत पोचले

नसल्याचे श्री. हजारे म्हणतात. नव्वद वर्षांपूर्वी सुरू झालेल्या स्वातंत्र्याच्या लयाला मूर्त स्वरूप यायला काही वर्षे लागली. देशासाठी फासावर गेलेल्या, बलिदान केलेल्या व तुरुंगवास भोगलेल्या लोकांची आठवण आपण ठेवणार आहोत की नाही, हा महत्त्वाचा प्रन आहे. देशात सध्या भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला असताना, गरीब व श्रीमंत यांच्यातील दरीही वाढत आहे. सामान्य माणसाला माहितीचा अधिकार मिळाला, तर भ्रष्टाचार आपोआप कमी होऊ शकेल. ‘मतदार’ हा देशाचा मालक असतो आणि लोकप्रतिनिधी व अधिकारी हे त्याचे सेवक असतात, सेवकाच्या कामाबद्दल मालक जाब विचारू शकतो; पण आता स्थिती उलटी झाली आहे. सेवक मालक झाला आहे आणि मालक गुलाम झाला आहे. ही स्थिती आपणाला बदलावयास पाहिजे. माहितीच्या अधिकाराने यात बदल होऊ शकेल. माहितीचा अधिकार मिळावा, गोपनीयतेचा कायदा रद्द व्हावा, ७३ व्या घटनादुरुस्तीप्रमाणे ग्रामसभेला अधिकार मिळावेत, सामान्य माणूस सनदी अधिकान्याला माहिती व जाब विचारू शकेल. अशी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपणाला गाव, तालुका, जिल्हा, विभाग राज्यातळीवर प्रयत्न करावे लागतील, असे अण्णा नेहमी सांगताहेत.

समाजामध्ये ज्यावेळी सामान्य लोक भ्रष्टाचार करतात, तेव्हा त्यामागचा हेतु गरज भागविणे हाच असतो, पण असहाय्यपणे केलेला भ्रष्टाचार आपण मान्य करतो. त्यांचे कारण असे असते की, जगण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे, पण आज देशात दोन नंबरचा पैसा, दोन नंबरची माणसे उजळ माथ्याने वावरताना दिसतात. त्यांना मान खाली घालावयास लावले पाहिजे. हे लोक सुख, समृद्ध, श्रीमंत अता परिवारामध्ये राहून भ्रष्टाचार करतात, त्याला देशद्रोही म्हटले पाहिजे. या देशद्रोह्यांवर वचक बसविला पाहिजे. भ्रष्टाचार हा मानवी जीवनाचा अपमान करणारा, वंचना निर्माण करणारा राक्षस आहे. विकासाच्या प्रक्रिया लागलेली कीड आहे. ती योग्य वेळी दूर केली पाहिजे. नाहीतर देशाच्या विकासाचा डोलारा कोलमडून पडेल.

महात्मा गांधी नेहमी म्हणत, चांगली माणसे पुरेशा संख्येने नाहीत. ही समस्या नसून जी आहेत, ती माणसे संघटित होत नाहीत. ही मोठी समस्या आहे. प्रत्येकाच्या मूलभूत गरजा ज्यावेळी पूर्ण होतील, त्यावेळीच भ्रष्टाचार कोणालाही करावा लागणार नाही. जिथे जिथे भ्रष्टाचार होत असेल तिथे तिथे प्रत्येकाने त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. भ्रष्टाचारी प्रकरणे अंधारातून उजेडात आणली पाहिजेत. अशा प्रकरणांचा निषेध करून वाचा फोडली पाहिजे. पैसे देणारा व घेणारा हे दोघे दोषी असतात. अशांना परावृत्त केले तरच देशात सुख, समृद्धी, भरभराट होईल असे वाटते.

देशामध्ये बिगरपरवाना लॉटरी, मटका, दारूविक्री अशा अनेक पंद्यांविरुद्ध वैयक्तिक प्रतिकार न करता संघटितपणे तक्रार केली पाहिजे. यात समाजाचे हित आहे. माणसाच्या मनावरचा नीतीचा अंकुण हरवला आहे. म्हणूनच भ्रष्टाचार घडत आहे. यास काही उपायही आहेत. त्यासाठी वरिष्ठ नेतेमंडळींनी स्वतः नीतीमान राहावे. केवळ मालकाच्या बागेतील आंबा घेतला तर हात कलम करून घ्यायला निघालेले दादोजी कोंडदेव यांचा आदर्श बाळगला पाहिजे. पेशवाईमध्ये स्वतः च्या काकांना म्हणजे राघोबा पेशव्यांना दिलेली शिक्षा योग्य म्हणणारे माधवराव पेशव्यांसारखे स्वच्छ व निःस्पृह राज्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. सरकारने गुन्हेगारांना कडक शासन केले पाहिजे. त्यावेळीच या भ्रष्टाचारी वटवृक्षाच्या फांद्या, मुळ्या नाहीशा होतील आणि आपणा सर्व भारतवासियांचे भवितव्य उज्ज्वल होईल.

Also read:-