भारतापुढील आव्हाने | Bharatapudhila avhane nibandh in marathi

भारतापुढील आव्हाने | Bharatapudhila avhane nibandh in marathi

भारतासमोर अनेक प्रश्न आहे. ते प्रश्न कोणते? याची कल्पना आपल्याला माहीत असायला हवी. भारतरूपी महान वृक्षाला दहशतवाद रूपी बावी लागली आहे. त्यामुळे भारतासारखा प्रचंड वटवृक्षसुद्धा काहीसा वाळत चालला आहे. भारताचे नंदनवन व मानाचा शिरपेच असलेले काश्मीर त्याचे निमित्त साधून काही धर्मवेडे तरुण भारताला छळत आहे. एकीकडे दहशतवादाविरुद्ध कडक कायदे करूनही ते एखाद्या मुंगीसारखे पायाखाली चिरडले जातात. या दहशतवाद्यांना पाठिंबा तरी कोण देतात? का ते स्वर्गातले देव आहे? परंतु याच देशातील धोकेबाज त्यांना मदत करतात. त्यामुळे भारताची अडकित्त्यात सुपारी सापडावी तशी गत झाली आहे. दहशतवाद हा बेशरमीच्या झाडासारखा आहे. कुठेही एखादी काही पडली तर त्याचे महा बेटात रूपांतर होऊन त्याचा दुर्गंध पसरावा. त्याप्रमाणे आतंकवाद आपले साम्राज्य हळूहळू वाढवतो. हे एक मोठे प्रश्नचिन्ह भारतासमोर आहे.

‘प्रमाणित जीवनमूल्याची पायमल्ली करणे म्हणजे भ्रष्टाचार होय.’ भारत हा सर्व जगात असा शोभून दिसतो की, आकाशात चंद्र चमकावा व त्याच्या प्रकाशात इतर देश चांदण्यासारखे फिके पडावे. परंतु काहीसे बारीक निरीक्षण केल्यास असे दिसून येते की, चंद्र भलेही शोभून दिसो, महान दिसो. परंतु त्याच्या या धवल रुपाला सुद्धा डाग पडलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे भारतरुपी चंद्राला भ्रष्टाचाराचा जणू डागच पडलेला दिसतो. राजकारण म्हणजे भ्रष्टाचाराचे माहेरघर. राजकारणरूपी स्त्री प्रसूत होऊन तिने भ्रष्टाचाररूपी मुनादा जन्म दिला आहे आणि त्या मुलाने इतक्या बायका केल्या की, आज तो सर्व क्षेत्राचा जावई झाला आहे. शिक्षण, आरोग्य, संरक्षण इत्यादी अनेक क्षेत्रात त्याचे स्वागत करण्यात आले. पैसे देऊन डॉक्टर होऊन माणसे मारतात, अभियंता झाल्यास हवेल्या पाडतात. चारही दिशात भारतात कुठेही जा, ‘पैसा फेको तमाशा देखो !’ अशी अवस्था झाली आहे. भ्रष्टाचार म्हणजे माळरानावरचे घायपात! त्याला उपटून बांधावर जरी फेकले, तरी हळूहळू आपले साम्राज्य वाढवायला सुरवात करतो. प्रत्यक्ष रक्ताचे भाऊ समोर आपल्याविरुद्ध लढत असतांनाही ज्या कर्णाने भ्रष्टाचार करून आपल्या मित्राचा पक्ष कधीच सोडला नाही, अशा प्रतिसूर्याची परंपरा भारतात आहे. त्याच देशात तहलका प्रकरणाने काजव्यासारखे शुद्र चमकावे ही खरोखर खेदाची गोष्ट आहे. भारताला लागलेल्या या डागामुळे भारतालाच शरमेने मान खाली घालावी लागते.

शंकर म्हणजे महान असा देव! या देवाने वरदान देऊन भस्मासूराचे संकट स्वतःच आपल्यामागे ओढवून घेतले. त्याचप्रमाणे भारतात लोकसंख्येचा भस्मासूर निर्माण होऊन तो भारताच्या मस्तकावर हात ठेवून भारतालाच भस्मसात करण्याचा प्रयत्न करतो आहे. भारतात लोकसंख्या वाढतच चालली आहे, पण त्यामानाने भूमी मात्र अपुरीच आहे. साहजिकच एक भाकरीच्या तुकड्यासाठी दोन कुत्र्याचे भांडण लागते. त्याचप्रमाणे भारतातील जनतेची स्थिती झाली आहे. लोकसंख्या हा प्रश्न यमदुतासारखा उभा असून तो भारताचे प्राण हरण करण्याचा प्रयत्न करत आहे.

‘यंत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः । ज्याठिकाणी स्त्रियांची पूजा होईल, त्या ठिकाणी देवता वास करेल. असे ज्या मनूने म्हटले आहे. त्याच स्वातंत्र्यमईत लहानपणी स्त्री पित्यावर, तरुणपणी पतीवर व म्हातारपणी पुत्रावर अवलंबून राहील, असे सांगितले. त्यामुळे अगदी अनादी काळापासून आजतागायत स्त्रियांची परिस्थिती बिकट आहे. अजूनही ‘वचनेषु दासी’ म्हणून स्त्रियांना दासीसारखे वागवले जाते. अजूनही ग्रामीण भागात बालविवाह, देवदासी व विधवा पुनर्विवाह बंदी या प्रथेचे पडसाद उमटत्तात. भारतातला अर्धा-अधिक भाग असा मागासलेला व शिक्षणापासून वंचित राहणे म्हणजे अगोदर झालेल्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे होईल. अजूनही मुलगा झाल्यास पेढे वाटण्यात येते व मुलगी झाल्यास तोंड वेडेवाकडे होते. मुलगा हा वंशाचा दिवा (स्वतः पुरता तरी प्रकाश पडायला हवा) व मुलगी परक्याचे दान (हुंड्याने हिरावून घेतले रान) मानले जाते. म्हणून गर्भजल तपासणी करून मुलीचा गर्भ पाडण्यात येतो. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता राहत नाही. कोणताही धार्मिक विधी स्त्रीला पतीच्या हाताला हात लावूनच करण्यात येतो. म्हणून धर्मानेही स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले नाही.

भारत हा रंगीविरंगी फुलांच्या हारांनी एखाद्या तरुण ललनेप्रमाणे विविध जाती धर्मांनी सजलेला आहे. साहजिकच एखाद्या सुंदर ललनेवर तरुण वर्गाची वाईट नजर पडावी, त्याप्रमाणे या ललनेवर काही समाजकंटकाची नजर पडून ते भारतात सामाजिक विषमता निर्माण करू पहात आहे. भारतामध्ये धर्मस्वातंत्र्य आहे, परंतु धर्माची धर्मांधता मान्य नाही. या धर्माधतेमुळेच देशात दंगली उसळतात. विनाकारण जाळपोळ होते. राष्ट्रीय ऐक्याला तडे जाऊन ते माठाप्रमाणे फुटते. भारतामध्ये धर्माधता तर आहेच, परंतु एखाद्या वटवृक्षाला पारंब्या फुटून त्या पारंब्याने आपले वेगळे झाड निर्माण करावे, त्याचप्रमाणे एकाच धर्मात असूनही हा या जातीचा, तो त्या जातीचा असे म्हणून मानवाच्या सुकुमार मनावर वाकाण सोडून मने दुखवतात आणि याचाच फायदा घेऊन विविध जातीय संघटना आपला प्रपंच चालवतात. आपले स्थान टिकवण्यासाठी आपल्या जातबांधवांना भडकवतात आणि निर्माण करतात बंद, हरताळाच्या ज्वाला! भारताचे दहन करण्यासाठी!

अज्ञानरुपी जमिनीत बेरोजगारीचे पाणी पडले की, अंधश्रद्धेचा वृक्ष उगवून बहरायला सुरवात होते. हळूहळू आपल्या शाखा पल्लवीत आपली काळी छाया देशावर पसरवतो. साधारणपणे स्त्रिया व लोभी माणसे याला जास्त बळी पडतात. गुप्तधनासाठी बालकांचा बळी देणे, अंगात आणणे इत्यादी प्रकार घडतात. त्याच्या परिणामस्तव आधुनिक वैज्ञानिक अवकाशात भारताला स्वैर भ्रमण करता येत नाही.

भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे. परंतु दक्षिण भारतातील राज्ये हिंदीला विरोध करतात. तर परकीय इंग्रजी भाषेला ते राष्ट्रभाषेचा मान देऊ पाहतात. तसेच भारतात असंख्य बोलीभाषा व राज्यभाषा आहे. प्रत्येकाला आपली भाषा प्राणाहून प्रिय वाटते. त्यामुळेच भाषावाद उदयाला येतो. प्रशासन सोईसाठी भारताचे विविध राज्यात रुपांतर करण्यात आले. परंतु सापाला दूध पाजल्यानंतरही साप उलटतोच. त्याचप्रमाणे प्रांतवाद आहे. प्रांतवाद व भाषावाद इतका जहरी आहे, की त्यामुळे भारताचे सर्वांग काळेनिळे पहले आहे. आज साऱ्या जगाला प्रदूषणाने घेरले आहे. परंतु एकेकाळचे दंडकारण्य असलेला भारत त्यावरही प्रदूषण आपली काळी नजर टाकत येत आहे. लोकसंख्या वाढीमुळे निवारा व शेतीसाठी लोकांनी वृक्षतोड करून प्रदूषणाच्या स्वागतासाठी देशाचे दालन उघडले. कारखान्यातील घाण पाण्याच्या पायघड्या पसरवून कर्कश भोंग्यांचे, गिरणीच्या आवाजाचे मंगल वाजवून प्रदूषणात बोलत आहे.

भारत हा कृषीप्रधान देश! जवळ जवळ ८०% लोक शेती करतात. भारतीय शेतकरी निसर्गाशी खेळून थकला आहे. सर्वस्वी पावसावर अवलंबून राहणे व यांत्रिकीकरणाचा अभाव यांमुळे शेती कमजोर पडली. ‘फूल ना फुलाची पाकळी कापसाची बाँडे शेतात झुलू लागती न लागती तोच नेता व्यासपीठावर येऊन बगळ्यासारखा मान हलवून भाषण करतो. बंदा कापूस दोन हजार रुपये प्रति क्विंटल. त्यावेळेस शेतकरी हवेतच तरंगतो. परंतु प्रत्यक्षात विकायला गेले तर २०० रुपयेही लवकर मिळत नाही. तेव्हा मात्र त्या हवेतून तो इतका आदळतो की, त्याचे मनोबल खंगून तो दुसऱ्या पिकाचे नाव घेत नाही. भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. परंतु या संस्कृतीची हानी होते आहे. भारतात पूर्वी ठिकठिकाणी व्यायामशाळा होत्या. आता मात्र त्यांची जागा केशकर्तनालये, सौंदर्यगृहे (ब्युटी पार्लर) यांनी घेतली. भारत हा उष्णकटिबंधीय असल्यामुळे पूर्वीचा पोशाख योग्य होता. आता मात्र नवीन पद्धत रुढ झाली. त्यामुळे इतका घट्ट पोशाख पुरुष घालतात की, काही वेळा नसा बंद पडण्याची वेळ येते. अश्मयुगात कपड्यांचा शोध लागला नव्हता. म्हणून ते अर्धनग्न राहत. आता मात्र कपडे मुबलक असूनही स्त्रियांमध्ये कमी कपडे घालण्याची इतकी स्पर्धा झाली आहे, की आताचे युग व अश्मयुग यातला फरक कळत नाही.

अशाप्रकारे विविध प्रश्नांचे काकपक्षी भारताचे एखाद्या मेलेल्या कलेवराप्रमाणे लचके तोडत आहे. भारत हा खरंच एक महान देश आहे. परंतु एखादा काळ भासणारा महान सर्पही साळुंक्या पिटाळून लावतात. त्याप्रमाणे हे प्रश्न भारताला डिवचत आहे.

Also Read:-