माझा आवडता क्रांतिकारक | Maza Avadta Krantikari Marathi Nibandh

माझा आवडता क्रांतिकारक ( समाजप्रबोधक क्रांतिसिंह नाना पाटील)

क्रांतिसिंह नाना पाटील (3 ऑगस्ट १९०० ta ६ डिसेंबर १९७६) क्रांतिसिंहाचा काळ समाज सुधारणेचा, शिक्षण प्रसाराचा, स्वातंत्र्य चळवळीचा हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत त्यांनी समाज परिवर्तनाचे महत्वपूर्ण काम केलेले आहे. यांच्या राजकीय जीवनाचा संपूर्ण वेगळा विचार करावा लागेल अर्थात काही बाबी राजकीय सामाजिक संमिश्र आहेतच..

साधारणपणे १९३० पासून त्यांच्या कार्याला सुरुवात झालेली दिसते. क्रांतिसिंह नाना पाटलांनी राजकीय कार्याबरोबर शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब यांच्या उद्धाराचा व्रतस्थ मार्ग हाती धरला. क्रांतिसिंह नाना पाटलाचे कष्टाचे अद्भुत असे रोमांचकारी जीवन नवीन उमलत्या पिढीला माहीत झाले पाहिजे. पूर्वीच्या राष्ट्राचा इतिहास पाहणे आवश्यक असते. तो वारसा आपणाला प्रेरणा देतो. क्रांतिसिंह जाऊन फार दिवस झाले नाहीत. त्यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याची सुरुवात ही सत्यशोधक पाटील येथून होते.

क्रांतिसिंह तांत्रिकदृष्ट्या फारसे शिकले नाही. पण त्याकाळात प्रचार कमीच, पण लवकरच क्रांतिसिंहाच्या अनुभवाने व समाज निरीक्षणाने एक मंत्र हाती आला. अज्ञान, अंडा, देवभोळेपणा, निरक्षरता यामुळे ग्रामीण जनता भटकली जात आहे. दुःखी आहे, अज्ञान अंधःकारात खितपत पडली आहे हे त्यांना जाणवले. गोरगरीब, कष्टकरी, कामकरी यांच्याविषयी त्यांच्या मनात अथांग करूणा मुळातच होती. ‘जसे तुका म्हणे झरा आहे मुळीचाच खरा असे दिसते की ही परिस्थिती बदलली पाहिजे. गोरगरीबाची शेतकऱ्यांची वरिष्ठ वर्गाकडून जी पिळवणूक होते. त्याविरुद्ध क्रांतिसिंह उभे राहिले! सत्यशोधक समाजाची तत्वे सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचा उपक्रम हाती घेतला.

महात्मा फुलेंच्या विचाराचा धागा क्रांतिसिंहानी पकडला. त्याद्वारे त्यांनी समाज प्रबोधनास सुरुवात केली. वास्तविक त्यांना बारशाच्या दिवशी माळ घातलेली आहे. वारकरी संप्रदायाचे संस्कार पण असे दिसते की, लोक मूर्तिपूजेमध्ये अडकले. सिंह नाना पाटील मात्र विठ्ठल भक्त व वारकरी असून त्यांनी मात्र गोरगरीब समाजाचा उद्धार ही ईश्वर भक्ती माती व पंढरीच्या पायाऐवजी तुरुंगाच्या १०-११ वाया जा त्यांनी केल्या. क्रांतिसिंहांनी शिक्षण प्रसाराला, समाज प्रबोधनाला महत्त्व दिले. शेतकन्यांची मुले शिकलीच पाहिजे, हा त्याचा आग्रह होता. त्या काळात सावकार, मिक्षुक इ. कडून गोरगरीब शेतकन्यांनी लुबाडणूक चालू आहे. हे त्यांनी ओळखले. मधुकाशिवाय धार्मिक विधी करावे असे ते सांगत व कृतीही केली. विनोदी पद्धतीने धर्मामधील फोलपणा पटवून दिला. त्यांनी विशेषतः कमी खर्चात सामुदायिक विवाह व्हावा, असे सांगितले. प कोर्ट कचेन्यांकडे जाऊ नका. मुलाबाळांच्या डोक्यावर कर्ज ठेवू नका, हे त्यांनी कळवळून सांगितले. घडविले. क्रांतिसिंहांनी लोकजागृती केली. समाजप्रबोधन केले. त्यां लग्नाच्या प्रकाराला “गांधी लग्न” असे म्हणत. गांधी लग्न एकेकाळी खूपच गाजले. नवरा नवरीला खादीचे पोषाख व म. गांधीच्या फोटोला हार असा तो प्रकार असायचा. आमच्या पोटी जन्माला आलेले बालक स्वातंत्र्याच्या कामाला येईल, अशी प्रतिज्ञा घेतली जात असे. त्यांनी शेकडो ‘गांधी लग्ने लावून दिली. १९४८ साली कुंडल गावी एक विधवा विवाह क्रांतिसिंहांनी घडवून आणला.

अंधश्रद्धा व अनिष्ट सामाजिक प्रथा या विरुद्ध नाना पाटलांनी जनजागरण केले. यातून मुक्त झाल्याखेरीज समाजाचा विकास नाही, हे त्यांनी ओळखले. अज्ञानातून, अंधश्रद्धा निर्माण झाल्या होत्या. नवससायास करणे, कोंबड्याचा बोकडाचा बळी देणे, या अनिष्ट गोष्टी आहेत, हे नाना पाटलांनी आयुष्यभर सांगितले. अंधश्रद्धा, घातकी रुडी फेकून द्या, असे ठासून सांगत. धार्मिक चालीरितींची मनातील भीती नष्ट करणे हे त्यांचे सूत्र होते. समाजातील अनिरुद्ध लोकजागृती हे त्यांचे कार्य खूपच मोठे आहे.

समाज प्रबोधनात प्रौढशिक्षणाचा प्रसार असे, व्यसनमुक्तीवर जोर असे. दारूपासून दूर रहा, हे त्यांचे आग्रहाचे सांगणे. शेतकऱ्यांच्या व्यसनावर कळवळून बोलत. व्यसन म्हणजे दैना असे ते सांगत. चहाचे सुद्धा व्यसन नको असे ते सांगतात. क्रांतिसिंहांनी अस्पृश्यता विरोधीही कार्य केले. कोणताही माणूस जन्माने मोठा किंवा लहान नाही, हे त्यांनी ठाम सांगितले. जातीभेद निवारण, अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, त्याचा त्यांना ध्यास लागला होता. नाना पाटील म्हणत अस्पृशाचा भाजीपाला खाता ते विहीर खोदतात, ते पाणी तुम्ही पिता, अस्पृश्य देऊळ व इमारत बांधतो तेथे तुम्ही जाता मग अस्पृश्यांना तुम्ही दूर का लोटता? शिवाशिवीचा हा रोग गाडून टाका. माणसासारखे त्यांना तुमच्यात घ्या, असे सभेमध्ये क्रांतिसिंह सांगतात.

मुलींना शिकवा हा क्रांतिसिंहांचा आग्रह होता. त्यांनी आपली लहान बहीण गंगू तसेच आपली पत्नी आकूबाई यांनाही शिकविले. त्यामुळे इतर मुली शिकल्या. त्यांनी स्वतःचे लग्नदेखील साधे केले. ते त्या काळात फार गाजले. म. फुल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे म्हणजे ‘बोले तैसा चाले’ ही त्यांची पद्धत. त्यांचे आचरण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ, व्यसन नाही, तत्त्वाशी तडजोड नाही. ते म्हणत आपण शुद्ध आचरण करावे मग इतरांना सांगावे. समाज प्रबोधनाचे हे सतीचे वाणच होते. हे काम सतत चालू पाहिजे, हा जगन्नाथाचा रथ आहे, असे क्रांतिसिंह म्हणत. क्रांतिसिंहाची महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात समाज प्रबोधनाची “कामगिरी अतुलनीय आहे. वास्तविक त्यांचा स्वतंत्र इतिहास आपल्या नव्या उमा पिढीपुढे आजच्या विज्ञान युगातही येणे आवश्यक आहे. कारण कॉम्युटर आला तरी सुद्धा माणुसकी, प्रेम, मानवता, त्याग, सेवाभाव, राष्ट्रीय ऐक्य ही मूल्ये जपली पाहिजेत. हे करताना नाना पाटील स्वतःची कौटुंबिक दुःखे विसरून गेले, ते जिद्दी, धाडसी होते. म्हणून समाजप्रबोधन होऊ शकले.

अशारितीने ज्ञानेश्वरांचे वैराग्य, तुकारामांची सहनशीलता, निःस्वार्थीपणा, क्रांतिसिंहांच्या रोमारोमात होता. त्याच बरोबर शिवाजी महाराजांचे क्षात्रतेज, म. फुल्यांची बंडखोरी त्यांच्या रक्तात होती. लोकसभेत मराठी बोलणारे पहिले नेते. समाज परिवर्तनाचे प्रबोधक म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील इतिहासामध्ये अजरामर आहेत.. क्रांतिसिंहांच्या प्रेरक स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!

Also read:-