सूर्य उगवला नाही तर निबंध | Surya ugavala nahi tar Essay

सूर्य उगवला नाही तर निबंध | Surya ugavala nahi tar Essay

सूर्य उगवला नाही तर…….
आकाश मंडळ पृथ्वी व्यापून
रवी करा तू बाहेर ये
अंध:कारात तीमिरादारात
प्रकाशाचा आहेर दे !


असं आपण त्या प्रकाश दात्याला विनवतो आणि खरोखरच त्याची तेजोमय आभा सारे गगन मंडळ पृथ्वी व्यापून टाकते साऱ्या चराचर सृष्टीला एक चैतन्य बहाल करते पूर्व क्षितिजावर त्या तेजोनिधी ची सोनेरी प्रभा फाकते आणि सृष्टी जागी होते त्या सोनेरी वर्षाच्या झाळाळत्या तेजाने साऱ्यांना स्फूर्ती येते उत्साह येतो आणि जो तो आपापल्या कामासाठी तयार होतो पक्षी किलबिलू लागतात मंद वारे वाहू लागते झाडे डोलू लागतात आणि सार्‍या मात्रांवर उत्साहाचे मोरपिस माणसेसुद्धा आळस झटकून कामाला लागतात आणि या प्रकाशदात्याला.


तेजोनिधी लोह गोल
भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने
झगमगले भवन आज

असे म्हणून आम्ही वंदन करतो तोच आमचा जीवन दाता उगवला नाही तर ? काय भयंकर कल्पना ! सारे सारे नष्ट होईल आज निसर्गाचे चिरंतन दिसणारे सौंदर्य मातीमोल होईल सृष्टीचे हे लोभस रुप विद्रूप तीरस्करूरणीय होईल आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मृत्यूवर ही विजय मिळवू पाहणारा मानव या सूर्यप्रकाशाच्या भावाने लुळापांगळा होईल आपल्या वैविध्याने उठून दिसणारे सारे प्राणी विकलांग होतील आणि सुजलाम-सुफलाम असणारी आमची धरती ओसाड उजाड वाळवंट बनेल आकाश एक वैराण पोकळी बनेल
सूर्य उगवला नाही तर दिवस उगवणार नाही हे तर त्या सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे पण दिवस उगवणार नाही म्हणजे काहीच उगवणार नाही आपण उठणार नाही काम करणार नाही प्राणी पक्षी जागे होणार नाहीत कोणत्याही संस्था चालणार नाहीत कोणतीही वाहने चालणार नाहीत कोणतेही कारखाने चालणार नाहीत मित्रांनो हा झाला केवळ अंधार पडल्यावरचा विचार ते पण सूर्य उगवला नाही तर केवळ अंधारच पडणार नाही आणखीही काही तरी होईल आणि आणि ते महाभयानक असेल.


सूर्य उगवला नाही तर ही सुंदर सृष्टी आता जेवढी सुंदर आहे तितकीच हिडीस विद्रूप आणि धोकादायक बनेल विषारी बनेल कारण सूर्य प्रकाश नसल्यामुळे हजारो प्रकारच्या जीवजंतूंची विषाणूची झपाट्याने वाढ होईल ही वाढ भयंकर असेल ही वाढ साऱ्या चराचराला घातक असेल त्या विषाणूमुळे माणसांना प्राण्यांना वनस्पतींना जगणं शक्य होईल आणि निसर्गाचा तोल आणि तोल तो केवळ प्राणिमात्रांवर अवलंबून आहे तो सारा कोसळून पडेल.


सूर्यप्रकाश मिळाला नाही तर झाडांची कर्बद्वीग्रहणाची क्रिया थांबेल वनस्पती स्वतःसाठी अन्न तयार करू शकणार नाहीत आणि मग त्यासाठी लागणारा हवेतला कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेणार नाहीत प्राणवायू हवेत सोडणार नाही त्यामुळे प्राणवायूची निर्मिती होणार नाही ही प्राणवायूची निर्मिती नाही म्हणजे प्राणवायू नाही म्हणजे प्राण नाही प्राण वायू नाही हे सारे असहाय्य करणारे आहे सूर्य हा सर्व ऊर्जेचे मूलस्त्रोत आहे मानवाने सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण केली सूर्यामुळे पाण्याची वाफ होऊन वाफेचे ढग बनतात व पाऊस पडतो हे सगळे पुढचे झाले पण सूर्यप्रकाश नाही म्हणजे प्राण नाही जीवन नाही हे जहाल सत्य आहे आज आपल्या अनंत हस्तान आम्हाला पुलकित आणि तेजांकित करणारा हा प्रकाश दाता जर उगवलाच नाही नव्हे एक दिवस उगवला नाही तरीसुद्धा या सृष्टीचे चे दिसणारे चित्र भयंकर असेल पृथ्वीतलावरची विषांणूव्यतिरिक्त बाकीची जीवसृष्टी म्हणजे सूर्यप्रकाशाची छाया आहे प्रकाश नसेल तर ही छाया पण राहणार नाही म्हणूनच सूर्य उगवला नाही तर हा विचार सोडून.


ज्योतिर्मय मूर्ती तुझी
ग्रह मंडळ दिव्य सभा
दाहक परी संजीवक
करण अरुण किरण प्रभा
हो जीवन विकास वसुधेची राख लाज !!
असे त्याला वनवूया

Download File

Leave a Comment