राजर्र्षी शाहू महाराज वर भाषण | Speech on Rajarshi Shahu Maharaj In Marathi

राजर्र्षी शाहू महाराज वर भाषण | Speech on Rajarshi Shahu Maharaj In Marathi

राजर्षी शाहू: सामान्यांचा कैवारी
इतिहास तू वळूणी पाहसी
पाठीमागे जरा
झुकवून मस्तक करशील
तयांना मानाचा मुजरा


आज अनेक संस्था आहेत संस्थानिकही आहेत पण खंत एकच आहे ती म्हणजे ते फक्त पैशाशी चिकटलेले आहेत माझ्या वरील काव्यपंक्ती आजच्या संस्थानिकांना लागू नाहीत आवर्जून सांगावेसे वाटते स्वातंत्र्य पूर्वीचा काळच मुळी इंग्रजी होता आणि असे असूनही कित्येक संस्थाने व त्यांचे संस्थानिक अस्तित्वात होते अनेक संस्थानिक होऊन गेले परंतु या संस्थांनीकांमध्ये मध्ये फक्त दोघांचे नाव भारताच्या अरवाचीन इतिहासात अतिशय आदरपुर्वक घेतले जाते ते म्हणजे बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड व कोल्हापूर संस्थान पती श्रीमंत शाहू महाराज.


शाहू छत्रपती हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते He was the king among men and men among the king त्यांनी संस्थानाचा कारभार पाहिला तो निरिच्छ बुद्धीने ना विष्णू पृथीवेपिती आपण फक्त एक मध्यस्थ आहोत त्रयस्थ भावनेतून कोणत्याही प्रकारच्या उपभोगाची आसक्ती मनी न बाळगता त्यांनी प्रजेच्या कल्याणाची काळजी वाहिली त्यांनी अहोरात्र आपला देह बहुजन हिताय ! बहुजन सुखाय !! या तत्वाच्या पूर्ततेसाठी खर्च केला.


तो राजा एक चतुरस्त्र राजा होता तळागाळातल्या लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते दलित समाजाचा उध्दार पक्ष शिक्षणामुळेच होऊ शकेल म्हणून मागासलेल्या विद्यार्थ्यांना ते विशेष सोयी सवलती देत हे सहन न झाल्यामुळे त्यांचे खाजगी कारभारी जे ब्राह्मण होते त्यांनी महाराजांना सूचित केले महाराज या दलित लोकांना एवढा खास सोयी-सवलती कशासाठी दयावयास हव्यात ? त्यांचं त्यांना पाहू द्या हे शब्द ऐकताच महाराज काहीही बोलले नाहीत पण त्यावेळी ते बागे जवळून फेरफटका मारीत होते आणि घोड्यांना चंदी द्यायची वेळ होती त्यांनी पागनीसाला बोलावून सांगितले स्वतंत्र चंदी न देता सर्वांना एकत्र चंदी दे पागनीसाने एका मोठ्या लाकडी भांड्यात चंदी ठेवले व सर्वच घोडी एकदम सोडली तेव्हा जी घोडी धष्टपुष्ट होती त्यांनीच सर्व चंदी फस्त केली जी रोगी व दुर्बल होती त्यांना काहीच मिळाले नाही महाराजांनी कारभाऱ्यांना दाखवून म्हटले कारभारी दलित समाजाची स्थिती ही अशीच या रोगट घोड्यांसारखी आहे इतर समाजातील लोकांना कोणती सवलत मिळ देत नाही म्हणून त्यांना आपण लक्षपूर्वक ठरवायला नको का ? आणि ही महाराजांची तोड बिनतोड होती कारभारी खजिल होण्याखेरीज काहीच करू शकत नव्हते हंड्रेड असे होते महाराज चौफेर दृष्टीचे गरिबांचा कळवळा असणारे.


अस्पृश्यता ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे आणि ती नष्ट केली पाहिजे अशी त्यांची धारणा आणि प्रयत्न देखील होते
गंगाराम कांबळे हा महाराजांचा नोकर एक दिवस त्याला तहान लागली म्हणून बागेतील तळ्यावर पाणी प्यायला हे पाहताच‌ आसपासच्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली महाराजांना ही गोष्ट कळताच फार वाईट वाटले त्यांनी त्याला बोलावून घेऊन त्याला नोकरी करण्याऐवजी स्वतंत्र धंदा करण्यास प्रवृत्त केले व मध्यस्तित हॉटेल उघडण्यास सर्व ती मदत केली पण एका अस्पृश्याच्या हॉटेलात चहाला कोण जाणार ? ही अडचण महाराजांनी ओळखली हॉटेलसमोरून राजांची टमटम जात असताना महाराजांना एकदम खोकला लागला म्हणून देण्यासाठी त्यांनी गंगारामच्या हॉटेलातले पाणी आणले मग दररोजच राजांची भेट गंगारामच्या हॉटेलला ठरली महाराज व त्यांच्या बरोबर असणारे मनसबदार दरबारी गंगारामच्या हॉटेलात चहा फराळ करू लागले म्हणून गंगारामच्या हॉटेलात इतर लोकही गर्दी करू लागले त्यामुळे हॉटेल उत्तम चालू लागले आणि थोड्याच दिवसात गंगाराम एक प्रतिष्ठित माणूस म्हणून गणला जाऊ लागला असा हा महाराजांचा अस्पृश्योदयो धारक खोकला होता.


छत्रपती शाहू राजे नुसतेच नव्हते तर एक बुद्धिमान आणि दूरदृष्टी असणारे छत्रपती होते हे सांगायलाच नको आज कोल्हापूर जिल्हा संपूर्ण हिंदुस्थानात सुजलाम-सुफलाम म्हणून प्रसिद्ध आहे ते राजामुळेच कारण छत्रपती शाहूराजांच्या काळात या भूमीत हरितक्रांतीचे बिजे रोवली गेली कोल्हापूर संस्थानातून वाहणाऱ्या भोगावती नदीवर राधानगरी येथे तलाव बांधून या भूमीला बारमाही पाण्याची सोय केली असा राजा पृथ्वीतलावर तर विरळच !
निश्चयाचा महामेरू ! बहुतांचा आधारू !
अखंड स्थितीत निधीस ! श्रीमंत योगी !
हे शब्द त्यांना बरोबर बसतात शेवटी या कोल्हापूरच्या थोर राजाला मी प्रणाम करून एवढेच म्हणेल
उगा कशाला दवडू ! माझ्या शब्दांचे बुडबुडे !
तुझे पोवाडे गातील ! पुढती तोफांचे चौघडे !.

Download File

Leave a Comment