ऊर्जेची बचत काळाची गरज | Urjeci Bacata kalaci Garaja

ऊर्जेची बचत काळाची गरज | Urjeci Bacata kalaci Garaja

ऊर्जेची बचत काळाची गरज निबंध | Urjeci Bacata kalaci Garaja Essay

‘Save Petrol, Save Money’ हे घोषवाक्य पाहिल्यावर मनात विचार येतो की, खरंच ऊर्जेची बचत ही आजच्या काळाची गरज आहे.

ऊर्जा एक शक्ती आहे. ही शक्ती वेगवेगळ्या कार्यामध्ये उपयोगी पडते. ही पारंपरिक व अपारंपरिक अशा दोन प्रकारांची असते. पारंपरिक ऊर्जा नष्ट होणारी आहे तर अपारंपरिक ऊर्जा कधीही नाश पावणार नाहीत. पारंपरिक ऊर्जेमध्ये पेट्रोल, डिझेल, खनिज तेल इत्यादींचा समावेश होतो, तर अपारंपरिक ऊर्जेमध्ये सूर्य, वारा, सागरी लाटा यांचा समावेश होतो. परंतु दुर्देवाने मानव पारंपरिक ऊर्जाचा वापर अपारंपरिक ऊर्जापेक्षा अधिक करतो. पारंपरिक ऊर्जांचा वापर अत्यंत निष्काळजीपणानं करतो.

मित्रांनो, मनुष्य हा बुद्धिमान आहे. त्याच्याएवढा किंवा त्याच्यापेक्षा अधिक बुद्धिमान कोणीही नाही. पण असे असूनही तो ऊर्जेचा अपव्यय करतो. आता काही उदाहरणं बघा, तुम्हांलाही ती पटतील. घरातील माणसे बाहेर गेली आहेत, अर्थात् घरात कोणी नाही तरीही घरातील पंखे चालूच, ट्यूबलाइटस चालू. रस्त्यातून जाताना चौकात सिग्नल लागतो तरीही गाड्या चालूच असतात. कारण नसताना पेट्रोल जळत असतं. म्हणजेच बघा, प्रत्येकानं हा अपव्यय टाळला तर होईल की नाही बचत? पण लक्षात कोण घेतो.

दिवसेंदिवस ऊर्जेची समस्या उग्ररूप धारण करत आहे. या समस्येवर उपाय नाही का? उत्तर आहे, हो. जिथे समस्या म्हणजेच प्रश्न असतात तिथे उपाय अर्थात् उत्तर हे असतंच. उत्तर माहीत असूनही जर पेपरात लिहिले नाही तर काय होईल? तसेच या ऊर्जेच्या बाबतही घडणार.

आता बघा, छोट्या-छोट्या गोष्टींत जरी सावधानता बाळगली तरीही ऊर्जा नक्कीच वाचेल. पाण्याचा नळ निरर्थक वाहात असेल तर तो बंद केला पाहिजे. जवळच जायचे असेल तर चालत गेले पाहिजे. थोडे दूर जायचे असेल तर सायकलने गेले पाहिजे. म्हणूनच सायकल फेऱ्या काढून सध्या प्रबोधन घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज पारंपरिक ऊर्जा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचसाठी आपण योग्य प्रकारे त्या ऊर्जा वापरून, जास्तीत जास्त, वाचवून बचत केली पाहिजे. नजीकच्या काळात अपारंपरिक ऊर्जांचा वापर केल्याशिवाय पर्यायच नाही. इ.स. १९६१ मध्ये जपान, अमेरिका आणि कॅनडा या देशांनी एकत्र येऊन N.E.U.S. ची स्थापना केली. या संस्थेमार्फत सौरऊर्जेवर चालणारी माफक दराची सौर ऊर्जातापके, सौरघट वितरित केली. आज आपणही ते करू शकतो. सिलिकॉन प्लेटऐवजी निरपेक्ष वायूंपासून बनवलेली, ऊर्जाग्राहक तारांपासून बनवलेली थमक्लेट प्लेटिंग ड्रायर इ. उपकरणे इ. अपारंपरिक ऊर्जेचा सुयोग्य वापर केला पाहिजे. पवनचक्कीचा वापर केला पाहिजे. त्यापासून वीज मिळेल. सूर्यशक्तीचा वापर करून आपण इंधन वाचवू शकतो. सूर्यशक्तीमुळे आपले जीवन नक्कीच सुखी होईल. म्हणूनच सूर्याला आपण मित्र समजतो.

‘सूर्यः अस्माकं मित्रमेव’ म्हणूनच पारंपरिक ऊर्जा वाचवा. अपारंपरिक ऊर्जेचा भरपूर वापर करा. वाचवाल तर वाचाल. ऊर्जा उरली तरच तुम्ही जगाल. आज ऊर्जा वाचली तरच उद्याच्या गरजा भागतील म्हणूनच मी म्हणतो,

“आज वाचवू ऊर्जा, भागवू उद्याच्या गरजा”, “करू ऊर्जा संरक्षण, वाचवू आपले पर्यावरण” अशी घोषवाक्ये केवळ म्हणून चालणार नाही, तर ती कृतीत उतरवली पाहिजेत. तर आपल्या राष्ट्रपतींनी म्हणजेच ए.पी.जी. अब्दुल कलाम यांनी २०२० सालातील भारत कसा असेल याचे चित्र रंगवले आहे, ते कारेल. ते म्हणतात, २०२० साली भारत एक महासत्ता बनेल. चला तर र. पतींचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आपणही हातभार लावू या. त्यासाठी खालील श्लोक लक्षात ठेवूया.

क्षणशोकणश्चैव ऊर्जा अपारंपरिक रक्षयेत्। ऊर्जा मागे कुतो प्रगति, पर्वक्षितेनैव

साधयेत् ।।

Leave a Comment