आजचे युवक आणि राष्ट्रीय समस्या निबंध भाषण | Today’s youth and national issues speech In marathi

आजचे युवक आणि राष्ट्रीय समस्या

माझे मागदर्शक गुरुवर्य, मान्यवर पालक, उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, त्यापेक्षाही अंगवळणी पडलेल्या शब्दांतच बोलायचे झाले तर उपस्थितीत युवकांनो, आज तुमच्यासमोर तुमच्याविषयीच मी चार शब्द सांगणार आहे. कारण स्वत:ला स्वतःमध्ये पाहणे पार अवघड काम आहे. आरसा दुसऱ्याचेच चेहरे पाहतो, त्याला सांगावं लागतं की बाबा तूसुध्दा मळाला आहेस, तुला पुसावं लागेल. तुम्हीही सर्व आरसे आहात. फक्त दुसऱ्यांचे चेहरे पाहणारे! म्हणून आज तुमच्यासमोर बोलतो आहे आपली परवानगी गृहीत धरून.

जीवनातील हेवा करण्याचा काळ म्हणजे युवावस्था. यौवनाची साथ लाभल्यामुळे आगीला वान्याचे सहचर्य तसा पेटता काळ असतो. हा अनंत आकाशाला कवेत सामावू पाहणाऱ्या दुर्दम्य आशा-आकांक्षा, महासागराच्या आचमनास प्राशू पाहणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, सूर्याला लाजविणारा अथक उत्साह, नगधिराजाचे चूर्ण करण्यास उत्सुक असेली प्रबळ कार्यशक्ती, स्वप्नांच्याही स्वप्नात न येणारे, रंगीबेरंगी भाव-भावनांचे, काव्यांचे अनंत लोटच्या-लोट यांच्या मिलाफाने तयार होते ती युवकांची प्रखर ज्वलंत मूर्ती ! परंतु या मूर्तीला शाप असतो भस्मासुराच्या अविवेकी भावनेचा ज्यामुळे ती मूर्ती छिन्न-विछिन्न होते. आशा-आकांक्षाचा चुराडा होतो. रंग चान्यावर उधळतात, उत्साहाची माती होते, सामर्थ्यांची मस्ती होते आणि आपल्याच हातांनी स्वतःचे भस्म करून होते.

आजच्या युवकाकडे पाहिले की, थोड्या फार फरकाने अशीच परिस्थिती दिसते. सर्व काही असूनही केवळ योग्य दिशेचा अभाव असल्याने सागरात भरकटलेल्या तरूसारखी त्यांची अवस्था झाली आहे. स्वतंत्र भारतात जन्म घेतलेले हे युवक ज्यांच्या खांद्यावर आज देशाची धुरा आहे, तेच आज प्रत्येक बाबतीत निराश आणि वैफल्यग्रस्त झालेले दिसतात. बोकाणलेल्या भ्रष्टाचाराच्या सावल्या आपल्याला इथंही पडलेल्या आढळतात. ज्ञानाची उपासना करण्यापेक्षा झटपट परिक्षेपुरती ज्ञान देणारी गाईडस्, कॉपीप्रमाणे पैसे देवून पास होणे इत्यादी गोष्टींचा आसरा घेऊन विद्यार्थी परीक्षेत पास होऊ पाहतो. काही वेळा वशिल्याने म्हणा त्यांना यश मिळते आणि खऱ्या हुशार युवकांना संधी न मिळता हे वशिल्याचे त अधिकार पदावर आले तरी ज्ञानाच्या अभावी व्यवस्थित काम करू शकत नाहीत. त्यामुळे राष्ट्राचे नुकसान करण्यास कारणीभूत होतात.

काही दिवसांपूर्वीच घडलेले एक उदाहरण मंत्र्याने आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या कन्येला परीक्षेत पास करण्याची खटपट केली आणि अनेक युवकांच्या मनात विचार येऊ लागले. जर असते आमचेही बाप मंत्री आणि खासदार मिळवले असते. आम्हीही फर्स्ट क्लास आणि अधिकार, इतकेच नव्हे तर काही ठिकाणी असे दृष्य दिसते की, पुढारी या युवकांचा उपयोग सत्ता मिळविण्यासाठी करतात आणि राजकारणाच्या दलदलीत हे युवक ओढळे जातात. याचाच परिणाम समाजातील गुंडगिरी वाढण्यास मदत होते. आजकाल महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचे हात गुंतले असल्याचे आपल्याला दिसते, असेच युवक जर आमच्या देशाची जबाबदारी घेणार असतील तर भविष्यात आमच्या देशात लोकशाहीला अर्थ उरेल की नाही याचा विचार करण्याची पाळी येते. भ्रष्टाचारासारखा गहन प्रश्न आज आमच्या देशासमोर उभा आहे. बोफोर्स फेअर फॅक्स सारख्या प्रकरणांपासून सामान्य कार्यालयापर्यंत या भ्रष्टाचाराचे राज्य पसरले आहे. त्यातच सरकारी लालफितीच्या कारभारावर मात करण्यासाठी मनुष्य भ्रष्टाचाराचा आसरा घेतो. भ्रष्टाचाराबरोबरच आज वशिलेबाजीमुळे नोकरींचा न सुटणारा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस बेकारीचा प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे. महाविद्यालयातून पदव्या घेऊन बाहेर पडणारे हे युवक त्यांच्या पदव्या त्यांना भाकरी देऊ शकणारी त्यांना नोकरी देऊ शकत नाहीत, युवक निराशेच्या गर्तेत कोसळत जाऊन शिक्षणाच्या बाबतीतही उदासीन होतात आणि या उदासिनतेपासून मुक्ती मिळविण्यासाठी आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे व्यसनाच्या दलदलीत रुतत जातात. कधी निराशेने ग्रस्त घेऊन तर कधी श्रील म्हणून गर्द आणि ब्राऊन शुगरच्या जीवघेण्या नशेत स्वतःला झोकून देतात आणि स्वतःचा सत्यानाश करून घेतात. पिढीच्या पिढी बरबाद होते आहे. या तरुणांना या व्यसनाचे परिणाम कळत नाहीत काय? पण तरीही संयम आणि सहनशीलतेच्या अभावी जीवनात येणाऱ्या संकटांना कर देण्याची कुवत नसल्यामुळे ते या कुमार्गाकडे वळलेले दिसतात

आजच्या या अशा युवकांकडे पाहत असताना आम्हाला प्रश्न पडतो. वयाच्या १६ व्या वर्षी दत्तोजी पंत जेध्याचे हात कलम करण्याची आज्ञा देणारा राजा शिवाजी आणि भगवद्गीतेसारख्या महान ग्रंथाचे ज्ञानेश्वरीत रुपांतर करून कर्मफलाचा सिद्धांत सामान्य जनांपर्यंत पोचवणारे ज्ञानेश्वर आमच्याच भारतभूमीत जन्माला आले होते काय? आजच्या काळात कदाचित या युवकांच्या समोर आदर्श नेता नसेल पण भूतकाळात असे कितीतरी महापुरुष होऊन गेले. ज्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून आजच्या युवकांनी वाटचाल करावी. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईसमान मानून सन्मानाने तिची पाठवणी करणारा राजा शिवाजी नीतिमत्त ठरला. आजच्या युवकांच्या नितीमत्तेच्या आणि प्रतिष्ठेच्या कल्पनाच बदललेल्या दिसतात. युवकांच्या कंपूत सिगारेट न पिणारा, बिअर व्हिस्की न घेणारा, झगमग कपडे न घालणारा तरुण म्हणजे भ्याड आणि मागासलेला समजला जातो. परिणाम म्हणून दिसते ते दृश्य असे. मावा चघळत हिंडणारी आणि सिगारेटच्या धुरात कोंदटलेली आमची तरुण पिढी च्युईंगम तोंडात घोळत मुलींच्या मागे, त्यांची टिंगल करत हिंडणारी, बऱ्याचदा तासाला दांडी मारून त्यांची पावले हॉटेलात रेंगाळतात हे चित्र फारस आशादायक नाही.

देशापुढे अनेक समस्या असताना आमची युवापिढी मात नको त्या बाबतीत पाश्चिमात्त्याचे अंधानुकरण करण्यात स्वतःला धन्य मानू लागली आहे. पाश्चात्य लोकांना सुद्धा आज आमच्या संगीताची मोहीनी पडली आहे. आमची युवापिढी मात्र कर्कश आणि हिडीस तालावर नाचू लागली आहे. यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणती ? हीच तरुण मुलं जेव्हा गणेशोत्सव कार्यक्रमातसुद्धा अंगाला हिसके देत धांगडधिंगा पालत असलेली पाहून शरमेन मान खाली घालायची पाळी आमच्यावरच काय त्या गणपतीवर सुद्धा येत असेल.

आज आमच्या देशासमोर असलेली सर्वांत मोठी समस्या म्हणजे हिंसाचार आणि राष्ट्रीय एकात्मताही होय. स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान अशी हिंदुस्थानची दोन शकले झाली आणि आजही स्खलिस्थान, दलितस्थान, गुरखालँड इ. मागण्या पुढे येऊन त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण रोजच म त्याला कोण रडं या न्यायाने युवकांनीही या प्रश्नाकडे पाठ फिरवली आहे. प्रत्येकजण आपली जात, आपली जमात, आणि आपला धर्म याच गोष्टीकडे लक्ष देऊ लागला आहे. या सर्व गोष्टीतून राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्याऐवजी प्रत्येक धर्म-जातिच्या वेगवेगळ्या संघटना निर्माण होवू लागल्या आहेत आणि यातच हिंसाचाराचा कल्म लागला आहे. आज काश्मीर, पंजाबमध्ये रोज हत्याकांड होत आहे. पण त्याचे उत्तर अजूनही आम्हाला मिळत नाही. आमचे सरकार फक्त कडक कारवाई करण्याच्या गोष्टी करते आहे आणि तरुण पिढी दिवसेंदिवस दिशाहीन होत आहे. पण तरीसुद्धा…..

रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल ।

या न्यायानुसार आजही कुठेतरी आशेचा किरण आम्हाला खुणावतो आहे. आमच्या देशाची कीती विखंडात पोहोचविणारे तरुण आजही आमच्या देशात आहेत. गावस्कर, पी. टी. उषा, आरती प्रधान, परमजितसिंग त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे आजच्या समस्यांच्या वादळात सापडलेल्या तरुणांना मार्ग दाखवेल. त्यांचाच आदर्श डोळ्यांपुढे ठेवून एकच आवाहन आजच्या युवकांना करावेसे वाटते …..

जुने जाऊ द्या मरणा लाभून
जाळूनि किंवा पुरनी टाका
आणि एकच गोष्ट लक्षात ठेवाला
प्राप्त: काल हा विशाल भूधर
सुंदर लेणी त्यावर खोदा
निजनामे त्यावरील नोंद
वसुनि का वाढविता मैदा

चला तर सज्ज व्हा आणि उभ्या असलेल्या राष्ट्रीय समस्यांना मुळातून निपटून काढण्याचा प्रयत्न करा.

Download File

Leave a Comment