सूर्य उगवला नाही तर निबंध
आकाश मंडळ, पृथ्वी व्यापून
रविकरा तू बाहेर ये,
अंध:कारात तिमिरादारात
प्रकाशाचा आहेर दे!
असं आपण त्या प्रकाशदात्याला विनवतो आणि खरोखरंच त्याची तेजोमय आभा सारे गगनमंडळ, पृथ्वी व्यापून टाकते. सान्या चराचर सृष्टीला एक चैतन्य बहाल करते. पूर्व क्षितिजावर त्या तेजो निधीची सोनेरी प्रभा फाकते आणि सृष्टी जागी होते. त्या सोनेरी वर्षाच्या झळाळत्या तेजाने साऱ्यांना स्फूर्ती येते उत्साह येतो आणि जो तो आपापल्या कामासाठी तयार होतो. पक्षी किलबिलू लागतात मंद वारे वाहू लागते. झाडे डोलू लागतात आणि साच्या मात्रांवर उत्साहाचे मोरपीस, माणसेसुद्धा आळस झटकून कामाला लागतात आणि या प्रकाशदात्याला,
तेजो निधी, लोहगोल
भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने
झगमगले भवन आज
असे म्हणून आम्ही वंदन करतो. तोच आमचा जीवनदाता उगवला नाही तर? काय भयंकर कल्पना ! सारे सारे नष्ट होईल. आज निसर्गाचे चिरंतन दिसणारे सौंदर्य मातीमोल होईल. सृष्टीचे हे लोभस रूप विद्रुप तिरस्करूरणीय होईल. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मृत्यूवरही विजय मिळवू पाहणारा मानव या सूर्यप्रकाशाच्या अभावाने लुळापांगळा होईल. आपल्या वैविध्याने उठून दिसणारे सारे प्राणी विकलांग होतील आणि सुजलाम सुफलाम असणारी आमची धरती ओसाड, उजाड वाळवंट बनेल, आकाश एक वैराण पोकळी बनेल.
सूर्य उगवला नाहीतर दिवस उगवणार नाही हे तर त्या सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. पण दिवस उगवणार नाही म्हणजे काहीच उगवणार नाही. आपण उठणार नाही, काम करणार नाही, प्राणी-पक्षी जागे होणार नाहीत. कोणत्याही संस्था चालणार नाहीत कोणतीही वाहने चालणार नाहीत. कोणतेही कारखाने चालणार नाहीत. मित्रांनो हा झाला केवळ अंधार पडल्यावरचा विचार ते पण सूर्य उगवला नाही तर केवळ अंधारच पडणार नाही. आणखीही काही तरी होईल आणि ते महाभयानक असेल.
सूर्य उगवला नाही तर ही सुंदर सृष्टी आता जेवढी सुंदर आहे तितकीच हिडीस, विद्रुप आणि धोकादायक बनेल विषारी बनेल कारण सूर्यप्रकाश नसल्यामुळे हजारो प्रकारच्या जीवजंतूची, विषाणूची झपाट्याने वाढ होईल. ही वाढ महाभयंकर असेल. ही वाढ सान्या चराचराला घातक असेल. त्या विषाणूंमुळे माणसांना प्राण्यांना वनस्पतींना जगणं अशक्य होईल आणि निसर्गाचा ताल आणि तोल जो केवळ प्राणीमात्रांवर अवलंबून आहे तो सारा कोसळून पडेल.
सूर्यप्रकाश मिळाला नाही तर झाडांची कर्बद्वीग्रहणाची क्रिया थांबेल. वनस्पती स्वत:साठी अन्न तयार करू शकणार नाहीत आणि मग त्यासाठी लागणारा हवेतला कार्बनडॉय ऑक्साईड शोषून घेणार नाहीत. प्राणवायू हवेत सोडणार नाहीत. त्यामुळे प्राणवायूची निर्मिती होणार नाही. प्राणवायूची निर्मिती नाही म्हणजे प्राणवायू नाही म्हणजे प्राण नाही प्राणवायू नाही हे सारे सारे असहाय्य करणारे आहे. सूर्य हा सर्व ऊर्जेचे मूलस्तोत्र आहे. मानवाने सूर्य प्रकाशापासून वीज निर्माण केली. सूर्यामुळे पाण्याची वाफ होऊन वाफेचे ढग बनतात व पाऊस पडतो. हे सगळे पुढचे झाले. पण सूर्यप्रकाश नाही, म्हणजे प्राण नाही, जीवन नाही हे जहाल सत्य आहे. आज आपल्या अनंत हस्तान आम्हाला पुलकित आणि तेजांकित करणारा हा प्रकाशदाता जर उगवलाच नाही नव्हे एक दिवस उगवला नाही तरीसुद्धा या सृष्टीचे दिसणारे चित्र भयंकर असेल. पृथ्वीतलावरची विषाणूव्यतिरिक्त बाकीची जीवसृष्टी म्हणजे सूर्यप्रकाशाची छाया आहे. प्रकाश नसेल तर ही छाया पण राहणार नाही. म्हणूनच सूर्य उगवला नाही तर हा विचार सोडून,
ज्योतिर्मय मूर्ती तुझी
ग्रहमंडळ दिव्यसभा
दाहक परि संजीवक करुणाऋण किरण प्रभा
हो जीवन विकास, वसुधेची राख लाज
असे त्याला विनवूया