विवासहकार नहीं उद्धार निबंध भाषण | Essay on Marriage in marathi

विवासहकार नहीं उद्धार Essay on Marriage in marathi

सामर्थ्य आहे सहकाराचे । जो जो करील तयाचे ।।
समाजाच्या उद्धाराचे । एकचि व्रत ।।

एकमेकास साहाय्य करू । अवेधेचि धरू सुपंथ

हा लोकाशाहीचा मूलमंत्र आहे. आमचा भारत देश लोकशाही तत्त्वप्रणालीचा पुरस्कार करणारा जगातील अग्रक्रमाचा देश आहे लोकशाही प्रणालीमध्ये सहकाराला फार महत्त्व आहे आणि आपल्या देशात तर सहकाराशिवाय कोणत्याही संस्थेचा किंवा व्यक्तींचा उद्धार होऊ शकत नाही ही गोष्ट सर्वश्रुतच आहे. सहकार किंवा सहकार्य हे मानवी जीवनाचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. माणसाला जितका श्वासोच्छवास महत्त्वाचा आहे तितकाच सहकार ही. कदाचित माझं हे विधान तुम्हाला अतिशयोक्तीचे वाटेल. अर्थात या विधानाचे स्पष्टीकरण मी तुम्हाला देणारच आहे. मानवी शरीरात हात, पाय, डोळे, नाक, कान, जीभ आणि मज्जासंस्था, मेंदू अन्नपचनसंस्था अशा निरनिराळ्या संस्था आहेत. यातल्या एकानं जरी दुसन्याशी सहकार्य करायचं नाकारलं तर? त्याचा हा असहकार आपले जगणे मुश्कील करेल. म्हणूनच मानवी शरीरातच श्वसनाइतका किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्वाच सहकार आहे.

शरीर संस्थेकडून आपण आता समाज संस्थेकडे वळूया. आपल्या देशात जवळचच बोलायचं झालं तर महाराष्ट्रात अशा कितीतरी संस्था आहेत की, ज्या सहकारी चळवळीतूनच उभ्या राहिल्या आणि नावारूपाला आल्या आहेत. या संस्थांनी आपल्या सहकारी प्रणालीच्या साहाय्याने अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केले आहे • माळरानावर नंदनवने फुलवली आहेत आणि ओसाड जमिनीवर स्वर्ग उतरवला आहे भुकेल्याला अन्न दिले आहे. तहानलेल्याला पाणी दिले आहे. हजारो लोकांना जन्माची मीठ भाकरी दिली आहे. सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या या संस्था आमच्या महाराष्ट्राचे भूषण ठरल्या आहेत, ठरत आहेत.

सहकारी तत्त्वावर चालवलेल्या या संस्था म्हणजे मानवी बुद्धी, शक्ती, युक्ती आणि पैसा यांची एकजूट आहे. एकात्मतेची ही शक्ती आहे कर्जाखाली चिरडल्या जाणाऱ्या व्यक्तीला दिलासा आहे. कोणतेही मोठे काम एकटा करू शकत नाही. एकाचे हजार हात झाले म्हणजे तेच काम चुटकीसरशी होतं. याचं प्रत्यंतर म्हणजे या सहकारी संस्था यांची कितीतरी उदाहरणे देता येतील.

सहकारी चळवळीचे प्रणेते सहकारमहर्षि विखे-पाटील यांनी या सहकारातूनच प्रवरानगरच्या माळावर साखर कारखान्याच्या रूपात नंदनवन फुलवलं आणि आज महाराष्ट्रात अनेक साखर कारखाने सहकारी तत्त्वांवर दिमाखाने उभे आहेत. सहकारी चळवळीला पाया घातला. आज महाराष्ट्राचीच बात कशाला आमच्या इचलकरंजीला जगाच्या नकाशावर ठळकपणा ले काम दि डेक्कन कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल, आयको स्पीनिंग मिल, पंचगंगा सहकारी साखर कारखाना इ. संस्थांनी या सहकारी तत्त्वातूनच करून दाखवले आहे.

या सहकारी चळवळीतून व्यक्तीची, समाजाची, राष्ट्राची आणि पर्यायाने देशाची प्रगती होते. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, ‘विद्वान आणि धनिक माणसं मोठं-मोठी कामं तडीस नेतात; परंतु कमी शिकलेली सामान्य माणसंसुद्धा तितकंच मोठं काम करू शकतात. पण त्यासाठी श्रमाची अन् सहकार्याची गरज आहे.’ किती सार्थ उद्गार आहेत हे !

आमच्या भारताला स्वतंत्र्य मिळालं ते कुणी मिळवून दिलं? म. गांधी, पं. नेहरू, लोकमान्य टिळक, सावरकर यांनी? नाही, ते मिळवलं सहकार्याच्या शक्तींनं, एकजुटीच्या शक्तींन. गांधी, टिळकांनी स्वातंत्र्याची हाक दिली आणि लाखो भारतवासीयांनी ती उचलून धरली. त्यांच हे सहकार्य स्वातंत्र्यापेक्षाही मोठं आहे.

सहकारी चळवळींनी समाजाचा, राष्ट्राचा तर उद्धार केलाच. पण त्याचबरोबर सहकारी चळवळीला बदनाम करणारी काही कामे सहकारानं केली जातात. दुर्दैवाची गोष्ट अशी की, आज प्रत्येक ठिकाणी बोकाळलेला भ्रष्टाचार हा सहकारी तत्त्वावरच केला जातो. हे लांच्छनास्पद आहे. भ्रष्टाचार करण्यात तळातील कर्मचाऱ्यांपासून वरच्या अधिकारीवर्गापर्यंत सर्वांचा सहकार असतो आणि सहकाराच्या इतक्या उच्च पातळीवरून हा भ्रष्टाचार केला जातो की, सहकारी तत्त्वालासुद्धा चकित होण्याची पाळी यावी. सहकारी चळवळीला भ्रष्टाचार ही एक वाळवी लागली आहे आणि अशी भीती वाटते की, ही वाळवी संपूर्ण सहकारी चळवळ तर सहकाराने खाणार नाही ना? तेव्हा सहकारी चळवळीला लागलेली ही भ्रष्टाचारांची वाळवी सहकारानेच निपटून काढणे आवश्यकक आहे. आज आपल्यासमोर सहकाराने करण्यात येणारा आणखी एक ज्वलंत प्रश्न म्हणजे सासू, नवरा, नणंद यांनी सहकाराने सुनेला जाळणे अथवा छळणे. या सहकाराविरुद्ध अक्षरश: असहकारच पुकारला पाहिजे. नाहीतर या सहकाराने आणखी किती हुंडाबळी घेतील त्याची कल्पना करवत नाही.

सहकाराचा एक असाही महिमा आपल्याला पाहायला मिळतो तो ‘बंद’च्या रूपात एखाद्या घटनेच्या व्यक्तीच्या विरोधात जेव्हा सहकार्याने बंद पाळला जातो. तेव्हा तो खरोखरच ‘आदर्श बंद’ होतो. याचे उदाहरण म्हणजे ३ जुलै ८९ चा बंद, याच बंदच्या हत्याराने सहकारी चळवळीतला हा भ्रष्टाचारही बंद करता येईल असे मला वाटते. वैयक्तिक पातळीवर तर काही सन्माननीय अपवाद वगळता या सहकारातून खरोखरच अनेकांचे, एकाच पिढीचे काय सात-सात पिढ्यांचेही उद्धार झाले आहेत आणि सहकारी संस्था या त्यांच्या दृष्टीने सहकाराने चरायचे कुरण ठरल्या आहे, ठरत आहेत ही प्रवृत्ती बदलली पाहिजे. प्रगतीचा स्वर्ग गाठण्यासाठी सहकारी चळवळ हा सोपान आहे. तो निष्कलंक राहिला पाहिजे तर प्रगतीचे शिखर आपल्याला गाठता येईल. त्यासाठी प्रत्येकाने एकमेकाला म्हटले पाहिजे.

साथी हाथ बढाना। साथी हाथ बढ़ाना।
एक अकेला थक जायेगा। मिलकर जोर लगाना।
साथी हाथ बढ़ाना। साथी हाथ बढ़ाना।

Download File

Leave a Comment