समुद्र माझा सोबती
समंदर-समंदर यहाँ से वहाँ तक
यह मौजोंकी चादर बिछी आसमाँ तक
असं समुद्राचं वर्णन केलं जातं. पृथ्वीवर आणि या विज्ञानाच्या जगात परमेश्वराचे अस्तित्व दाखविणारे एकमेव तेज म्हणजे समुद्र यामध्ये एवढे पाणी कुठून आले? ते कधीच कमी कसे होत नाही? त्यात एवढे मीठ कसे ? आणि त्यातून लक्षावधी लाटा उठतात कशा ? यातल्या एकाचंही उत्तर मानवाला देता आलेलं नाही.
बिंदू मात्र मी शुद्र खरोखर
परी जिंकले सातही सागर
हे जरी खरे असले तरी त्या सागराचा संपूर्ण ठाव घेणे मानवाला अजून जमलेले नाही. हे त्या सागराइतकेच भव्य सत्य आहे. पृथ्वीवर असलेले ३/४ पाणी म्हणजे पृथ्वीवरची ३/४ जमीन ही समुद्राच्या पाण्याने व्यापली आहे आणि पृथ्वीवरची लोकसंख्या वाढली तरी पाण्याखालचा भाग वस्तीसाठी आपल्याला मिळणार नाही हे कटू सत्य आहे.
ज्या पंचमहातेजांना आपण दैवते मानतो. हे निसर्गाचे सभासद देवी शक्तीचे प्रतिनिधी, त्यातीलच एक समुद्र, ही पंचमहातेज जशी आम्हाला जगण्याला मदत करतात. त्यात समुद्राचाही सिंहाचा वाटा आहे. पृथ्वीवर असलेले एवढे विशाल अथांग पाणी पाहून प्रथम मानव घाबरला असेल. मग त्याच्या बुद्धिमतेच्या जोरावर त्याने सागराशी मैत्री केली असेल आणि मग
मी डोलकर डोलकर डोलकर दयांचा राजा
भर पाण्यामधी वंदराला करतो ये जा
असा विजय त्याने समुद्रावर मिळविला असेल पण पृथ्वीच्या वाढत्या लोकसंख्येला खनिज संपत्तीच्या होणाऱ्या न्हासाला हा समुद्र पुरेसा पडू शकेल काय? आमचे शास्त्र याच शोधात आहेत कारण मानवाच्या ३/४ गरजा भागवणारी संपत्ती, साधनसंपत्ती, खनिज संपत्ती या समुद्रात आहे. त्या सर्वांचा आपण विचार करू. मित्रांनो समुद्र म्हटलं की, पाहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते अथांग निळं पाणी. अर्थात पिण्यासाठी हे पाणी
अयोग्य आहे.
“साथ मेरी दर्या हेरे
फिर भी मन है प्यासा”
ही दर्यावरील मुसाफिरांची अवस्था असते. तरीही आजचे पावसाचे अत्यल्प प्रमाण, कोरड्या नद्या विहिरी दूषित कुपनलिका आणि बेसुमार जंगलतोड पाहिल्यानंतर या खऱ्या पाण्याचा उपयोग प्रक्रियेनंतर पिण्यासाठी येईल. ते मानवाने शोधले आहे. अर्थात अजूनही वरुणराजावरचा त्याचा विश्वास ढळलेला नाही. या पुण्यपावन भारतभूमीला तो आपल्या कोपाने नष्ट करणार नाही. याचा दिलासा परवापासूनच मानवाला मिळत आहे. पण लोकसंख्येचा वाढता भस्मासूर पाहिल्यानंतर पिण्याच्या पाण्याला पर्याय म्हणून समुद्राचे पाणी ठरू शकेल जे अनंत आहे, अथांग आहे आणि अंतिम आहे.
समुद्राचे दुसरे वरदान आहे मासे. मासे हे भारतातील ३/५ लोकांचे अन्न आहे. शेती तोडून उभारतले कॉंक्रिटचे जंगल आणि आणि पावसाचा अनियमितपणा पाहिल्यानंतर शेतीवर अवलंबून असणारा आमचा तथाकथित शेतीप्रधान देश उपासमारीला बळी पडेल, अशी भीती वाटते आणि त्या वेळी आपल्याला तारणार आहे. हा दर्यासारंग
“आम्ही पाण्यातून, रापण टाकतो जाली
धन दर्याचं लुटून भरता डाली”
असे म्हणत हे अमर्याद मत्स्यालय आम्हाला अन्न मिळवून देईल.
गरीब असणाऱ्या पण विकसनशील म्हणणाऱ्या आमच्या राष्ट्राला अमाप संपत्ती आणि विपूल परकीय चलन मिळवून देणारा हा रत्नाकर म्हणजे आमच्या भारताची कधीही दिवाळे न काढणारी बँक आहे. एकच काय, असे हजारो हर्षद मेहता आले तरी या बँकेचे दिवाळे कधीही निघणार नाही. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. समुद्रातील मोती, पोवळे, रत्ने, माणके आणि इतर काही मौल्यवान साधनांनी भारताच्या खजिन्यात नेहमीच भर घातली आहे. गरीब भारताला ही रत्नाकर म्हणजे आधारशील आहे. भारताच्या गरिबीला एक पर्याय आहे. विज्ञान युगाचे एक मोठे वरदान म्हणजे पेट्रोलियम आणि हे पेट्रोलियम देणारा दाता म्हणजे समुद्र आज जगात पेट्रोलियम हा गतीचा विपुल मागणी आहे. गतिमान जगामध्ये पेट्रोलियम हा गतीचा आणि प्रगतीचा दीपस्तंभ आहे. जगातील बहुतेक सर्व राष्ट्र ही पेट्रोलियम पदार्थांसाठी अरब राष्ट्रांवर अवलंबून आहेत. त्यातून योग्य मार्गानि योग्य प्रकारे काढलेले पेट्रोलियम है। भारताला पेट्रोल, रॉकेल कडाईल या खनिज पदार्थांबाबतीत स्वावलंबी बनवू शकते. इतकेच नव्हे तर तन्हे-तऱ्हेची औषधे व कारखान्यांना लागणारा कच्चा मालही या पेट्रोलियमपासून बनविता येतो. प्लास्टिक, कॉस्टीसीन, व्हॅसलिन, जेली इ. पासून नवीन उद्योजकतेला वाव मिळतो. भारताला लाभलेले हे वरदान
अनंत हस्ते कमला वराने
देता किती घेशील दो कराने
अशी या साधन साम्रगीचा वर्षाव भारतावर करेल. पण सध्या मात्र भारताची स्थिती
देणाऱ्याचे हात हजारो
दुबळी माझी झोळी रे
अशी झाली आहे. समुद्रातून मिळणारी ही अगणित व विविध संपत्ती मानवी जीवनातील कमतरतेला पूर्णच होऊ शकेल. मत्स्य, शेती, वीजनिर्मिती, समुद्र, शेती, औषधे, रसायने इ. नवीन संशोधनांमुळे तर समुद्र म्हणजे हर एक अडचणीवरील रामबाण उपाय ठरतो आहे. वाणवा आहे त्याची योग्यता ओळखण्याची वाणवा आहे. त्याचा योग्य वापर करण्याची. घरकुलाचे स्वप्न पाहाणाच्या मानवाला सिमेंटच्या ऐवजी समुद्राची वाळू वापरता येईल. त्याबदलचे संशोधनही सुरू आहे. मग मात्र खरोखरच वाळूची इमारत, वाळूचा बंगला म्हणून प्रत्यक्षात उतरेल. रंग-रसायन याबरोबरच सजावटीच्या विविध वस्तू यात मिळणारे परकीय चलन भारताचे कर्ज कमी करण्याला कारणीभूत ठरेल. संस्कृती, संपत्ती आणि सौंदर्य म्हणून उपभोगात येणारे, परंपरेचा पाईक, इतिहासाचा साक्षीदार, संस्कृतीचा रक्षक आणि कुबेराचा प्रतिनिधी असणारा हा समुद्र मानवाच्या जीवनातील प्रत्येक गरजेचा पर्याय होऊ शकेल आणि तो तो दिवस फार दूर नाही कारण
यागो दर्याचा दरारा मोठा
याच्या पोटामधी लपलाय सुखाचा साठा।