मी पंतप्रधाव झालो तर निबंध भाषण | Essay on If I became Prime Minister In M arathi

Essay on If I became Prime Minister In M arathi

खेल खिलाडिकां एक हल्का
तमाशा है जिंदगी
व्यथित हो परास्त हो
फिर भी आशा है जिंदगी।

मानवाच्या जीवनात आशा आहे, तोपर्यंत मानवाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे आणि स्वप्न म्हणजे

सपनोंके गाँव नहीं, सपनों के नाम नहीं
सपनोंके घोडोपर किसी का लगाम नहीं

अशी स्वप्नांची ही दुनिया आणि या दुनियेत मुक्त संचार करतो मानव झोपेत असताना.
त्या दिवशी टी. व्ही. वर पंतप्रधानांचा शपथविधी आणि मला रात्री स्वप्न पडले मी पंतप्रधान झालो तर……
खरंच! खरंच मी पंतप्रधान झालो तर! किती मज्जा येईल नाही? मग रोज विमान प्रवास, मग रोज परदेश दौरा, रोज एका देशाला भेट, वा वा सारे जग मला पाहता येईल आणि तेसुद्धा एका वेगळ्या थाटात, अत्यंत रुबाबात अर्थात या विमान प्रवासाबरोबरच माझ्यावर फार मोठ्या जबाबदन्याही पडतील नाही का? देशात आज सगळीकडे समस्याच समस्या आहेत. बेकारी, महागाई, व्यसने, बापरे बाप! किती या समस्या ? पण मी पंतप्रधान झालो तर सगळे एका मिनिटात सोडवून टाकीन. कशा सांगूच ? ऐकाच तर माझ्या योजना समस्या असेल बेकारीची त्यासाठी मी सर्व जणांना नोकरी देईन. नोकरीसाठीचे सारे नियम, अटी काढून टाकल्यावर सगळ्यांना नोकऱ्याच नोकऱ्या उगीच कुणी अमक्या जातीचा म्हणून नोकरी नाही, कुणी अमक्या वयाचा म्हणून नोकरी नाही, कुणाकडे विशिष्ट शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही, तर कुणाकडे वशिल्याची चिठ्ठी नाही म्हणून नोकरी नाही. या साच्या अटी मी रद्द करीन आणि देशातील नोकरीची समस्या दूर करीन.

दुसरी समस्या महागाई. सगळ्यांना नोकरी लागल्यावर महागाई आपोआपच कमी कमी होईल. कारण लोकांकडे पैसे नसतात. म्हणून साठेबाज वस्तूंचा साठा करतात सगळीकडचे कर मी कमी करीन व साठेबाजावर कर बसवीन म्हणजे वाहतूकदारांचा संप होणारच नाही आणि महागाई वाढणार नाही. गरिबांना परवडेल असे सगळेच दर असतील. ४ पैसे मिळवणारा गरीबदेखील सुखाने भाजी-भाकरी खाईल. महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा मिळेल आणि…

किसीको रोटी की कमाई मार गयी।
कपडे की किसीको सिलाई मार गयी।
किसी को मकान की बनवाई मार गयी।
महँगाई हाय महँगाई, महँगाई हाय महँगाई।

अशी हाय-हाय करावी लागणार नाही. माझ्या बेकारी नष्ट करण्यामुळे व्यसनग्रस्त तरुणांना दिलासा
मिळेल आणि देशातील व्यसनाचे प्रमाण नाहीसे होईल. हरित क्रांतीचे स्वप्न मी प्रत्यक्षात उतरवीन आणि मग पावसाची वाट पाहावी लागणार नाही.
आम्ही जरी

“हिंद देश के निवासी सभी जन एक हैं,
रंग-रूप, वेश-भाषा चाहे अनेक हैं।

असे गात असलो तरी आमच्या प्रत्येकाच्या मनात एक धार्मिक व जातीय संघर्ष खदखदतो आहे. परिणाम म्हणजे रामजन्मभूमी बाबरी मस्जिद, खलिस्तान, काश्मीर, L.T.T.E. यासारख्या समस्या ह्या जाती प्रांतीय, धार्मिक संघर्ष टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आमच्या भारत देशाला हिंदुस्तान असे मानणे आणि सार्वभौम राष्ट्र आहे, असे मानणे. यातून हिंदूची एकता व अखंडता कायम असेल असाही दृष्टिकोन मी देवीन अर्थात हे करीत असताना मला अनेकांची मने दुखवावी लागतील आणि मग त्यातून कुणी तरी मला बांब रायफलने,….

अरे बापरे! नको रे बाबा ते पंतप्रधानपद आणि नको ते शहीद होणे.

जन सलामत तो सपने पचास

मी बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाने दचकून जागी झाले तर बाहेर माझा भाऊ फटाके उडवीत होता….

Also read

समुद्र माझा सोबती निबंध मराठी

सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी

Download File

Leave a Comment