rajarshi shahu maharaj राजर्षि शाहू: सामान्यांचा कैवारी
इतिहास तू बळूनी पाहसी
पाठीमागे जरा
झुकवून मस्तक करशील
तयांना मानाचा मुजरा!
उपस्थित गुरुजन, सूज्ञ परीक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो, खरंच आपण खूप नशीबवान आहोत. कारण स्वातंत्र्यात जगतो आहोत! आज अनेक संस्था आहेत, संस्थानिकही आहेत. पण खत एकच आहे ती म्हणजे ते फक्त पैशाशी चिकटलेले आहेत. माझ्या वरील काव्यपंक्ती आजच्या संस्थानिकांना लागू नाहीत, हे इथे आवर्जून सांगावेसे वाटते. स्वातंत्र्यापूर्वीचा काळच मुळी इंग्रजी होता आणि असे असूनही कित्येक संस्थाने व त्यांचे संस्थानिक अस्तित्वात होते. अनेक संस्थानिक हाऊन गेले; परंतु या संस्थानिकांमध्ये फक्त दोघांचे नाव भारताच्या अर्वाचीन इतिहासात अतिशय आदरपूर्वक घेतले जाते. ते म्हणजे बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड व कोल्हापूर संस्थान पती श्रीमंत शाहू महाराज.
शाहू छत्रपती हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते. He was the king among men and man among the king त्यांनी संस्थानाचा कारभार पाहिला तो निरिच्छ बुद्धीने, ना विष्णू पृथिवेपिति आपण फक्त एक मध्यस्थ आहोत. त्रयस्थ भावनेतून कोणत्याही प्रकारच्या उपभोगाची आसक्ती मनीन बाळगता त्यांनी प्रजेच्या कल्याणाची काळजी वाहिली. त्यांनी अहोरात्र आपला देह बहुजन हिताय बहुजन सुखाया। या तत्त्वाच्या पूर्ततेसाठी खर्च केला.
शाहूराजा हा एक चतुरस्त्र राजा होता. तळागाळातल्या लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. दलित समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामुळेच होऊ शकेल. म्हणून मागासलेल्या विद्यार्थ्यांना ते विशेष सोयी-सवलती देत. हे सहन न झाल्यामुळे त्यांचे खाजगी कारभारी जे ब्राह्मण होते त्यांनी महाराजांना सूचित केले, महाराज या दलित लोकांना एवढ्या खास सोयी-सवलती कशासाठी दयावयास हव्यात? त्यांचे त्यांना पाहू द्या हे शब्द ऐकताच महाराज काहीही बोलले नाहीत. पण त्या वेळी ते बागेजवळून फेरफटका मारीत होते आणि घोड्यांना चंदी द्यायची वेळ होती. त्यांनी पागनिसाला बोलावून सांगितले, स्वतंत्र चंदी न देता सर्वांना एकत्रच चंदी दे. पागनिसाने एका मोठ्या लाकडी भांड्यात चंदी ठेवली व सर्वच घोडी एकदम सोडली. तेव्हा जी घोडी धष्टपुष्ट होती त्यांनीच सर्व बंदी फ केली. जी रोगी व दुर्बल होती त्यांना काहीच मिळाले नाही. महाराजांनी कारभान्यांना दाखवून म्हटले, ‘कारभारी दलित समाजाची स्थितीही अशीच या रोगट घोड्यांसारखी आहे. इतर समाजातील लोक त्यांना कोणतीच सवलत मिळू देत नाहीत म्हणून त्यांना आपण लक्षपूर्वक भरवायला नको का? आणि ही महाराजांची तोड बिनतोड होती. कारभारी खजिल होण्याखेरीज काहीच करू शकत नव्हते. असे होते महाराज चौफेर दृष्टीचे, गरिबांचा कळवळा असणारे.’
अस्पृश्यता ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे आणि ती नष्ट केली पाहिजे, अशी त्यांची धारणा आणि प्रयत्नदेखील होते.
गंगाराम कांबळे हा महाराजांचा नोकर एक दिवस त्याला तहान लागली म्हणून बागेतील नळावर पाणी प्यायला. हे पाहताच आसपासच्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. महाराजांना ही गोष्ट कळताच त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी त्याला बोलावून घेऊन त्याला नोकरी करण्याऐवजी स्वतंत्र धंदा करण्यास प्रवृत्त केले व मध्यस्तीत हॉटेल उघडण्यास सर्व ती मदत केली. पण एका अस्पृश्याच्या हॉटेलात चहाला कोण जाणार? ही अडचण महाराजांनी ओळखली. हॉटेलसमोरून राजांची टमटम जात असताना महाराजांना एकदम खोकला लागला म्हणून पिण्यासाठी त्यांनी गंगारामच्या हॉटेलातले पाणी आणले मग दररोजच राजांची भेट गंगारामच्या हॉटेलला ठरली. महाराज व त्यांच्याबरोबर असणारे मनसबदार दरबारी गंगारामच्या हॉटेलात चहा फराळ करू लागले म्हणून गंगारामच्या हॉटेलात इतर लोकही गर्दी करू लागले. त्यामुळे हॉटेल उत्तम चालू लागले आणि थोड्याच दिवसात गंगाराम एक प्रतिष्ठित माणूस म्हणून गणला जाऊ लागला. असा हा महाराजांचा अस्पृश्योदयो धारक खोकला होता.
छ. शाहुराजे नुसतेच नव्हते तर एक बुद्धिमान आणि दूरदृष्टी असणारे छत्रपती होते हे सांगायलाच नको. आज कोल्हापूर जिल्हा संपूर्ण हिंदुस्थानात सुजलाम सुफलाम म्हणून प्रसिद्ध आहे ते राजामुळेच. कारण छत्रपती शाहुराजांच्याच काळात ह्या भूमीत हरितक्रांतीची बीजे रोवली गेली. कोल्हापूर संस्थानातून वाहणाच्या भोगावती नदीवर राधानगरी येथे तलाव बांधून या भूमीला बारमाही पाण्याची सोय केली. असा राजा पृथ्वीतलावर तर विरळच !
निश्चयाचा महामेरू। बहुतांचा आधारू ।
अखंड स्थितीत निधीस। श्रीमंत योगी।
हे शब्द त्यांना बरोबर बसतात. शेवटी या कोल्हापूरच्या धोर राजाला मी प्रणाम करून एवढेच म्हणेन,
उगा कशाला दवडू माझ्या शब्दांचे बुडबुड़े।
तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे ।