गणेश उत्सव मराठी निबंध भाषण | Ganesh Utsav Essay Speech In Marathi

गणेश उत्सव मराठी निबंध भाषण | Ganesh Utsav Essay Speech In Marathi

सन्माननीय परीक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो, सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नविनाशक गणेश येणार येणार म्हणता येऊन गेलासुद्धा. बुद्धीचा दाता गणेश येणार असला की, सान्या महाराष्ट्रात स्फूर्तीचे झरे वाहू लागतात. पावसाळ्यात उगवणाऱ्या कावळ्यांच्या छत्र्याप्रमाणे गल्लोगल्ली गणेश मंडळ स्थापन होतात आणि गणपती बसवला म्हणजे फार मोठे समाजकार्य केले. या आनंदात ही मंडळे मश्गुल राहतात. आमचा भारत एकीकडे विज्ञानाची शिखरे गाठतो आहे आणि दुसरीकडे धार्मिक भावना वाढते आहे.

जो गणपती आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्याची अवस्था आज काय झाली आहे ? तरतऱ्हेच्या सजावटीमध्ये कॉडला गेलेला, भल्या मोठ्या स्टेजवर एका कोप-यात बसवलेला गणपती मला तरी करुण दिसतो. लोकमान्य टिळकांनी एक पवित्र ध्येय डोळ्यांसमोर ठेवून हा उत्सव सुरु केला. त्यामुळे लोकांची मने साधली गेली दहा हात एकत्र आले म्हणजे काय होतं या शक्तीची जाणीव लोकांना झाली आणि या गणेशोत्सवातूनच टिळकांनी एकात्मता साधली. पण आज हाच गणेशोत्सव जातीय दंग्यांना निमित्त पुरवतोय. धर्माच्या नावाखाली चाललेली लुटमार गणपतीलासुद्धा उघड्या डोळ्यांनी पाहावी लागते तिथे आपण पामर काय करणार?

गल्लोगल्लीतील गणेश मंडळांमध्ये एकीची भावना तर दिसतच नाही. पण चढाओढ़ मात्र सर्वत्र दिसते. गणेशोत्सवाच्या नावाखाली होणाच्या मारामाऱ्या, बेशिस्तपणा, रॉबासोबाचा हिडीस नाच, कानठळ्या बसविणारा ध्वनिक्षेपकाचा आवाज आणि क्षुल्लक बार्बीवरून होणारा जातीय दंगा पाहिल्यावर राष्ट्रीय एकात्मता नको पण गणेशोत्सव आवर असे म्हणण्याची वेळ येते. देवांच्या राजकारणांपासून नेहमीच दूर राहिलेल्या या गजाननाला माणसांच्या राजकारणामुळे ६ वर्षे विसर्जन करण्याची वाट पाहात थांबावी लागते हा आमच्या शुद्र मनोवृत्तीचा कळस नव्हे काय? औरंगाबाद शहरातील ४ मीटर उंचीची सव्वाटन वजनाची गणेशमूर्ती नदीकडे वाहून नेण्यासाठी योग्य साधन व रस्ते नसल्याने ६ वर्षे तशीच ठेवली आहे! या परती गणपतीची विटंबना ती काय? मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर गणपती विजर्सनानंतर हात, पाय, डोके इ. विखुरलेल्या अवस्थेत गणपतीचे जे अवशेष पाहाव मिळतात ते पाहून महाभारतातील धर्म युद्धानंतरच्या कुरुक्षेत्राचीच आठवण येते.

अर्थात याचा अर्थ गणेशोत्सव बंदच करावेत असा नाही. पण त्याउलट तारतम्यानं, विचार करून गणेश एक समाजप्रबोधनाचा, लोकांची मने साधण्याचा उत्सव आहे, अशा विचाराने जर साजरा केला तर नक्कीच गणराज सुखावेल, बिसर्जन सोहळा हा आनंदाचा सोहळा नसून वियोगाचा आहे, हे लक्षात ठेवून सुव्यवस्थित संयोजन करून जाणीवपूर्वक केलेली शिस्तबद्ध मिरवणूक असं जर गणपती उत्सवाचं स्वरूप झालं तर हा वि देवाधिदेव, खरोखरच विघ्नविनाशक ठरेल आणि याचं साक्षात उदाहरण मुंबईच्या विसर्जन मिरवणुकीत घालून दिलेले आहे.

व्यक्ती आणि समाज या दोघांच्या दृष्टीने असे उत्सव महत्त्वाचे असतात. विविध विचारांचे, वयांचे, स्वभावांचे वेगवेगळ्या थरातील लोक त्यानिमित्ताने एकत्र येतात. मत्सर, हेवेदावे कमी होतात. समाजाला संघटित क विधायक काम करण्याचा अनुभव कार्यकर्त्यांना मिळतो. जीवनाच्या व्यापात आणि टीव्हीच्या खोक्यात गुंतलेला समाज बाहेर काढण्याचे मोठे काम या गणेशोत्सवाने करता येईल. गणपती हा विद्येचा अधिदाता आहे. त्यादृष्टीने विचार करून बौद्धिक जनजागारण, साक्षरता मोहीम, अंधश्रद्धा निर्मूलन इ. सारखे विधायक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करता येतील.

आपल्या देशात आज गरिबी आणि बेकारी वाढते आहे. नुसत्या घोषणांनी तर ती हटणारच नाही. भल्या मोठ्या गणेशमूर्ती आणि महागडी सजावट यावर उधळले जाणारे लाखो रुपये या गरीब आणि बेकार तरुणांना जन्माची मीठ-भाकरी देऊ शकतील आणि मंडळाची ही विधायक कामे पाहून लोकही त्यांना उस्फूर्तपणे मदत करतील. गणेशोत्सवाचे दहा दिवस हे एका पवित्र आणि मांगल्याच्या भावनेने भारलेले असतात. त्याला तडा जातो. तो हिडीस नाचगाणी, भांडणे, व जीवघेणी चढाओढ यामुळे दहाव्या दिवसाची विसर्जनाची मिरवणूक म्हणजे हवं ते करण्याचा जणू परवानाच. हे सगळं बंद झालं पाहिजे.

गणेशोत्सव म्हणजे शिस्तबद्ध संयोजनाचा आणि समाजप्रबोधनाचा उत्सव बनला पाहिजे. सर्वधर्मियांना घेऊन गणरायाला निरोप दिला पाहिजे. त्याच्या वियोगाने मन हेलावले पाहिजे. लाऊडस्पीकरच्या कर्कशपणामुळे गणपतीवर कान झाकून घेण्याची आणि हिडीस नाचगाण्यामुळे डोळे झाकून घेण्याची वेळ आली आहे. आपल्या संस्कृतीचे विकृत दर्शन यातून घडते आहे. ते काबूत ठेवल्यास हा गणराय आनंदाने येईल. गणपती बप्पा मोरयाऽऽ, पुढच्या वर्षी लवकर या असे त्याला बोलावणे करताना ही जाणीव आपण ठेवली पाहिजे. तरच तो सुखकर्ता दुःखहर्ता गजानन मंगलमूर्ती बनून येईल नाहीतर…..

मी सुखकारक दुःख निवार

करतो तुझा धावा संकटी रक्षी शरण तुला मी

नको बोलवू मानवा

असा धावा करण्याची पाळी त्या विघ्नहर्त्यावर येईल.

Download File

Leave a Comment