माझा आवडता शास्त्रज्ञ निबंध भाषण | My favorite scientist essay speech In Marathi
लिहावं त्यांच्याविषयी शब्दही आनंदी होतील बापुडे,
बोलावं त्यांच्याविषयी निसर्गही झुकेल ज्याच्यापुढे !!
धोर शास्त्रज्ञ चार्लस डार्विन यांना नतमस्तक होऊन मी माझे हे चार शब्द आपणासमोर मांडत आहे.. निसर्गाने मानवाला इतर सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असे बुद्धिमत्तेचे वरदान दिले आहे आणि मानव इतर प्राण्यापेक्षा श्रेष्ठ ठरला. त्याच्या बुद्धिमान मेंदूने निसर्गातील अनेक चमत्कारिक शोध लावले, अनेक अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखविल्या. या शोधाने मानवजीवनात क्रांती केली. या शोधाचे जनक आहेत. अनेक शास्त्रज्ञ.
१९ व्या शतकात अशा अनेक शास्त्रज्ञांचा उदय झाला. विज्ञान झपाट्याने प्रगत होऊ लागले आणि अनेक धक्कादायक शोधांची मालिकाच तयार झाली अशातच चार्लस डार्विन या शास्त्रज्ञाचा उदय विज्ञानाच्या क्षितिजावर झाला.
डार्विनच्या शोधाने साज्या मानव जातीत खळबळ माजली. चार्लस डार्बिन हा माझा आवडता शास्त्रज्ञ आहे. डार्विनचा जन्म एका अत्यंत सुशिक्षित आणि विज्ञानाची परंपरा असणाऱ्या कुटुंबात १२ फेब्रुवारी १८०९ मध्ये इंग्लंडमध्ये श्रेअसबुरी या गावी झाला. त्याचे आजोबा त्यांच्या काळातील एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते. डार्विनची आई तो आठ वर्षांचा असताना वारली. डार्बिनला शाळेत असताना पतंग उडवणे व रंगीत फुलपाखरे पाहण्यास फार मौज वाटे. यातूनच त्याला शिकारीचाही नाद लागला. जंगल-झाडीत फिरून निरनिराळे प्राणी पाहणे, पकडणे इ. गोष्टीचा त्याला छंद लागला. रसायनशास्त्राचीही त्याला खूप आवड होती.
त्यांच्या वडिलांना मात्र या गोष्टी पसंत नव्हत्या. ते त्याच्यावर खूप चिडत. त्याने चांगले डॉक्टर किंवा धर्मोपदेशक व्हावे असे त्यांना वाटे. पण डार्विनला या दोन गोष्टींची अजिबात आवड नव्हती. त्याला सतत काहीतरी नवीन हवं असे. या वेडातूनच त्याने घरातच एक छोटीशी प्रयोगशाळा मांडली व तिथे तासन्तास बसून तो अनेक गोष्टींवर प्रयोग करू लागला. वडिलांनी त्याला प्रथम एडिनबर्ग येथे वैद्यकीय अभ्यासासाठी पाठवले पण डार्विनचे मन तिथे रमले नाही. तिथे कशीबशी दोन वर्षे काढल्यावर वडिलांनी त्याला केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. तिथेही त्याचे प्रयोग चालूच होते. तरीपण त्याने धर्मशास्त्राची डिग्री मिळवली व एक निसर्गशास्त्रज्ञ म्हणून तो बिगल नावाच्या बोटीवर दाखल झाला. थोडीथोडकी नव्हे तब्बल ५ वर्षे बिगलचा प्रवास चालू होता. या काळात द. अमेरिका, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया, तास्मानिया, मालदीव बेटे, सेंट हेलेना, पॅसिफिक समुद्र अशी कित्येक ठिकाणे डार्विनने पाहिली. तेथील वातावरण, माती, खडक, पाणी, वनस्पती, पाणी यांची टिपणे त्यांच्या डायरीत होत होती. ५ वर्षांनी डार्बिन परतला तो अनेकविध नमुन्याचा खजिना, समृद्ध असे अनुभव विश्व आणि निसर्गाकडे पाहण्याची नवीन दृष्टी घेऊनच या विविध खजिन्याचे भांडार डार्विनमपल्या चौकस शास्त्रज्ञाला खुणावत होते, आव्हान देत होते.
एकाच जातीच्या पक्ष्यांमध्ये खाण्यात, रंगात व गुणधर्मात विविधता का असते? हे बदल होण्याचे कारण काय? या प्रश्नाने डार्विनला बेड़े केले आणि अथक परिश्रमाअंती पक्ष्यात व प्राण्यात होणारे बदल हे निसर्ग संघर्षात टिकून राहण्यासाठी होतात. व तेच अनुवंशिकतेमुळे पुढच्या पिढीत उतरतात या निष्कर्षाप्रत डार्बिन आला. मग हाच नियम, हाच उत्क्रांतीचा खेळ मानवातही खेळला गेला नसेल, कशावरून? आणि डार्थिनमधल्या अभ्यासू संशोधकाने याचे उत्तर ठामपणे ‘होय’ असे दिले. वेगवेगळ्या प्रकारच्या माकडांमध्ये त्यांच्यातील जीवनस्पर्धेमुळे हळूहळू अनेक फरक होत गेले. नैसर्गिक निवडीत त्यातील योग्य होते ते टिकून राहिले व त्यांच्यातील हा बदल पुढील पिढीत अनुवंशिकतेमुळे उतरला. प्रत्येक वेळेस अशी नैसर्गिक प्रक्रिया होऊन कित्येक पिढ्यानंतर माकडांपासून माणूस तयार झाला असा धमादायक शोध डार्विनने लावला. सगळीकडे खळबळ माजली. वाद-विवाद झ लागले. त्यातच डार्विनने आपला ‘ओरिजन ऑफ स्पिसौज’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. विशेष म्हणजे बाद-विवादामुळे तो पहिल्याच दिवशी खपला. हळूहळू डार्विनचा सिद्धांत सर्वसामान्य झाला नवीन पिढीने आपला माकडापासून उत्क्रांत झाला हे सत्य डोळसपणे स्वीकारले आणि डार्विनचा उत्क्रांतीवाद हा मानवाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. आयुष्यभर मान-सन्मानापासून उपेक्षित राहिलेल्या या महामानवाचा १९ एप्रिल १८८२ ला स्वरूपाच्या हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. डार्विनचा हा सिद्धांत युगानुयुगे मानवाला त्याची जागा दाखवीत राहील हेच खरे !