दहशतवादावर निबंध | Essay on Terrorism in Marathi

दहशतवादावर निबंध | Essay on Terrorism in Marathi

दहशतवाद ही जागतिक पातळीवर चर्चेत असलेली संकल्पना आहे. गेल्या ११ सप्टेंबर रोजी अमेरिकेत पेन्टोंगान व वर्ल्ड ट्रेड सेंटर या दोन इमारतीवर झालेला हल्ला असो वा १ ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीर विधानसभेवरील आत्मघातकी धडक असो किंवा १३ डिसेंबर रोजी संसदेवर झालेला हल्ला असो. ही सर्व दहशतवादाची जीवघेणी उदाहरणे आहेत. आज जगातील अनेक देशात वाढत्या दहशतवादी कारवायांनी अक्षरशः थैमान घातले आहे. भारतापुढे तर या दहशतवादाने मोठेच आव्हान उभे केले आहे… अमेरिका हे जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र मानले जाते. ते शस्त्रास्त्रसंपन्न तर आहेच, पण अण्वस्त्रधारीही आहे. त्याची सुरक्षा यंत्रणा तर अद्ययावत आहेच. शिवाय गुप्तचर यंत्रणाही अतिशय कार्यक्षम मानली जाते. अमेरिकेच्या सर्व क्षेत्रातील प्रभुत्वाची प्रतिके म्हणजे न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर व वॉशिंग्टनमधील पेन्टोंगान हे अमेरिकन लष्कराचे मुख्यालय. गत ११ सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटर व पेन्टोंगान कार्यालयावर ज्या पद्धतीने दहशतवाद्यांची विमाने येऊन धडकली ते पाहता अमेरिकेसारखी बढी सत्ताही दहशतवाद्यांपासून मुक्त नाही, हेच दिसते. वरवर पाहता दहशतवाद्यानी अमेरिकेतील दोन इमारतींना आपल्या हल्ल्याने लक्ष्य बनविले. पण हे हल्ले म्हणजे तिसन्या महायुद्धाची भयसूचक घंटा तर नव्हे ना? तसेच ज्याप्रमाणे बर्म्युडा ट्रॅगलमध्ये ओढली गेलेली कोणतीही वस्तू परतूच शकत नाही. त्याचप्रमाणे अमेरिकेतील घटनांनी सारी मानवताच असुरक्षिततेच्या बर्म्युडा ट्रेंगलकडे ओढली जाणार नाही ना? असे विचार मनात आल्याशिवाय राहिले नाहीत.

दहशतवादी कारवायांनी जगाचे डोळे आता उघडले आहेत. नव्या युगात ‘युद्धाची व्याख्याही बदलली आहे. विसाव्या शतकात दोन राष्ट्रांमध्ये युद्ध होत होती. किमान दोन ठळक शस्तूंमध्ये होत असत. मात्र, २१ व्या शतकातील युद्धाचं स्वरुप बदललं आहे. हे युद्ध दोन ठळक शत्रूमध्ये न होता संपूर्ण जग विरुद्ध दहशतवादी अशा प्रकारे सुरू आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील कुटील कारस्थानाच्या आणि धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचा संबंध आल्यावर दहशतवादी कारवाया वाढू लागल्या. दहशतवाद्यांना राजकीय आश्रय मिळू लागला. प्रसंगी सर्व प्रकारची मदत मिळू लागली. ज्या दिवशी धर्म हा राजकारणाचा केंद्रबिंदू झाला, त्या दिवसापासून हिंदू, मुस्लिम अन् विश्चन यांचे धर्मकारण हा राजकारणाचा भाग झाला आहे.

दहशतवाद हे इतर पद्धतींपेक्षा कमी खर्चाचे अन् प्रत्यक्ष समोरासमोर न येता लढा देण्याचे दुय्यम तंत्र आहे. दहशतवादी आपल्या कार्यवाहीची योजना अत्यंत तर्कशुद्ध, सखोलतेने करतात. तिचा कसून सराव करतात आणि तो अत्यंत काटेकोरपणे अंमलात आणतात. त्यामुळे दहशतवाद म्हणजे निर्घुण हिंसा असली तरी त्याच्यामागे एक सुसंबद्ध आराखडा आणि निर्धारपूर्वक अंमलबजावणी असते. मानवहत्या, अपहरण, बॉम्बफेक वाहतुकीस अडथळे, ओलिस ठेवणे अन् हवाई चाचेगिरी या सहा प्रक्रियांचा उपयोग दहशतवादी कारवायांमध्ये प्रामुख्याने होतो. अधिकाधिक सनसनाटी, नाट्यपूर्ण कारवाया करणे आणि स्वतःच्या प्राणाप्रमाणेच इतर हजारोंचे प्राण शुल्लक मानणे ही दहशतवादी प्रवृत्ती आहे. ये कुठल्याही घराला जाऊ शकतात. निष्पाप लोकांचा लक्ष्य म्हणून दहतवादी प्रामुख्याने उपयोग करतात. निष्पाप लोकांचे बळी घेऊन ते आपल्या उदिष्टांचा डांगोरा पिटण्याचा प्रयत्न करतात. हत्येमधील अमानुषता जितकी भीषण तेवढा त्याचा गाजावाजा जास्त. प्रसिद्धी हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आणि खळबळजनक परिस्थिती निर्माण करण्यासाठी अमानुषतेच्या कोणत्याही थरास पोहोचण्यास ते डगमगत नाहीत. दहशतवादाच्या जोरावर अतिरेकी | कृत्य करीत आपले कार्य साध्य करण्याचा मार्ग हे दहशतवादी वापरतात आणि त्यात त्यांना यश येते. यातच दहशतवादाचे रूप किती व्यापक आहे. तसेच त्यांचे आव्हान किती गंभीर स्वरुपात उभे आहे, याची जाणीव येते. निराधार व्यक्तींवर हल्ला करू नये, रुग्णांना त्रास देऊ नये, महिलांवर अत्याचार करू नये, लहान मुलांना सांभाळणे अशा प्रकारची मानवी भावनांशी निगडित असलेली कोणतीही बंधने त्यांच्यावर नसतात. त्यादृष्टीने ते मृत्यूचे विनाशाचे सौदागर असतात. दहशतवादाने आतापर्यंत आपले अतिशय रौद्ररूप क्रमाक्रमाने वेळोवेळी प्रकट केलेले आहे. आपल्या आघात लक्ष्याचे जास्तीतजास्त नुकसान करून दहशत उत्पन्न करणे व आपल्या उद्दिष्टाकडे जगाचे लक्ष वेधावे यावरच त्यांचे लक्ष केंद्रीत झालेले असते. एका ठिकाणी बसून वाटाघाटीद्वारे प्रांची सोडवणूक करता येईल, यावर दहशतवाद्यांचा विश्वास नसतो. सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्यात यावर त्यांचा जोर असतो.

भारतातील दहशतवादावर निबंध | Terrorism in India Essay in Marathi

दहशतवादाची सर्वाधिक किमत बहुधार्मिक असलेल्या भारताला मोजावी लागली आहे. विशेषतः गेल्या पंचवीस वर्षात भारताला दहशतवादामुळेच आपले दोन पंतप्रधान अन् हजारो निरपराध नागरिक गमवावे लागले आहेत. याशिवाय कोट्यवधी रुपयांची आर्थिक हानी भारताने सोसली आहे. केवळ अमेरिकेतील घटनेपुरते दहशतवादाचे रूप मर्यादित नसून यापूर्वी आपली उम्र रूपे दहशतवाद्यांनी भारतात वेळोवेळी दाखवून दिली आहेत. बॉम्बस्फोट घटनेपासून ते संसदेवरील हल्ल्यापर्यंत अन् काशमीरमधील निष्पापांच्या हत्या करण्यापासून ते गुजरात हत्याकांड सारख्या धार्मिक साम्राज्यवाद वाढविण्यासाठी विविध प्रकारे अवलंबले जाणारे मार्ग ही गारी दहशतवादाचीच रूपे आहेत. दोन प्रमुख इमारतींवर झालेला हल्ला त्या देशाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा होता. तसाच संसदेवर झालेला हल्ला हा भारताच्या प्रतिष्ठेला तसेच येथील सार्वभौमत्वाला धक्का देणारा ठरला. आज तर देशाच्या काश्मी रसह पूर्वोत्तर राज्यांमध्ये दहशतवादाने धुमाकूळ घातला आहे. उत्तरेत काश्मीर, उत्तर पूर्वेला अरुणाचल प्रदेश आसाम, मणिपूर, मेघालय, मिजोरम, नागालैंड, त्रिपुरा ही सात राज्ये आणि दक्षिणेत तामिळनाचा काही भाग आज दहशतवादाच्या गर्द छायेत आहे. बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात पीपल्या वॉर ग्रुप अधूनमधून डोके वर काढतोय तिकडे आंध्रप्रदेशात स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी नक्षलवादी कारवाया सुरूच आहेत. दादाने देशभरात मूळ परले आहे आणि तो भविष्यात कमी होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.

१९८०नंतर जगाच्या राजकारणात इस्लामी मूलतत्ववादी चळवळी प्रवळ ठरल्या. या चळवळींना इराणमध्ये सुरुवात झाली. इराणच्या भ्रष्ट शहांच्या राजवटीविरुद्ध आयातुल्ला खोमेनी यांनी बंड पुकारले आणि १९८९ मध्ये इराणची इस्लामी क्रांती झाली. या क्रांतीनंतर इराणमध्ये प्रचंड हिंसा झाली. ईश्वर व धर्म यांचे नाव घेणारे मुल्ला, मौलवी किती क्रूर आणि हिंस्त्र बनू शकतात, याची या काळात जगास जाणीव झाली. या इस्लामी मूलतत्त्ववादी चळवळींना स्वतःचा आदर्श धार्मिक समाज स्थापन करावयाचा आहे. इराणच्या क्रांतीपासून प्रेरणा घेऊन जगभर मूलतत्त्ववादी चळवळी सुरू झाल्या. इजिप्तमध्ये मूलतत्त्ववाद्यांनी इजिप्तचे राष्ट्रपती अन्वर सादत यांची हत्या केली. होने मुबारक यांना बळाचा वापर करून ही चळवळ दडपावी लागली. अल्जेरिया व तुर्कस्तान या सर्वांत सुधारलेल्या व आधुनिक देशात मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांना तोंड देण्यासाठी आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था रद्द करून लष्कराला लष्करी राजवट लागू करावी लागली. अल्जेरियात नॅशनल साल्व्हेशन फ्रंट या मूलतत्त्ववादी पक्षाने निवडणूक जिंकली होती. तालिबानने अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या मदतीने मूलतत्त्ववादी राजवट लागू केली आणि अफगाण लोकांना मध्ययुगीन जीवन जगावयास भाग पाडले. ओसामा बिन लादेन याचा दहशतवाद हा याच दहशतवादी राजकारणाचा एक भाग आहे. अमेरिकेने इजरायलमध्ये अफगणिस्तान आणि इतर काही देशांमध्ये आपणास अनुकूल असे सरकार स्थापन व्हावे यासाठी केलेल्या कारवाया या कारवायांचा बदला घेण्यासाठी तालिबानची मदत असलेल्या लादेन अमेरिकेवर केलेले हल्ले, दोन बुद्धांमध्ये भारताकडून मात खाणाऱ्या पाकिस्तानने काश्मीर मिळवण्यासाठी चालविलेली घटपद, भारतीय संसद व जम्मू काश्मीर विधानसभेवर झालेले हल्ले, श्रीलंकेत हजारो निरपराधांचा बळी घेऊन

लिट्टेकडून केला जात असलेला स्वतंत्र तमिळ राष्ट्राचा आग्रह याला कुठेच अंत नाही का? आधुनिक काळातील दहशतवाद ही मानवी संस्कृतीला लागलेली कीड आहे. अन् ती निर्घृणपणे निपटन काढल्याशिवाय विश्वात सुख व शांतता नांदू शकणार नाही, हे जेवढे खरे हेही खरे की, अतार्तिक दहशतवादाच्या निर्मितीची काही बीजे तथाकथित सुसंस्कृत जगाच्या वागणुकीतही असू शकतात. भविष्यासाठी आतंकवाद प्रणव लोकांच्या वैचारिक प्रबोधनाची गरज आहे. थोडक्यात दोन आघाड्यांवर दहशतवादाविरुद्ध लढा द्यावा लागेल. दहशतवादाला खतपाणी देणाऱ्या मुस्लिम संघटनाच आहेत. मग त्यांची नावे वेगवेगळी असू देत. जम्मू-काश्मीर, सुदान, पॅलेस्टाईन अशा वेगवेगळया दहशतवादी संघटनांच्या कारवाया चालतात. हे सारे मुस्लिम आहेत. मात्र, सारे मुसलमान आतंकवादी नाहीत. हा फरक समजून घेतला पाहिजे व समाजाच्या नेत्यांनी त्याचा विचार करावा. प्रबोधनाकडे लक्ष द्यावे. दहशतवादी संघटनांची नावे वेगवेगळी असली तरी कुळ, मूळ एकच आहे. मानवतेच्या अस्तित्वावरील या भयानक संकटाचा सामना धीरोदात्तपणे आणि एकजुटीने करणे आवश्यक आहे. यासाठी जगातील सर्व मानवतावादी, स्वातंत्र्यप्रिय लोकशाहीभिमुख आणि अर्वाचिन विचार स्त्रोतांनी एकत्र येण्याची नितांत आवश्यकता आहे.

Also Read:-