राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी | Essay Rajarshi Shahu Maharaj In Marathi

राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी | Essay Rajarshi Shahu Maharaj In Marathi

लोकराजा राजर्षी शाहू महाराज

“यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत

पुण्यवंत, नीतिवंत, लोकराजा राजर्षी शाहू ॥”

“युगायुगांमधून कधीतरी आकात धरधरते! कधी धर्म-संस्थापनार्थ संभवामि युगे युगे म्हणणाच्या श्रीकृष्णाच्या रूपाने तर कधी सर्व जगाला शांतीचा मार्ग सांगणाऱ्या गौतम बुद्धांच्या रूपाने, कधी हसत-हसत मृत्यूला सामोऱ्या जाणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या रूपाने, तर कधी अहिंसा हाच मानवधर्म आहे, असे सांगणाच्या वर्धमान महावीरांच्या रूपाने, तर कधी निराकार परमेश्वर एकच आहे, हे सांगणाऱ्या पैगंबराच्या रूपाने, तर कधी हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या रूपाने, तर कधी बहुजनांच्या शिक्षणासाठी आपले सर्व औदार्य उधळणाऱ्या, अस्पृश्यांना माणसात बसवू पाहणान्या, मानवी स्वराज्य संस्थापक राजर्षी शाहूंच्या रूपाने.”

छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार, शेतकऱ्याच्या मांडीला मांडी लावून कांदा भाकर खाणारा शेतकऱ्यांचा राजा, अस्पृश्यांच्या घरी पाणी ग्रहण करणारा अस्पृश्यांचा राजा, लोकसेवेचे व्रत हाती घेतलेला लोकांचा राजा राजर्षी शाहू महाराज यांचाजन्म २६ जुलै १८७४ साली कागलच्या पाटको घराण्यात झाला. त्यांचे मूळचे नाव) यशवंतराव होते. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई असे होते.. कोल्हापूरच्या संस्थानचे अधिपती राजे चौथे शिवाजी यांना इंग्रजांनी बेडसर

ठरवून अहमदनगरच्या तुरुंगात टाकले. काही दिवसात तेथेच त्याचा अंत झाला. त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील जयसिंगराव घाटगे यांचा मुलगा यशवंतराव घाटगे यास १८८४ साली दत्तक घेतले. दत्तक विधानानंतर त्यांचे नाव ‘शाहू असे ठेवण्यात आले. राजघराण्याच्या प्रथेनुसार त्यांचे प्रथम शिक्षण खासगी शिक्षकामार्फत झाले. अवधी अठ्ठावीस वर्षांची कारकीर्द लाभलेल्या राजर्षी शाहू महाराजानी केवळ कोल्हापूरच्या नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी दिली. बहुजन हिताय बहुजन सुखाय ।” या उक्तीप्रमाणे सामान्य जनतेची सर्वांगीण प्रगती व्हावी, हेच ध्येय समोर ठेवले.

बहुजन समाजात विद्येचा प्रसार व्हावा, याकरिता शाहू महाराजानी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. शिक्षणातून नवीन व्यवसाय करण्याची पात्रता येते. स्वाभिमान जागृत होतो, हे शाहू महाराजांनी ओळखले होते. ‘शिक्षण हा आमुचा तरुणोपाय आहे’ असे त्यांचे ठाम मत होते. याच भूमिकेतून त्यांनी इसवी सन १९१६ साली प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. इ. स. १९११ मध्ये त्यांनी एक जाहीरनामा काढून १५ टक्के विद्यार्थ्यांना नादारी देण्याची घोषणा केली. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये बीर कधीही जन्माला येणार नाहीत, असे शाहू महाराजांनी म्हटले आहे. जातीभेद दूर व्हावेत म्हणून राजर्षी शाहूंनी अतोनात प्रयत्न केले. “जातीभेद हा भारतीय समाजाच्या ऐक्यास व प्रगतीस विरोधक आहे.” भारतीय समाजाच्या ऐक्यास चांगले नाही, हे महाराजांनी पुरेपूर जाणले होते.

सामाजिकदृष्टया दलित नव्हे तर आर्थिकदृष्ट्या बदला महाराजांना कळवळा होता. “शेतकरी व कामगार यांनी संघटित व्हावे, असे ते वारंवार सांगत. “गवताच्या काढीला महत्त्व नाही, पण पेंडीला महत्त्व असते ” म्हणून संघटित व्हा. समाजसुधारणेचे महत्त्वाचे अंग म्हणजेच नीतिमत्तेत वाढ होय. वाईट रितीभाती, धर्मभोळेपणा यामुळे समाजात मद्यपान, बालविवाह, देवदाची प्रथा असे घातक प्रकार निर्माण होऊन त्यापासून अवनती निर्माण झाली आहे. अस्पृश्य व मागास वर्ग यांची उक्ती हे शाहू महाराजानी जीवितकार्य मानले होते. “मला राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या व अविकसित समाजाच्या सेवेचे व्रत मी सोडणार नाही” असे स्पष्टपणे त्यांनी बजावले होते.

आपल्या राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी शाहू महाराजांनी केलेले कार्यही अरोच उल्लेखनीय आहे. त्यामध्ये ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अॅण्ड विव्हिंग मिलची स्थापना’, ‘गुळाच्याव्यापारासाठी शाहूपुरी व्यापारपेठेची स्थापना. ‘शेतकन्यांच्या सहकारी संस्थानवी स्थापना’, ‘राधानगरी धरणाची उभारणी इत्यादी गोष्टींचा समावेश करता येईल. सामान्य शेतकन्यांना आपल्या जमिनी सोडविण्यासाठी, जमीनदारी जाचातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी ती कुलकर्णी वतने रद्द केली. त्या जागी पगारी तलाठी नेमण्याची व्यवस्था केली. या सुधारणा इतक्या मूलगामी स्वरूपाच्या होत्या की, त्यातून एका सामाजिक क्रांतीने जन्म घेतला आणि ही क्रांती अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्र व्यापून राहिली.

सहकार चळवळीला सुरुवात खऱ्या अर्थाने कोल्हापूर संस्थानात झाली. शिल्पचित्र गायनवादनकला, नाट्यकला आदि कलांची त्यांनी जोपासना केली. शाहूमहाराज सर्व कलावंतांचे चाहते होते. मधुमक्षिकेप्रमाणे कलेचे रसग्रहण करीत व कलाकारांच्या अंगच्या गुणांचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी कलाकारांना साह्य करीत.

“शाहिरांचा रणमल्लांचा जिवलग तू मानी

परकीयांना नमले नाही, मस्तक अभिमानी”

असे म्हटले जाते ते योग्यच वाटते. कराव, गुण, कर्तृत्व, कला इत्यादीविषयी त्यांना अतिशय कणव होती. त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते, तसेच त्यांचे मनही विशाल होते. म्हणून समाजातल्या गुणी, कर्तृत्ववान यांना त्यांचा आधार होता. सत्ताधारी हा असा असावा लागतो की, तो गाजलेल्या, पीडितांना अपील कोर्टासारखा वाटावा. महाराजही तसेच होते. “लोहचुंबकाकडे जसे लोखंडाचे कण धाव घेतात, त्याचप्रमाणे लोक शाहू महाराजांकडे धाव घेत असत. आयुष्यभर जनतेचाच विचार करणाऱ्या या राजाचा आढावा घेताना यशवंतराव चव्हाण म्हणतात की, “शाहू महाराज हे वारसा हक्काने राजे नव्हते, तर से लोकांचे लोकराजा होते.” शाहू महाराजांचा मृत्यु ६ मे १९२२ रोजी पहाटे झाला. ते जग सोडून गेले तरी त्यांच्या कर्तृत्वाचा गंध सुगंध आजही दरवळतो आहे. असा देह मिळावा। चंदनासारखा झिजावा आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा ॥

Also read:-