सशक्त नारी हरी भरी बस एक फुलबारी

सशक्त नारी हरी भरी बस एक फुलबारी

विधात्यानं निर्माण केली ही सृष्टी! हा निसर्ग! त्याचा उपभोग घ्यायला एका नंदनालाही पाठवलं अन् निसर्गाला सृजनशील बनवणारी, या जगाला क्षमा न शांती याचा मूलमंत्र सांगणारी… भविष्याला आपल्या ओटीत फुलवणारी अन् गतकाळाला पदरात झुलवणारी स्त्री त्यानं निर्मिटी… या स्त्रीनिर्मितीचा विधात्याचा हेतु किती निर्मळ होता, परंतु

संस्कृतीनं तिच्या नाजूक पायात रूढीच्या बेड्या ठोकल्या.

पिता रक्षति कौमार्य, भतार रक्षन्ति यौवने रक्षन्ति स्थविरै पुत्रः, न स्त्री स्वातंत्रम अर्हति ॥ असं म्हणतच स्त्री मोठी होऊ लागली. तिच्या अनेक रूपांत तिनं तिची कर्तव्ये पार पाडली. परंतु आता तिने जुलुमाचा पिंजरा तोडला आहे अन् आपले आशा-आकांक्षांचे पंख जोराने फडकून तिने आपला विकास घडविला आहे. आता विकासाचं स्त्री रूपी बोन्साय एक वटवृक्ष नक्कीच होणार आहे. तिच्या या विकासाकडे पाहिल्यावर वाटते की, ” सशक्त नारी हरीभरी बस एक फुलवारी”

आज स्त्रियांना ‘सशक्त’ या शब्दाची व्याप्ती कळाली. त्यांनी केवळ शारीरिक अपना मानसिकदृष्ट्या रक्त झाल्या नाही तर सामाजिकदृष्ट्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या त्यांनी आपला विकास केला, परंतु या विकासात मात्र तिनं स्वतःला हरवलं नाही. तिला स्वतःचा विकास तर करायचा होता. स्वतःबरोबर इतरांचेही संवर्धन करायचे होते. ही तिची जबाबदारी तिने ओळखली आणि स्वतःसोबतच तिने आपल्या फुलवारीचा म्हणजेच घराचा विकासही साधला.

कला स्वच्छता, कुटुंबनियोजन शिक्षणाचे महत्त्व कळाले आणि तिने स्वच्छता, आरोग्य, चांगल्या सवयी, चांगले खाणे-पिणे याबद्दल आपल्या कुटुंबाला शिस्त लावली. कारण तिची बाळं हेच उद्याचे भावी सुसंस्कृत नागरिक आहेत आणि त्यातूनच राष्ट्राचा अन् जगाचा विकास होईल, याची तिला जाणीव आहे. घराची अधिष्ठात्री देवता म्हणून तिने आपली जबाबदारी योग्य रितीने पाळली.

या सर्व व्यापातून तिला आपल्या अंगी असलेल्या कलागुणांची, सुप्त शक्तीची जाणीव झाली. आपल्या स्वत्वाची काहीतरी ओळख असावी आणि त्यातूनच आपल्या समाजाची, राष्ट्राची पर्यायाने आपल्या माणसाचा उत्कर्ष व्हावा, या इच्छेतून तिने आपले पाय घराबाहेर काढून विविध क्षेत्रांत टाकायला सुरुवात केली. पाळणा सांभाळून तिनं आपलं कार्यक्षेत्र कल्पना चावला बनून अवकाशापर्यंतनेलं तर कधी बचेंद्री पाल म्हणून एव्हरेस्ट सर केलं. कधी मदर टेरेसा बनून भुकेल्याच्या तोंडी घास घातला, तर कधी इंदिरा गांधी बनून राजकारणातील आपलं वर्चस्व तिनं सिद्ध केलं, तर कधी किरण बेदीच्या रूपानं आपलं नैतिक अन् शारीरिक सामर्थ्य सिद्ध करून दाखवलं, तर कधी व्ही. राधा बनून आपलं प्रशासकीय कौशल्य दाखवलं. सुजाता मनोहर बनून शोषितांना न्याय मिळवून दिला. मोहिनी केळकर बनून यशस्वी उद्योजिकेचा मान मिळवला. सुलभा ब्रह्मेने अर्धसिद्धांत मांडले. शास्त्रज्ञ बनून अवघड प्रयोग यशस्वी केले, आज स्त्रीने पाळण्याच्या दोरीबरोबरच विश्वरथाची दोरी हाती घेतली आहे..

मुळातच स्त्री क्षमाशील आहे. पुण्यशील आहे. जुई पुष्पाप्रमाणे लाघवी आहे. तिच्या विचारात ऋजुता आहे अन् या तिच्या स्वभावामुळेच विश्वाला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या अनैतिकता अन् अन्यायाच्या ग्रहणातून ती एकटीच अखिल मानवजातीला वाचवून आहे. विश्वाला मानवतेच्या होणान्या विटंबनेपासून वाचवू शकणारी आहे. एक न ‘भूतो न भविष्यती’ अशी युगंधरा बनून या जगाच्या फुलवारीला फुलवून तिला जपणारी आहे.

Also read:-

लैंगिक शिक्षणावर निबंध