वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान | Essay on Vrksa manavi jivanatila sthana

वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान | Essay on Vrksa manavi jivanatila sthana

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे | संत तुकारामांचा हा अभंग प्रत्येकालाच आवडतो, वर्ष हीच देवता, वनश्री हीच धनश्री एक मूल एक झाड अशा प्रकारची वचने, विचार केवळ ऐकुण किंवा वाचून चालणार नाही तर वृक्षलागवड, त्यांची जोपासना यासाठी कृतीची गरज असते. केवळ झाडे लावा झाडे जगवा म्हणून कर्यक्रमापुरत वृषरोपन करणे मानवच्या हिताची नाही तर त्या उषाची संगोपन करणे, संरक्षण करणे महत्त्वाचे आहे कारण वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहे.

वृक्ष ही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. वृक्षामुळे आपल्याला प्राणवायू मिळतो परंतु आजच्या या अफाट वाढलेल्या लोकसंख्येमुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जात आहे त्यामुळे सुद्धा हवा मिळत नाही. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे, ओझोनचा थर कमी होत आहे. पृथ्वीचे तापमान वाढले आहे. त्यामुळे बर्फाचे वितळणे वाळून समृदाच्या पाण्याची पातळी वाढत आहे. अशी संकटांची मालिका केवळ वृक्षतोड मुळे होत आहे. वृक्षांचा उपयोग इंधनासाठी होतो, इमारत बांधण्यासाठी होतो, फर्निचर तयार करणे, कलाकृती तिच्या वस्तू तयार करणे, औषधांसाठी, कागदनिर्मिती जहाजबांधणी अशा विविध गोष्टींसाठी मानव वृक्षाचा पुरेपूर उपयोग करून घेत आहे.

Essay on Vrksa manavi jivanatila sthana 400 Words

कोकणातील समृद्ध कडचा कल्पुरूष माड म्हणजे नारळ. या फळास धार्मिक आणि आरोग्य आजाराच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. आंबा, चिंच, बाभूळ, निंब, निलगिरी, चंदन, सागवान, अशा विविध प्रकारच्या वृक्षामुळे जमिनीची धूप होत नाही. वृक्षामुळे वाऱ्याचा वेग कमी होतो, महापुरावर नियंत्रण आणता येतो. वृक्षामुळे पाणी जमिनीत मुरते, अशाप्रकारे पर्यावरणाचा समतोल वृक्षामुळेच राखला जातो. तापमानाची तिव़़ता कमी करण्यासाठी वृक्षांची लागवड केली जाते. सध्या पावसाच्या स्वरूप अनियमित व अनिश्चित झालेले आहे. एकीकडे महापुरची ओल्या काळाची स्थिती असते तर दुसरीकडे दुष्काळ. सध्या शेतकरी संकटात आहे त्याला कारण मानव समाज आहे. पाऊस नाही, पीक नाही, पैसा नाही, मुलभूत गरजा भागत नाहीत म्हणून आत्महत्या होत आहेत. त्यासाठी पाऊस वेळेवर यावा म्हणून प्रार्थना, होम, हवन करण्यापेक्षा वनसंधारणवर प्रत्येकानेच लक्ष दिले तरच ही समस्या, त्याची तीव्रता कमी होईल अन्यथा लोकसंख्येच्या प्रमाणात अन्नधान्याची निर्मिती होणार नाही त्यातूनच म्हणावा ची मानसिक पर्यावरण ढासळेल.

हिरडा, बेहडा, तुळस, फळस, निलगरी या वृक्षांना आयुर्वेदिक अत्यंत महत्त्व आहे. बुध्दी, स्मूती ताजी ठेवण्यासाठी आरोग्य चांगले, राहण्यासाठी विविध विकारांवर उपयोगी वृक्ष आहेत. फुला फळांपासून ते वृक्षाचा प्रत्येक अवयव मानवासाठी महत्त्वाचा असतो. माणूस मात्र त्याची तोड करत आहे.

झाड म्हणतं धारा दे
पाखरू म्हणतो चारा दे|

जगातील प्राणी, पक्षी वनात राहतात. वृक्षतोड झाल्याने त्यांचीही अस्तित्व धोक्यात आलेले आहे. काही प्राण्यांचे जातीच नामोनिशान संपला आहेत. निसर्गाची ही देणगी माणूस उद्ध्वस्त करत आहे. निसर्गाचा ऱ्हास होत आहे. हा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्षतोड थांबविला पाहिजे कारण वृक्षा शिवाय आज माणूस जगू शकत नाही.

वनराईच्या हिरव्या वाटा

प्रदूषणाला देतील फाटा

वनराई मुळे प्रत्येक वृक्षामुळे प्रदूषण कमी होईल अन्यथा शोषणाचा, फुफ्फुसाचे, आजारी, कर्करोगाचे रोगी यांची संख्या झटपट आणि वाढेल.

Essay on Vrksa manavi jivanatila sthana 600 Words

सध्या प्रत्येक शहरातील रस्ते पहाटेपाटेे सुद्धा माणसांनी फुललेली दिसतात. त्यामागे शरीराबरोबरच मनाचेही आरोग्य स्वच्छ, सुंदर करण्यासाठी वृक्षराजीच्या छायाखाली धकाधकीच्या जीवनात काही क्षण घालविण्याची गरज निर्माण झाली आहे. वृक्षाच्या छायेखाली निवांतपणे पारावर गप्पा मारतात मनमोकळेपणे क्षण घालविण्यास संकटाची कोळी सुटतात. वृक्ष सुद्धा आपल्याला सल्ला देतात. ते म्हणतात माझ्या प्रमाणे तुम्ही जीवनात जगताना इतरांना मदत करा फळांची अपेक्षा करू नका. सद्वर्तनाची मुळं खोलवर रुजवा. खरंच किती मोराचा संदेश आहे.


ज्यास नाही रे घर
ज्यास नाही रे माऊली
अशा अभागी मनुष्याला
झाड देतो रे सावली

माणसाच्या संरक्षणाच्या दृष्टीने, उत्पादनाच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने वृक्षाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. साहित्य कथा, कविता, कादंबरी यातून तसेच चित्रपटातून सुद्धा वृक्षामुळे, त्यांच्या चित्रीकरणामुळे वणोमुळे प्रसंग उठावदार रंगविला जातो. कारण वृक्ष हा साहित्यकांचा एक आवडता विषय ठरलेला आहे.

ऐलतटावर पैल पटावर उभ्या असलेल्या औदुंबराच्या वर्णन बालकवींनी अतिशय सुंदर शब्दात केलेले आहे.

वृक्ष मानवी जीवनाच्या आधार आहे. मानवचा प्राण आहे. सृष्टी ची शान आहे. निसर्गाची देण आहे. याचे रक्षण आपले संरक्षण म्हणूनच वृक्ष रक्षती रक्षित.

Also read

मि पहिला क्रिकेटचा सामना निबंध

माझा आवडता कवी कुसुमाग्रज

Download File

Leave a Comment