माझा आवडता कवी कुसुमाग्रज | Essay On Majha Avadata kavi kusumagraja

माझा आवडता कवी कुसुमाग्रज | Essay On Majha Avadata kavi kusumagraja

मराठी साहित्यात अनेक दर्जेदार कवी आहे आणि नावलौकिक मिळविलेल्या आदर्श कवींची मांदियाळी खूप मोठी आहे. केशवसुत, बालकवी, तांबे, बोरकर, शांताबाई शेळके, वसंत बापट, नारायण सुर्वे, शिंदे, प्रवीण दवणे आणिक प्रतिभावंतापैकी माझा आवडता कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ तात्या. ज्ञानपीठ आकार कुसुमाग्रज हे कवी होते त्याचप्रमाणे नाटक दार, निबंधकार, कथाकार, होते परंतु ते विशेष लोकप्रिय आहेत ते कवी आणि नाटककार म्हणून.

सर्वत्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना |
तिमिरातून तेजाकडे प्रभु आमचे आमुच्या ने जीवना ||

सर्वतमका शिवसुंदरला त्यांनी केलेली प्रार्थना ही त्यांच्या निर्मळ मनाची साक्ष देणारी अतिशय सुंदर अशी रचना आहे. कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी होते. खांडेकर म्हणतात आजच्या समाजाची असंतोषाचा जोलामुखी त्यांच्या कवितांतून नुसता धुमसत नाही, तो अग्गिरसाचा वर्षाव करीत सुटतो. त्यांच्या कविता समाजातील विषमता, अन्याय, अत्याचार याला विरोध करणारी आहे आणि त्याचबरोबर जीवनाचा एक आशावादी दृष्टिकोन व्यक्त करणारी आहे. कोलंबसाचे गर्वगीत ही कविता आजही प्रत्येक मानवाला मार्गदर्शक ठरते. ते म्हणतात

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
अनंत अमुची ध्यासकती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला

नाशिकला गोदावरी नदीच्या परिसरातील रंगछटा त्यांच्या कवितातून दिसून येतात. त्यांची प्रत्येक कविता अर्थपूर्ण, रसपूर्ण आणि अवेशपूर्ण आहे.

गरजू जयजयकार क्रांतीचा
गर्जा जयजयकार
कशास आई भिजविसि डोळे
उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल

ही कविता स्फूतीं देणारी, प्रेरणा देणारी जशी आहे तशीच ब्रिटिशांविरोधात ती असंतोष आणि भारताविषयी प्रेम व्यक्त करणारी आहे.

माणसाने संकटांशी सामना करताना हतबल होऊ नये, आत्मविश्वासाने तोंड घ्यावे ही दृष्ट देणारी ही अतिशय सुंदर अशी कविता आहे.

मोडून पडला संसार तरी
मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
नुसते लढ म्हणा.

अशा प्रकारचा जीवन वादी कविता मानवास मार्गदर्शक ठरतात त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. जीवनलहरी, विशाखा, समिधा, किनारा, वादळवेल वगैरे.

नाटकाच्या इतिहासात सुद्धा सुवर्णाक्षरांनी त्यांचे नाव कोरलेले आहे ते कुसुमाग्रज. शिरवाडकरांनी अनेक नाटके लिहिली. दूरचे दिवे, दुसरा पेशाव, विज म्हणाली धरतीला, आणि नटसम्राट अशी नाटके अतिशय लोकप्रिय झाली. आप्पासाहेब बेलवलकर एकेकाळचा नटसम्राट वयोवृद्ध झाल्यावर त्यांची झालेली अवहेलना ही मनाला चटका लावून जाते. आपल्या जन्मदात्या आईला विविध प्रश्नांतून विचारांना वाचारणार कण वाचकांचा मनाची घट्ट पकड घेतो. त्यांच्या प्रत्येक पात्र, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक संवाद, प्रेषक कांची दात घेऊन जातो. वैष्णवी, जानवी अशा कादंबऱ्या, सतारीचे बोल, फुलवाली, प्रेम आणि मांजर अशा प्रकारचे कथा संग्रह कुसुमाग्रजांच्या नावे आहेत.

कुसुमाग्रजांचे कोणत्याही साहित्यप्रकार एखाद्या विचार, एखादे जीवनमूल्य, एखादी जीवनदृष्टी देऊन जातो. त्यांच्या साहित्यात स्वतंत्रता, समता, बंधुता, मानवता, आत्मविश्वास, प्रेम, निसर्ग, होता दिसून येते, म्हणूनच ते श्रेष्ठ प्रतिभासंपन्न लेखक बनले.

इ.सन 1964 मध्ये मडगाव येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कुसुमाग्रज हे अध्यक्ष होते. मराठी साहित्य विविध साहित्य प्रकारांनी, विविध लेखक, कवींनी बहरलेल्या उपवनापमाने प्रमाणे प्रसन्न, टवटवीत आणि मोहक आहेत. त्या उपवनातील एक सुंदर मोरपिसाचा तुरा म्हणजे कुसुमाग्रज, सारस्वतांचा आदर्श म्हणजे कुसुमाग्रज असे हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेता माझे आवडते कवी 10 मार्च 1999 रोजी निधन झाले.

Leave a Comment