शिक्षक वर मराठी निबंध | Essay On Teacher In Marathi

शिक्षक वर मराठी निबंध Essay On Teacher In Marathi

प्रिय बाई तुम्ही हेही सांगितलं होतंत!

Essay On Teacher In Marathi प्रिय बाई! ‘प्रिय’ या शब्दातूनच तुमच्याबद्दलच्या माझ्या भावना माझ्या मनातील तुमचं स्थान व्यक्त होत नाही का? बाई म्हणजे खरंच बालपणातील ईश्वर बाई! माझ्या चिमुकल्या हृदयात चिमुकल्या विश्वात तुमचं स्थान अढळ आहे. बाई मला आठवतोय तो माझा शाळेतला पहिला दिवस. आईचं बोट सोडून मी त्या वर्गात आलो तेव्हा खूप भांबावलो होतो, रडलो होतो. कासावीस झालो होतो. तेव्हा बाई तुमच्या मायेनं माझ्यातील विश्वास प्रथम जागा झाला. अफाट शब्दसागरातील मोजकेच शब्द माझ्या सोबतीला होते. तुमच्यापाशी असूनही शब्दांचे भांडार त्यातील आमच्या योग्य शब्दांची रत्नेच तुम्ही देत होता. बोबडे शब्द आकारायला लागले. रंग, गंध, रस, स्पर्श, ध्वनी या पंचज्ञानेंद्रियांच्या संवेदना जागृत केल्या तुम्ही. सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला शिकवलंत. पक्ष्यांची अस्मानभरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर, हिरव्या डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं सारं काही तुमच्यामुळे उमगत गेलं. बोबडे बोल विरू लागले. त्या जागी स्पष्ट उच्चार, स्वच्छ वाणी, पाठांतर, शुद्ध बोलणे हे सारं तुम्हीच रुजवलंत. वाङ्मयाची अभिरुची वृद्धिगंत झाली. विचारांची कक्षा रुंदावली.

काल कळ्या, आज फुले झाल्या सगळ्या, कशा उमलल्या? कुणी हसविल्या?

हासत बसल्या कशा कळ्या? बाई सांगा मला सगळ्या

खरंच कालच्या ळ्या आज फुलल्या आहेत. हसत आहेत नि इतरांना आनंद, गंध देत आहेत. फुलण्याचं गुपित तुम्हीच सांगितलं होतंत.

आठवणींना उजाळा देताना आज अगदी मनात विचारांची गर्दी झाली आहे. अनेक प्रसंग आठवत मी पुन्हा भूतकाळात शिरत आहे. बाई तुम्ही आमच्या अनुभवाची क्षितिजं रुंदावली कशी त्यामुळेच आम्ही भूतकाळाचा मागोवा घेऊ शकलो. वर्तमानाशी संघर्ष करण्याची उमेद आमच्यात आली. भविष्यकाळाचा वेध घेऊ अशी जाणीव आम्हांला झाली.

मला नक्कल करायला खूप आवडायची. निरनिराळ्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज काढायचे, कुणाच्या चालण्याच्या बोलण्याच्या ढंगाचे अनुकरण करायचे हे सर्व पाहिल्यावर तुम्ही सांगितलंत अरे, तुझ्यात अभिनयाचे गुण आहेत. मग मला नाटकात सफाईदारपणे वावरायला तुम्हीच शिकवलंत. विनोद, कारुण्य, हास्य हे गुण जीवनात किती महत्त्वाचे आहेत हे त्याचमुळे उमगलं.

तुम्ही छोट्या, मोठ्या सहलींचे उत्तम आयोजन करायच्या. तुमचा ओसंडणारा उत्साह, आम्हांला उत्साही बनवायचा. सहलींच्या माध्यमातून तुम्ही आम्हांला निसर्गाच्या जवळ नेलंत. भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती सांगून स्थळमाहात्म्य लक्षात आणून दिलंत. आमच्या अनेक शंकांचं निरसन केलंत नि आमचं अज्ञान दूर करून प्रकाशाची कवाडे सतत उघडी करून दिलीत. स्वावलंबन, सहकार्य, सामुदायिक जीवन, नेतृत्व या प्रवृत्तींचा विकास साधलात.

“Madam, you are great because you inspires us.” शिक्षकी पेशा म्हणजे एक वसा आहे. घेतला वसा कधी टाकता येत नाही.

हे तुम्ही तुमच्या कृतीतून आम्हांला सांगितलंत. मार्क, अहवाल, परीक्षा या सर्व सुऱ्या आम्हांला धाक दाखवतात. जगण्यासाठी उपयोगी असं शाळेतून किती थोडं मिळतं, त्यासाठी तुमचा वाचनाचा असणारा आग्रह किती सार्थ होता हे आज पटतंय. तुम्ही सांगायचात वर्तमानपत्रं वाचलीच पाहिजेत. रोजचं राजकारण आणि बातम्या या दुसऱ्यांच्या दुःखांच्या कहाण्या आहेत आणि त्या तुमच्या नि आमच्या स्वार्थापेक्षा मोलाच्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी नापास झाल्यामुळे आत्महत्या केली अशा चिंतनीय बातम्या वाचल्या की, मला आठवतो एक प्रसंग.

Essay On Teacher In Marathi (600 words)

माझ्या वर्गातील धनंजय होता हुशार पण गणिताशी त्याचा छत्तीसचा आकडा. पेपर मिळाले, नेहमीप्रमाणेच तो गणितात नापास. त्यादिवशी मात्र तो हुंदके देऊन रडत होता. शाळा सुटली, सर्व घरी गेले. पण धनू मात्र घरी जायला तयार नाही. बाईंना ही गोष्ट समजली तेव्हा बाई धावत आल्या. त्यांनी धनूला शांत केलं. त्याची खंत समजून घेतली. धनूला होती सावत्र आई. ती धनुमधले दोष, उणिवा काढण्यासाठी टपलेलीच असायची. ती त्यावरून त्याला खूप बोलायची, हिणवायची, एवढ्यावरच तिचा दुष्टपणा थांबायचा नाही तर ती बाबांकडूनही त्याला शिक्षा करवायची. हे समजल्यावर बाईंची अस्वस्थता वाढली. त्यांनी प्रेमळ शब्दांत त्याला समजावले. अगदी किरकोळ मार्कांसाठी त्याच्या प्रगतिपुस्तकात लाल रेघ येईल नि त्याला शिक्षा, मनस्ताप भोगावा लागेल म्हणून बाईंनी त्याची ती लाल रेघ पुसून टाकली. त्याला गणितातील न समजलेली मूलभूत कृत्ये व उदाहरणे समजून दिली. त्यामुळे धनंजयचे आयुष्याचे गणित सुटले. बाई तुम्ही तेव्हा असे केले नसते तर कदाचित प्रगतिपुस्तकात खाडाखोड करून गुण वाढविण्याचा गुन्हा त्याच्या हातून घडला असता. आईच्या धाकाने घर सोडून वाममार्गाला लागला असता. कदाचित वर्तमानपत्रातील ‘मुलाची आत्महत्या’ ही बातमी वाचून केवळ हळहळ व्यक्त झाली असती. बाई तुम्ही सगळ्यांनाच ममतेनं वागवलंत. पण लाडावून नाही ठेवलंत. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं हेही सांगितलं होतंत. आमच्या अंगी बाणवलंत अधीर होण्याचं धैर्य. शिकवलंत धरायला धीर. त्यासाठी जागवलात दृढविश्वास नि श्रद्धा. चिमुकल्या जीवांना समजून घेतलंत. आमच्यातील चांगल्या गोष्टी शोधून काढल्यात. आमचं मानसशास्त्र तुम्ही जाणून घेतलंत. केवळ प्रस्थापित समाजातल्या लोकांनी लिहिलेलीच पुस्तकं नाही शिकवलीत. तुम्हांला ओळींमधल्या कोऱ्या जागा वाचता आल्या.

तुम्ही एक शिक्षक. शिक्षण हा तुमचा स्वधर्म विद्यार्थी हेच तुमचं दैवत, शाळा हेच तुमचं मंदिर, धडपड ही तुमची पूजा. दुरितांचे तिमिर जावो ही तुमची प्रार्थना. समाजाचा आशीर्वाद हाच तुमचा प्रसाद. खांडेकरांचं एक वाक्य मला याक्षणी आठवंतय. “जगाचा कधी काळी उद्धार झाला तर तो शिक्षकांमुळेच होईल.” यासाठी बाई सारेच शिक्षक तुमच्यासारखे कधी होतील? कधी समजेल साऱ्यांना, “प्रत्येक मूल असते एक आकाश. त्याच्या पावलात असते एक नवी दिशा. प्रत्येक मूल असते एक संपूर्ण स्वातंत्र्य.” बाई तुम्ही वक्तृत्व कलेचे धडे गिरवून घेतलेत त्यामुळे कुठल्याही विषयाची मांडणी, उच्चार, उभे राहण्याची पद्धत, आपले मुद्दे उठावदारपणे मांडण्याची रीत याबद्दल कसून तयारी करून घेतली. सभाधीटपणा, ओघवती शैली, स्पष्ट शब्दोच्चार, हे

वक्तृत्वगुण लहानपणीच आत्मसात केले जातात. म्हणूनच आज आम्ही घडलो. सुटीत आम्हांला छोटासा व्यापार करायला शिकवलात. तेव्हा तुम्ही सांगितलंत, घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन यांचा वस्तुपाठच दिलात.

Essay In Marathi On Teacher

शाळेत गुंडप्रवृत्तींच्या मुलांना आम्ही खूप घाबरायचो तेव्हा तुम्ही धीर दिलात नि सांगितलंत, गुंडांना भीत जाऊ नको कारण त्यांना नमवणं सर्वांत सोपं असतं. त्यांना अद्दल घडवावी, पण भल्यांशी भल्यानं वागायला हवं. हृदयाचा आणि आत्म्याचा धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा कर. जे सत्य आणि न्याय्य वाटते त्याचसाठी पाय रोवून लढत राहा. ऐकावं जनाचं, अगदी सर्वांचे, पण गाळून घ्यावं ते मनाच्या चाळणातून आणि फोलकटं टाकून निकस तेवढंच स्वीकारावं.

नेहमी आनंदी राहा व इतरांना आनंदित करा हे तुम्हीच सांगितलं होतं. बाई सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात, सगळीच सत्यनिष्ठ नसतात. स्वार्थी, राजकारणी, धूर्त जसे असतात, तसं अवघं आयुष्य समर्पित करणारेही असतात. जसे असतात टपलेले वैरी तसेच असतात नाती जपणारे मित्र. हे सारं तुम्हीच सांगितलं होतंत.

क्रीडा, नाट्य, वक्तृत्व ही जीवनाचीच अंगं. साऱ्या स्पर्धांतून भाग घ्यायला लावतात नि त्यानिमित्त हार, जीत कशी स्वीकारावी हे शिकवतात. आनंदही संयमाने व्यक्त करायला नि द्वेष, मत्सरापासून दूर राहायला शिकवतात.

खरंच बाई कितीही सांगितलं तरी तुम्ही सांगितल्याची यादी संपायची नाही.

“सातवार वा शतदा जन्मून फिटायचे का ऋण हे हातून, आनंदाने माथा वाहीन तेच मला भूषण.”

Essay On Teacher In Marathi Download

 

 

Download File

Leave a Comment