राजकीय नेते आणि राष्ट्रीय एकात्मता
माझा हिंदुस्थान माझा माझा हिंदुस्थान
हिमाचलचे हिरकमंडीत शीरभूषण भरदार
वृक्षावर गंगायमुनांचे रूळती मौक्तिकहार
कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार
महोदधिचे चरणाजवळी गर्जतसे आव्हान
आदरणीय व्यासपीठ, गुरुजन, पालक आणि मित्र-मैत्रिणींनो, कविवर्य कुसुमाग्रजांचे हे काव्य सुरुवातीस यासाठी म्हटले की, सध्या तुम्ही आम्ही सर्व बधीर झालो आहोत. कविवर्य कुसुमाग्रजांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले हे भारतभूचे वर्णन ऐकताना आणि वाचताना अंगावर सुखाचे रोमांच येतात आणि भारतभूमीत जन्माला आल्याबद्दल मान गवने उंच होते. परंतु आज जर आम्ही आमच्या भारतभूमीचा विचार करू लागलो तर गवनि उन्नत झालेली आमची मान शरमेने खाली घालावी लागेल की काय? असे वाटते.
अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात दिली आणि भारतभूच्या पायातील पारतंत्र्याच्या श्रृंखला गळून पडल्या पण स्वातंत्र्याचा निर्व्याज आनंद. तेच मुळी भारत आणि पाकिस्तान दोन देश करण्याच्या अटीवर भारतमातेची दोन शकले झाली आणि तिथेच आमच्या राष्ट्रीय सुरुंग लागला आणि हा सुरुंग लावण्यात पुढाकार घेतला इंग्रजाबरोबर बॅ. जिनासारख्या राजकीय पुढान्यांनी आणि नाईलाजाने का होईना महात्मा गांधी यांना याला कबुली द्यावी लागली. तेव्हा वेगळा झालेला हा पाकिस्तान आजही शत्रू बनून आमच्या एकात्मतेला धक्का पोहचवू पाहात आहे.
हिंद देश के निवासी सभी जन एक है
रंग रूप वेश-भाषा चाहे अनेक है।
असे म्हणून एकात्मतेच्या गप्पा मारणारे आमचे नेते प्रत्यक्ष एकात्मता नांदावी म्हणून काहीच काहीच प्रयत्न करताना दिसत नाहीत. राज्यकारभार सुरळीतपणे चालवता यावा म्हणून पंडित नेहरूंनी भाषावार प्रांतरचना केली पण त्याचा परिणाम उलटच झाला. प्रत्येक प्रांत आणि नेते आपलाच स्वार्थ पाहू लागले. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न, पंजाब प्रश्न, आसाम प्रश्न असे प्रश्न निर्माण झाले हे प्रश्न सोडविण्याचा आभास सत्तेवर असणारे नेते नेहमीच करत होते आणि सामान्य जनता त्याला भुलत होती. आमचे नेते तेल घालून हे प्रश्न जळत ठेवण्याचा प्रयत्न अगदी प्रामाणिकपणे करीत होते.
एकीकडे समान नागरी कायद्याचा बोलबाला होत होता तर त्याच वेळी मूठभर मताच्या अल्पसंख्यांकांना डोक्यावर घेऊन त्यांचे लाड चालले होते. मतांच्या गळ्यासाठी यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोचत आहे, हे या नेत्यांना दिसत नव्हते का? आज अतिशय ज्वलंत स्वरूपात गाजत असलेला प्रश्न म्हणजे रामजन्मभूमी बाबरी मशिद, ज्या ठिकाणी गेली कित्येक वर्षे फक्त शमाचीच पूजा केली जाते. कोणत्याही सामान्य मुस्लिम बांधवांना काडीचा रस नसलेल्या या वादाचा उपयोग करून स्वतःचा राजकीय स्वार्थी साधण्यासाठीच केवळ हा प्रश्न आमच्या राजकीय नेत्यांनी चिपळत ठेवला. ही आमच्या राजकीय नेत्यांच्या करंटेपणाची परमावधी आणि भारताच्या दुर्दैवाची परिसीमा आहे. इतकेच नव्हे तर फक्त राजकारणात पुढगूस घालून आमचे नीव राजकीय राजकीय स्वार्थ साधले जाऊ लागले आणि भष्ट्राचाराच्या पैशातून आमची राष्ट्रीय एकात्मता विकली गेली. माओ त्से तुंग चीनचा सर्व्हेसर्वा भारतीयांबद्दल बोलताना म्हणाला होता भारताला जिंकणे अतिशय सोपे आहे. कारण भारतातील प्रत्येक व्यक्ती खरेदली जाते. तर चर्चिल सांगितले होते की, स्वातंत्र्य कसे मिळवावे हे या भारतीयांना कळले असले तरी ते कसे टिकवावे हे या कधीच कळणार नाही. हे उदगार ऐकून संताप-संताप आला .तरी ही वस्तुस्थिती आहे. हे सत्य कटू असले तरी स्वीकारलेच पाहिजे.
सामान्य माणसातूनच नेते निर्माण होतात. देशनिष्ठा सामान्यातच रुजवली पाहिजे, बिबवली पाहिजे. स्वाथनि बरबटलेली राजकीय नेत्यांची ही पिढी काही अमरपट्टा घेऊन आली नाही; परंतु सामान्यातही एकात्मता बाणविण्यात आम्ही कमी पडलो आहोत. कर्नाटकातील एका शाळेतील विद्यार्थ्याला भारत माता की जय ही घोषणा माहीतच नसावी! हिंदुस्थानात राहणाऱ्या मुस्लिमांनी हिंदुस्थानचे राष्ट्रगीत म्हणण्यास नकार द्यावा आणि त्यांचे म्हणणे रास्त असल्याचे न्यायाधीशांनी सांगावे वाला फाशी का देऊ नये? हिंदुस्थानचे संविधनात्मक कायदे पाळण्याला मुस्लिमांनी नकार द्यावा आणि आमच्या राजकर्त्यांनी त्यांना तशी परवानगी द्यावी. आमच्या या नपुंसक राज्यकत्यांमुळेच आज पाकिस्तान वाटेल ते धाडस करू पाहतोय. प्रशिक्षित अतिरेकी भारतात पाठवून भारताच्या शांततेला सुरंग लावला जातोय, गर्दसारख्या पदार्थाचे नवीन पिढीला व्यसन लावून भारताचे भवितव्य अंधकारमय करू पाहातोय आणि हे सगळ पेटत असताना आमचे राज्यकर्ते हर्षद मेहताला पाठीशी घालण्यात गुंग आहेत, दाऊद इब्राहिमला मदत करण्यात गुंतले आहेत. असं वाटत आज हवे होते. शिवाजी महाराज खच पडला असता प्रेतांचा टकमक टोकाखाली. पण तेवढा पुरुषार्थ एकाही राजकीय नेत्यांत नाही. न पेक्षा वाजपेयींसारखा विचार दूरदर्शनवरून राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणायला आम्ही राजकीय नेतेच कारणीभूत आहोत, अशी जाहीर कबुली देता झाला नसता.
सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा
हम बुल बुले है इसकी ये गुलीस्ताँ हमारा
असे वर्णन करणाच्या इकबालला ही बुलबुले नसून गिधाडे आहेत याची जाणीव असती तर हे गीत लिहायला तो धजावलाच नसता. आज भारतावर कोट्यवर्धीचे कर्ज आहे. भारतातील एकही नागरिक सुरक्षित नाही. ६२% लोक बेकार आहेत ४६९६ लोकांना राहायला घरे नाहीत. अशा परिस्थिती आपल्या राजकीय नेत्यांचे परदेश दौरे सुखेनैव चालू आहेत. विविध धर्म-जाती, चालीरिती, संस्कृती है वरदान न ठरता शाप ठरत आहेत आणि या शापाचे धनी आहेत आमचे राजकीय नेते यांच्या स्वार्थाची परिसीमा अशी की, आपली ही पापे झाकली जावीत व जनसामान्यांना त्याकडे पाहायला सवडही मिळू नये म्हणून महागाईच्या ओझ्याखाली त्यांना दबवून टाकले जाते.
बर्फाचे तट पेटून उठले
सदन शिवाचे कोसळले.
रक्त आमुच्या प्रिय आईचे
शुभ्र हिमावर ओशाळले.
अशी भारतमातेची अवस्था आहे. या राज्यकर्त्यांनी वेळेवर शहाणे व्हावे नाहीतर एकवेळ अशी येईल, तुम्हाला, मला सान्या सामान्य भारतवासियांना हातात शस्त्र घ्यावे लागेल आणि गल्लीपासून दिल्द्वीपर्यंत दिसेल्ल या नीतिभ्रष्ट राजकीय नेत्यांचा शिरच्छेद करावा लागेल.