bharat Maza Desh nibandh in Marathi
माझा हिंदुस्थान, माझा, माझा हिंदुस्थान
हिमाचलाचे हीरक मंडित शिरभूषण भरदार
वक्षावर गंगा-यमुनांचे सळती मौक्तिक हार
कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार
महोदधीचे चरणाजवळी गर्जतसे आव्हान
माझ्या भारतभूचे हे वर्णन ऐकताना रोम-रोम फुलून येते आणि निसर्गाच्या या मुक्त लावण्याबरोबरच गिरी शिखराचे आणि महासागरांचे आव्हान नजरेसमोर ठाकते. भारताच्या नावाबरोबरच मला आठवते ती माझ्या देशाची अनेकविध परंपर वीरता, संस्कृती आणि पावित्र्य यांचा मनोहर संगम इथं विनयाच्या कोंदणात शौर्य खुल तर लाजन्या स्मितातून शालीनता खुलते शृंगाराबरोबर वीरता आणि विविधतेतून एकता हे माझ्या देशाचे रमणीय रूप आहे.
माझ्या देशाची संस्कृती संपूर्ण विश्वात वंदनीय, पूजनीय आहे. म्हणूनच स्वामी विवेकानंदांची My Broth ers and Sisters ही हाक सान्या धर्म मार्तंडाचे काळीज काबीज करून गेली.
माझ्या देशावर निसर्गाने आपले लावण्य मुक्त हस्ते उधळले आहे. जणू सृष्टीचा लावण्य महोत्सवच उत्तुंग हिमगिरी, नजर फिरेल अशा खोल दऱ्या, खळखळ करणाऱ्या नद्या, डुलणारी हिरवी शेते, तहतऱ्हेची मनोहर फुले आणि पावला-पावलाला बदलणारी अनेक मनोहर दृश्ये निसर्गाचे हे मुक्त लावण्य जगाच्या पाठीवर कुठेही नाही, इंद्रधनुचे सात रंग, मोरपिसांची मोहक रंगसंगती यांचा सुरेख लावण्यविलास फक्त माझ्या देशातच पाहायला मिळतो.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी उन पडे. हे फक्त माझ्या देशातच शक्य आहे. निसर्गाच्या या मुक्त लावण्यात आणखी एक रंग मिसळला आहे लाल, तो रंग आहे रक्ताचा. स्वधर्म, स्वदेश यांच्यासाठी ज्यांनी या धरणीवर आपले रक्त सांडले तो रक्ताचा लाल रंग माझ्या देशातील त्यागाची महती सांगतो. सम्राट अशोक, अकबर, छत्रपती शिवाजी, कृष्णदेवराय, राणा प्रताप या महापराक्रमी राजांनी माझ्या देशाचा इतिहास आपल्या रक्तांनी रंगवला आहे आणि माझ्या देशाची संस्कृती त्यागाची आहे. भोगाची नाही हे सिद्ध केले आहे.
संस्कृती, संस्कृती असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला एक अर्थ आहे. हा अर्थ प्रकृती, विकृती आणि संस्कृती या तीन शब्दाधारे व्यक्त करता येतो. भूक लागली असता खाणं ही प्रकृति, भूक लागली नसताना खाणं ही विकृती आणि आपल्यापेक्षा दुसऱ्याला याची अधिक गरज आहे हे पाहून त्याला खायला घालणं ही संस्कृती, आणि हीच आमची संस्कृती आहे. म्हणून तर ‘अतिथी देवो भव’ हा महामंत्र आम्ही जपला आहे.
यजमानाचा धर्म आणि अतिथीचे स्वागत हे आमच्या संस्कृतीचे दोन स्तंभ आहेत. आमच्या संस्कृतीची शालीनता, पावित्र्यता जपण्यासाठी आमच्या स्त्रियांनी सुद्धा आपले सर्वस्व पणाला लावले आहे, म्हणून तर
अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा
पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशनम्
असे आम्ही म्हणतो. आपल्या शालीनतेने जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या आमच्या स्त्रियांनी आपल्या शौर्यानिटी जगाचे डोळे दीपवले आहेत. राणी लक्ष्मी, राणी चन्नम्मा, जिजाऊ, अहिल्या होळकर, ताराराणी या स्त्रियांनी आपल्या डोईवरचा पदर तसूभरही न हालवता हातात तलवारी घेतल्या आणि शालीनता, पावित्र्य याचबरोबर रणचंडिकाही जगाला पाहायला मिळाली. हे फक्त माझ्या देशातच घडू शकते.
माझ्या देशाची ही संस्कृती, ही परंपरा सान्या जगात श्रेष्ठ आणि जेष्ठ आहे. हे मी अभिमानाने सांगते. रामाचा त्याग, लक्ष्मण, भरताचे बंधूप्रेम, हनुमानाची स्वामिनिष्ठा, सीतेची पतीनिष्ठा, अर्जुनाचे शौर्य, भीमाची ताकत आणि कृष्णाचे कर्मयोग हे फक्त माझ्या देशातच निर्माण झाले. राम कृष्णाची परंपरा, शिवाजी, राणाप्रतापचा इतिहास ही माझ्या देशाची श्रद्धास्थाने आहेत. शंकराचार्य, रामशास्त्री, भवभूती, कालिदास, व्यास, वाल्मिकी, राजाभोज, शाहू महाराज भगतसिंग, म. गांधी, नेहरू, सावरकर, टिळक यांच्या पासून ते ज्ञानेश्वर, तुकाराम केशवसूत, कुसुमाग्रज यांच्यापर्यंतची अगणित अनमोल रत्ने केवळ माझ्या देशाच्या मातीतच जन्मली. हा माझ्या देशाचा तर गौरव आहेच. पण त्याहीपेक्षा त्या व्यक्तींचा गौरव जास्त आहे ज्यांना भारतभूसारखी मातृभूमी लाभली.
अंतराळात आज आमची विमाने भिरभिरताहेत, आमच्या पाणबुड्या सागरतळाचा शोध घेताहेत. आमचे डॉक्टर नवनवीन औषधे शोधण्यात मग्न आहेत, आमचे शास्त्रज्ञ मानवाचे जीवन अधिकाधिक सुखी करण्यात प्रयत्नशील आहेत. आमचे खेळाडू देशाचा ध्वज आंतरराष्ट्रीय सामन्यातून अभिमानाने उंचावत आहेत. आमची मुस्लिम, शिख भावडे आमच्या हातात हात घालून चालण्याचा प्रयत्न करीत आहेत, आमच्या सत्ताधारी पक्षाने व विरोधी पक्षांनी आमच्या देशातील लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत ठेवली आहे.
म्हणूनच नेहरूंसारखा पुरुषोत्तम या देशाच्या मातीतच आपली रक्षा विसर्जित व्हावी अशी इच्छा बोलून दाखवतो. तर भगतसिंगसारखा तेजस्वी युवक हसत-हसत फासावर जाताना पुनर्जन्म जर असेल तर तो मला भारतभूमीतच मिळावा, अशी आस मनी बाळगतो. स्वातंत्र्यसूर्य सावरकर ने मजसी ने परत मातृभूमीला’ अशी त्या सागराला विनवणी करतात. तर इकबालसारखा एखादा कवी ‘हिंदी है हम, वतन है हिंदोस्ताँ हमारा’ अशी जाहीर कबुली देऊन माझ्या देशाला मानवंदना देतो. माझ्या देशाचा तिरंगा आपल्या तीन रंगाने विविधतेतून एकतेबरोबरच आमची त्यागाची शांततेची आणि समृद्धीची प्रतिमा आसमानापर्यंत उन्नत मानेनं सांगतो आहे.
माझ्या देशाच्या या सान्या ‘सत्य, शील, सुंदरतेला दृष्ट लागू नये म्हणून हत्याकांडाचे भ्रष्टाचाराचे गालबोट लागले आहे. हे गालबोट जोपर्यंत चेहऱ्यावरील तिळाच्या रूपात असते तोपर्यंत ते सौंदर्यतील ठरते. पण हे गालबोट जर साऱ्या सौंदर्यावर पसरले तर या सुंदरतेची कुरुपता व्हायला वेळ लागणार नाही. हे लक्षात ठेवायच तुम्ही आम्ही सान्यांनी ज्यांना तिरंगा पाहताना भरून येतं त्यांनी.
म्हणूनच मित्रांनो चला, तुम्हाला खळाळणाच्या सागराची आण, तुम्हाला या भूमीच्या कणाकणांची शपथ माझ्या देशाची ही गौरवशाली परंपरा, त्या परंपरेचे आपण पाईक आहोत. म्हणूनच आपण एकमुखाने म्हटले
गे माय भू तुझे मी
फेडीन पांग सारे
आणीन आरतीला
हे सूर्य, चंद्र, तारे