असे शेजारी बको रे देवा | Ase sejari bako re deva story in marathi

Ase sejari bako re deva story असे शेजारी बको रे देवा !

“निंदकाचे घर असावे शेजारी”, असे तुकाराम महाराज म्हणून गेले खरे! पण एक तर त्यांचे शेजारी चांगले असावेत किंवा आमच्या शेजान्यांसारखे नसावेत. त्यामुळेच तुकाराम महाराज असे म्हणू धजले असावेत आणि त्यातल्या त्यात निंदकाचे पर शेजारी असेल तर चालेल. पण छंदकाचे पर शेजारी नकोच नको. अहो काय हाल होतात म्हणून सांगू.

आमच्या शेजारी राहतात श्री. कूळबुडवे हं हा. हे त्यांच्या द्योतक नसून त्यांचे आडनाव आहे आणि अर्थात या आडनावाचा त्यांच्या पराक्रमाशी नक्कीच संबंध असणार. हे त्यांच्या सध्याच्या वागणुकीतून दिसतेच आहे. या कुळ बुडव्यांना छंद आहेत. एक नव्हे अनेक छंद आणि छंदामुळे मानवी जीवन सार्थकी लागते असे त्यांचे ठाम आणि कायमचे मत आहे. पण त्यांच्या छंदामुळे इतरांच्या जिवाला धोका होतो. याचा त्यांना विचार करावासा वाटत नाही. कुळबुडव्यांना एक छंद आहे साप बाळगण्याचा. त्यांच्या घरात पावलागणिक साप वळवळत असतात. अन् गुलाबाच्या ताटण्यातून चालावे तसं ते चालत असतात. कितीही काळजी घेतली तरी खट्याळ पोर जसे आईचा डोळा चूकवून बाहेर पळतात. तसे हे साप कुळबुडव्यांचा डोळा चूकवून बाहेर पळतात आणि आमच्या घरात येतात. एकदा तर दोन नाग ६ तास आमच्या घरात ठाण मांडून बसले होते आणि ते ६ तास मीसिलिंग फॅनला लोंबकळत होतो. मला वाटलं ६ तास लोंबकळण्याचा हा माझा विक्रम ग्रिनिज बुकात नोंदवावयाला हवा.

कूळबुडव्याचा दुसरा छंद म्हणजे गाण्याचा, आता तुम्ही म्हणाल गाण्याचा छंद हा का वाईट आहे ? अहो तुम्हाला अनुभव नाही म्हणून तुम्ही अस म्हणताय लताचं गाणं ऐकणं आणि कूळबुडव्याचा गाण ऐकण म्हणजे जमीन-आस्मानचा फरक आहे. कुठं तो लताचा स्वर्गीय आवाज आणि कुठं कुळबुडव्यांचा रिकाम्या पत्र्याच्या बादलीत खराटा पासल्यासारखा आवाज आणि अव्याहत दिवसातले १४ तास कुळबुडवे गान असतात. अहो त्या नाग- सापांच्या भीतीने रात्री झोप येत नाही आणि कुळबुडव्यांच्या गाण्यात दिवसा! अगदी हैराण झालोय मी.

कुळबुडव्यांच्या या दोन छंदातून बचावलेला माझा उरला सुरला जीव वाचवून मी कसा तटी तग धरून राहतो आहे तोवर आणखी एक छंद कूळबुडव्यांनी लावून घेतलाय म्हणे. डिंक करायचा आणि या छंदाला ते ‘स्मॉल केज ‘इंडस्ट्रिज’ असं मोठं नाव देतात. मित्रांनो माझ्या घरी आलात तर जरा पायाखाली बघूनच या आणि या डिंकाच्या रस्त्यातून सुटून माझ्या घरी आलात आणि भिंतीला किंवा खुर्चीला चिकटलेला मी दुर्दैवी जीव पाहिलात तर हस् नका? ही किमया आमचे शेजारी कूळबुडवे यांचीच आहे. हे ओळखून माझ्या मदतीला धावा.

वाचवा वाचवा
कुणीतरी वाचवा
जीव वाचविण्याची कुणी
युक्ती मला सुचवा छंदकांचे घर असा हा शेजार
खरंच सांगतो मित्रांनो
या शेजान्यामुळे मी झालोय मात्र बेजार

Leave a Comment