स्वातंत्र्यपूर्व पिढी-स्वातंत्र्योतर

स्वातंत्र्यपूर्व पिढी-स्वातंत्र्योतर पिढी

कर चले हम फिदा

जान औ तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों

असं विश्वासाने म्हणत स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचं समर्पण केलेली पिढी हळूहळू स्वराज्य पटलावरून अस्तांगत झाली आणि नव्या पिढीचा नवीन जोश कसा असेल याचा सर्वजण विचार करू लागले. सन्माननीय परीक्षक आणि स्पर्धक मित्रांनो स्वातंत्र्यपिढी आणि स्वातंत्र्योत्तर पिढी या विषयाचा विचार करताना मला आठवला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सावरकर, टिळक, नेताजी एक ना अनेक विष्णुसहस्र नामांची नामावली लगेचच संपेल. पण स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्यांची ही यादी ४७ वर्षांच्या कालावधीची मिनिटं केली तरी अपुरी पडतील इतकी मोठी आहे. त्यातील ज्ञात किती आणि अज्ञात कितीतरी!

एक उत्कट ध्येयानं पछाडलेली. एका अमूर्त ध्यासानं भारावलेली अशी स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढी होती. या पिढीत राजे-रजवाड्यांच्या उन्मुक्त विलास पाहिला होता, अनुभवला होता. इंग्रजांचे अन्वित अत्याचार पाहिले होते, सहन केले होते. पारतंत्र्याची, गुलामगिरीतील अवहेलना त्यांनी पुरेपूर उपभोगली होती आणि कोणतीही किंमत देऊन ते मिळविण्याचा अथक प्रयत्न त्यांनी केला.

स्वातंत्र्यपूर्व पिढीचा विचार करू जाता एकाच ध्येयाप्रत पोचणान्या अनेक वाटातील चालणारे हे प्रवासी होते. असे दिसून येईल. आपल्या ध्येयाबद्दल त्यांची निश्चित अशी प्रतिमा होती निश्चित असे विचार होते आणि निश्चित असा मार्ग होता. या वाटानी चालणाऱ्या प्रत्येकाचे प्रयत्न प्रामाणिक होते. प्रत्येकाला एकच ध्यास होता. स्वतंत्र भारताचा पण प्रत्येकाचा मार्ग भिन्न-भिन्न होता. गांधीजींसारखा महात्मा, नेहरू, सरोजिनी नायडू इ. सारख्या अनुयायांना बरोबर घेऊन अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने स्वातंत्र्याप्रत पोहोचू पाहता होता तर टिळक, गोखले इ. महापुरुष घणाघाती भाषणातून आणि जहाल लेखातून जनतेला स्वातंत्र्यासाठी उधुक्त करीत होते. सावरकारां सारख्या तेजस्वी पुरुष अभिनव भारताची चळवळ स्थापून इंग्रजांना ‘दे माय धरणी ठाय करीत होते; सुभाषबाबूसारखा शूर सेनानी सैनिकीकरणाचे महत्त्व ओळखून लढवय्यांची फौज तयार करून इंग्रजांशी सामना करण्यास सिद्ध झाला होता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेडानं झपाटलेली भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, मदनलाल धिंग्रासारखी कोवळी पोर वंदेमातरम् म्हणत हसत फासावर चढत होती आणि मृत्युंजय ठरत होती. तर चाफेकर बंधू इंग्रज अधिकाऱ्यांना संपविण्याच्या वेडानं झपाटले होते. सारं सारं कस भाल्यासारखं. सगळं वातावरण कसं त्यागाने आणि देशप्रेमात भरलेल, तिथं वैयक्तिक स्वार्थ, जातिभेदाचे गलिच्छ राजकारण, सत्ता स्पर्धा यासारख्या गोष्टींना जराही वाव नव्हता.

“तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण”

ही प्रत्येकाची प्रतिज्ञा होती. ही विलक्षण जिद्द, हा असीम त्याग पाहून ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्यही लागला आणि तो सुदिन उगवला. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. कर्तव्यपूर्तीच्या भावनेनं अनेकांनी सुस्कारा टाकला. आपल्या प्रयत्नाला आलेले यश पाहून सुखावलेली मने, स्वराज्यानंतर आता सुराज्याची स्वप्ने पाहू लागली. स्वातंत्र्यानंतर फाळणीचा दंगा सोडला तर पहिली काही वर्ष ही स्वप्ने खरी होतील असा विश्वासही वाटू लागला. पं. जवाहर नेहरू, वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भारत सुखानं नांदेल असे दिसू लागले. पण हाय रे दैवा. स्वातंत्र्यानंतर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाबरोबरच मनामनात स्वार्थ जागू लागला. सत्तेच्या हव्यासापायी सत्ता लोळमपता सुरू झाली. पैशाचा स्वार्थ कळसाला पोचला. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यात लोक धन्यता मानू लागले. गरिबांना देऊ केलेली मीठ-भाकरी त्यांच्यापर्यंत पोहोचेना आणि अशातच भ्रष्टाचार नावाचा एक नवीन शिष्टाचार देशात सर्वसंमत झाला. हा भ्रष्टाचार मग आपल्याबरोबर काळापैसा नावाचा विषारी नाग घेऊन आला आणि हिंदुस्थानच्या स्वतंत्र हिंदुस्थानच्या न्हासाला सुरुवात झाली.

कसलंही उत्तम ध्येय डोळ्यासमोर नसलेली, कोणतेही आदर्श नसलेली एक नवीन जात नव्या पिढीच्या रूपानं हिंदुस्थानात जन्माला आली. स्वार्थ हा त्यांचा धर्म होता. भ्रष्टाचार ही संस्कृती होती. काळा पैसा हा परमेश्वर होता. सत्ता मिळवणे हे ध्येय होते. आमच्या स्वतंत्र हिंदुस्थानला लागलेली ही कीड होती. विज्ञान क्षेत्रात प्रगती करणाऱ्या हिंदुस्थानात भ्रष्टाचाराचीही नवीन तंत्र अस्तित्वात आली. काळ्या पैशाच्या उपलब्धतेसाठी नवीन शोध लागले. निवडणूक हा त्यातला सर्वात वैध आणि सोपा मार्ग ठरला. सरकारी कचेन्या, न्यायालये, शिक्षणसंस्था, सामाजिक संस्था, विवाहसंस्था, वैद्यकीय क्षेत्र अशा सर्व क्षेत्रांत हा स्वार्थ आणि भ्रष्टाचार हातात हात घालून सर्वत्र वावरू लागले. पैसे मिळविण्याचे सोपे आणि सुलभ मार्ग निर्माण झाले आणि श्रमांची प्रतिष्ठा गेली. या विषारी विळख्यात सापडलेली ही स्वातंत्र्योत्तर काळातील पिढी इंग्रजांच्या वरताण करून देशाला लुबाडण्यात स्वतःला धन्य मानू लागली. अहिंसा हा ज्या देशाचा पाया होता, धर्मनिरपेक्षता हा ज्याचा दावा होता तिथे धर्माच्या नावाखाली हिंसेचा कल्लोळ उठू लागला. त्यागाच्या आणि देशप्रेमाच्या भावनेनं जिथे पूर्वजांनी आपले रक्त सांडले तीच माती आता स्वार्थाच्या आणि धर्माच्या नावाखाली होणाऱ्या रक्तपातात रोज भिजू लागली. महागाईचा अतिरेक, वाढती बेकारी आणि भ्रष्टाचारी राज्यकर्ते यामुळे सामान्य जनता त्रासून गेली. मित्रहो, सासूने सासरवास केला तर सामू आहे म्हणून छळते असे म्हणता येईल. पण आईनेच सासुरवास केला तर सांगावे कोणाला? इंग्रजांनी केलेला अत्याचार आणि हत्याकांड परवडले कारण ते परकीय होते. पण इथं आमच्याच देशात आमचेच स्वकीय दिवसा ढवळ्या हत्याकांड करू लागले. कुणी कुणाला आणि कसा जाब विचारायचा? ज्या देशाचा पंतप्रधान सुरक्षित नाही त्या देशातील सामान्य माणसाला अभय कोण देणार? शिक्षणाचा प्रसार झाला, औद्योगिक क्षेत्रात हिंदुस्थानने बाजी मारली, अन्न-धान्याचे परालंबित्व संपले. हे सगळे खरे असले तरी ढासळलेली नैतिकता, लयाला गेलेली संस्कृती ही स्वातंत्र्यपिढीची दोन प्रमुख लक्षणे ठरली आणि अजूनही गांधी, टिळक, आंबेडकर यांचे जन्मदिन साजरे करतो. लाज वाटली पाहिजे आम्हाला त्यांचे वारस म्हणवून घेताना. पण ही लाजसुद्धा आम्ही को आहोत. स्वतंत्र देशात जन्माला येण्याचे भाग्य जरी आम्हाला लाभले असले तरी ते स्वातंत्र्य निष्कलंक ठेवण्याची आम्हाला नाही. स्वार्थाने बजबजलेली ही स्वातंत्र्योत्तर पिढी पाहिल्यावर असं वाटतं की, पुन्हा एकदा इंग्रजांना बोलवावं. गुलामीच्या नरकात या पिढीला ढकलावं. म्हणजे मगच स्वातंत्र्याची किंमत त्यांना कळेल आणि पुन्हा एकदा सगळा स्वार्थ, भ्रष्टाचार विसरून गुलामगिरीतून बाहेर येण्यासाठी आम्ही एक होऊ नाहीतर –

लाख सूर्याच्या मशाली

पेटल्या होत्या जरी

मार्ग काटेरी सरेना

पाऊले रक्ताळली

हेच आपल्या नशिबी येईल.

Download File

Leave a Comment