नेताजी सुभाष चंद्र बोस भाषण
तुम मुझे खून दो
मैं तुम्हे आजादी ढुंगा ।
सुभाषबाबूंनी आव्हान फेकलं आणि हजारोच्या उत्साही जमावाने त्यांना उस्फूर्त प्रतिसाद दिला. एक उत्तम प्रशासक, एक तेजस्वी सैनिक आणि एक ज्वलंत स्वातंत्र्यसेनानी असं सुभाष बाबूंचं रूप भारताच्या इतिहासात अजरामर ठरलं आहे. गांधी-नेहरूंच्या मूर्तीपुजेमुळं आज किंचित दुर्लक्षित झालेलं सुभाषबाबूंचे चरित्र आणि चारित्र्य आजच्या ध्येयशून्य युवकांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखं युग. तेवढं एकच होतं सुभाषबाबूंच युग, आझाद हिंद सेनेचे युग. कारण त्या युगात होती ती ज्वलंत देशभक्ती, त्या युगात होतं ते अन्यायाचं परिमार्जन, एका बाजूला म. गांधींसारखे थोर नेते अहिंसेच्या मागनि स्वातंत्र्यदेवतेपर्यंत पोचू पाहात होते स्वतःच्या शरीराला उपवासाने कष्ट देऊन सारा देश वाकवू पाहात होते. सन्मार्गावर वळवू पाहत होते. अशा या शांत जलशयात, अहिंसेच्या त्या मंद वातावरणात एक झंझावात उठला. एक वादळ घोंघावत आलं आणि स्वतःच्या पुरुषार्थाने पृथ्वी पादाक्रांत करण्याची आस चाळगणारे तरुण या वादळात खेचले गेले या झंझावातात ओढले गेले. ते वादळ, तो झंझावात म्हणजेच सुभाषचंद्र बोस, एक बंगाली बाबू! शांतीप्रिय असलेल्या टागोरांच्या भूमीत एका परशुरामानं जन्म घेतला १८९७ साली! आणि संपूर्ण भारत इंग्रजमुक्त करण्याचा टाहो जणू त्याने जन्मतः फोडला एका अत्यंत सुसंस्कृत विद्याविभूषित घराण्यात जन्मलेलं हे वेडं पोरं उच्च शिक्षण घेऊन बडा सरकारी अधिकारी व्हायचं सोडून तरुणांच्या मागे रक्त मागत फिरू लागलं आणि अहिंसा हा शब्द जणू त्या रक्तात काही काळ का होईना पुसला गेला.
अडाणी, अशिक्षित जनतेला त्यांनी पहिला धडा दिला शिस्तीचा, अनुशासनाचा कारण साहेबाचं डोकं त्याच शिस्तबद्ध सैन्याच्याच तालावर चालतं हे त्यांनी ओळखलं होतं. सैन्य जशी पोटावर चालतात तशीच ती ज्वलंत देशनिष्ठेवरही चालतात हे सुभाषबाबूंनी दाखवून दिलं. सैन्याच्या खर्चासाठी, शिक्षण, शस्त्रसामुग्री यासाठी पैसा हवा असायचा आणि सुभाषबाबूंनी शब्द टाकायला अवकाश की पैशाची रास ओतली जायची. स्वतःचं सारं काही या सैन्याला देऊन स्वतः सेनेत दाखल झालेले कित्येक तरुण भारताच्या इतिहासात आपल्याला सापडतील. या सेनेचं नाव होतं “आझाद हिंद सेना” नावामधूनच त्यांनी इंग्रज सरकारला इशारा दिला होता. आझाद हिंद सेनेत पुरुषांबरोबर स्त्रियाही होत्या. तरुणांच्या बरोबर अनेक स्त्रियांनाही भरती करून घेणारा हा पहिलाच सेनानी असावा.
२६ जानेवारी १९४४ रोजी त्यांनी रंगूनमध्ये स्वतंत्र भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला. दुसरे महायुद्ध नुकतच संपत आलेलं. त्यांच्या खुणा जगभर होत्या. गांधी, नेहरू विजयाप्रत पोचले होते. अशा वेळी हजारोंच्या उपस्थितीत स्वातंत्र्य मिळविण्याआधीच स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचं केवढं हे धाडस ? केवढा हा आत्मविश्वास? पण हो आत्मविश्वास पोकळ नव्हता. ते नुसतं आश्वासनही नव्हतं. इंग्रज सरकारला ‘माहीमाम्’ करण्याचं उदकच जणू त्यांनी आणि त्यांच्या सैनिकांनी सोडलं होतं. त्या उदकाच्या पाण्याच्या थेंबाचा सागर बनून जणू साहेबाला गिळू पाहत होता.
“हा देश आमचाच आहे. तेव्हा तुमच्याकडे आम्ही स्वातंत्र्य मागावं ही लाचारी किंवा त्मही ते आम्हाला द्यावे हे उपकार कशाबद्दल? जे आमचंच आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे. सरळपणानं दिलं नाही तर हिसकावून घेतलं जाईल’ असं इंग्रज सरकारला त्यांनी ठणकावून सांगितलं आणि त्यांचा आत्मविश्वास, देशनिष्ठा आणि ज्वलंत उत्साह बघून इंग्रज सरकार घाबरलं. याला जर मोकळा सोडला तर हा वामनाप्रमाणे तीन पाऊलात भारताला काय पण इंग्लंडही पादाक्रांत करील, ही भीती त्यांना वाटू लागली आणि सरकारनं वॉरंट काढले सुभाषबाबूंच्या अटकेचं. त्यांच्या हालचालीवर नजर ठेवली. त्यांच्या येण्या-जाण्यावर पहारा ठेवला. पण केवळ एका हाकेने ज्यांनी हिंदुस्थान हलवला त्या गरुडाला या कावळ्याची काय . त्यांनी थेट भरारी घेतली आणि ते निसटले. एका मुस्लिम मौलवीच्या वेशात ते रावळपिंडीला गेले. रावळपिंडीला त्यांनी झियाउद्दीन हे नाव धारण केले. तिथून ते पेशावरला गेले. पेशावरला त्यांना त्यांचा सहयोगी भगतराम भेटला. त्यानेही आपले नाव बदलले व रहिमत खान हे नाव धारण करून त्यांनी देशाची सीमा ओलांडली.
अन् सुभाषबाबू गुप्त झाले. सरकारने जंग जंग पछाडले. पण कुणालाच त्यांचा पत्ता लागला नाही. लोकांना वाटले सरकारने त्यांना पकडून मारले असावे किंवा बेपत्ता केले असावे. देशावर दु:खाची छाया पसरली आणि अचानक एके दिवशी बर्लिन रेडिओ केंद्रावरून त्यांचा आवाज ऐकू आला. “माझ्या देश बांधवानो” त्यांच ओजस्वी, देशभक्तीनं, भारलेलं भाषण ऐकून सगळ्या देशभर चैतन्य पसरले. रेडिओवर त्यांनी दिलेली “जय हिंद” ही हाक सान्या देशभर दुमदुमली.
सुभाषबाबूंचे हे तेज साऱ्या देशाला उजळून टाकत असतानाच एक आधारित पडलं. १९४५ साली एका विमानातून ते जात असता त्या विमानाला अपघात झाला आणि त्यात ते मृत्यू पावले असे म्हणतात. पण त्याला सबळ पुरावा नाही, एवढे मात्र निश्चित की जर आज सुभाषबाबू जिवंत असते तर आजचा भारत वेगळाच दिसला. असता. खलिस्तान, गुरुखास्तान असले हिडीस प्रकार न होता तो फक्त राहिला असता हिंदुस्थान, फक्त हिंदुस्थान आणि त्या हिंदुस्थानात राहणारे सारे भारतीय गात राहिले असते.
कदम कदम बढ़ाए जा
खुशी के गीत गाये जा।
ये जिंदगी है कौम की
कौम पे लुटाए जा|
॥ जय हिंद ॥