व्यसनमुक्ती वर निबंध मराठी | Vyasan Mukti Essay In Marathi

व्यसनमुक्ती वर निबंध मराठी | Vyasan Mukti Essay In Marathi

व्यसनमुक्ती हीच राष्ट्रशक्ती

एखाद्या राष्ट्राची खरी ओळख काय? खरी संपत्ती कोणती? या प्रश्नांची उत्तर आहे, त्या राष्ट्राची नैसर्गिक साधनसंपत्ती व त्या राष्ट्राची जनता व त्यातल्या त्यात तरुणपिढी. राष्ट्राची नैसर्गिक साधनसंपत्ती ही त्या राष्ट्राला मिळालेली देवी देणगी असते, परंतु त्या राष्ट्राची जनता ही त्या राष्ट्राला घडवावी लागते. विशेषतः तरुणपिढीला तर योग्य आकार द्यावा लागतो. जर एखाद्या राष्ट्राची तरुणपिढी ही कमजोर, शक्तीहीन, दुबळी, अशिक्षित अथवा अल्पशिक्षित व व्यसनाधीन असेल तर ते राष्ट्रही कमजोर बनते, दुबळे बनते व जागतिक स्पर्धेत मागे पडते. अविकसित म्हणून ओळखले जाते.

एखाद्या राष्ट्रात लोकाची संख्या जास्त म्हणून ते राष्ट्र बलवान किंवा प्रगतीशील ठरत नाही. तर ती जनता किती शिकलेली, चारित्र्यवान, सुसंस्कारित, निर्व्यसनी आहे यावर त्या राष्ट्राची प्रगती ओळख ठरत असते व तीच राष्ट्राची खरी संपत्ती, शक्ती असते. एखाद्या राष्ट्रातील बहुसंख्य लोक जर चारित्र्यहीन, व्यसनाधीन असतील तर ते देशाच्या गरजा पूर्ण करण्याऐवजी सर्व वेळ स्वतःच्याच गरजा भागविण्यासाठी घालवतील. एवढेच नव्हे तर या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रसंगी एकमेकांचे गळे घोटण्यासही मागे-पुढे पाहणार नाहीत. त्यांची नीतिमत्ता व चारित्र्य खालावत जाईल. पर्यायाने देशाचीच हानी होऊन देश डुबायला, रसातळाला जाण्यास वेळ लागणार नाही व ते राष्ट्रही जगात आपली पत व प्रतिष्ठा घालवून बसेल. तसेच व्यसनांमुळे केवळ राष्ट्राचेच नुकसान होते अशातला भाग नाही तर माणूस स्वतःच्या घराची, संसाराचीसुद्धा राखरांगोळी करत असतो व समाजात उजळ माथ्याने वावरायला असमर्थ ठरतो. तसेच व्यसनी माणसे समाजाच्या दृष्टीनेही पातक ठरतात. ती आपल्याच समाजबांधवांचे मुडदे पाडण्यासही करत नाहीत. ते स्वतःच अंधकाराच्या खाईत चाचपडत असतात, लटपटत असतात, मग राष्ट्राला आधार द्यायला त्यांच्यात कुठून शक्ती येणार? त्यांना स्वतःलाच सांभाळायला पायात ताकद नसते, मग ते राष्ट्राचे आधारस्तंभ कसे बनणार? याउलट राष्ट्रातील जनता, विशेषतः तरुणपिढी जर पूर्ण निर्व्यसनी, उच्चशिक्षित असेल तर तिचा वेळ देश विधायक कार्यासाठी खर्ची पडेल. आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग करून व व्यसनांपोटी वाया जाणारा वेळ जर राष्ट्राच्या प्रगतीसाठी व स्वतः च्याही प्रगतीसाठी जर दिने सत्कारणी लावला तर ते राष्ट्र नक्कीच प्रगत बनते.

निर्व्यसनी, चारित्र्यवान व बुद्धीमान तरुणपिढी काय करू शकत नाही? विज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात नवनवीन क्रांतिकारक व मानवजातीला उपकारक असे गोय लावू शकते. वेगवेगळे यांत्रिक शोध लावून देशाचा गाडा चालवू शकते. वेगवेगळ्या क्षेत्रात मौलिक संशोधन करू शकते. वैद्यकीय क्षेत्रात मानवाला घातक असणाऱ्या विषाणूंवर व रोगांवर विजय मिळवून, नवनवीन औषधे, उपचारपद्धती शोधून काढून मानवाणी आयुर्मर्यादा वाढवू शकते. शेतकी क्षेत्रात नवनवीन बी-बियाणे खते, यांत्रिक साधने, पद्धती शोधून देशाची स्वयंपूर्णतेच्याबाबतीत प्रतिष्ठा वाढवू शकते जरू शकते. स्थापत्यशास्त्राचा उपयोग करून रस्ते, पूल, कालवे, धरणे बांधून देश एकसंध करू शकते. अंतराळ शास्त्रानुसार विविध प्रकारची अवकाश याने व उपग्रह अवकाशात सोडून देशाला प्रगत राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसवू शकते. अविज्ञान क्षेत्रात राष्ट्राला स्वयंपूर्ण बनवू शकते. शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे भरीव कार्य करून व नवनवीन शैक्षणिक योजना अंमलात आणून मागील पिढीपेक्षा अजून उज्ज्वल पिढी घडवू शकते. कला व सांस्कृतिक क्षेत्रात देश-परदेशात नाव उज्ज्वल करू शकते. देशाची कला व संस्कृती जपून ठेवण्यास व त्यात मोलाची भर घालण्यास मदत करू शकते.

आपल्या शारीरिक ताकदीच्या व कौशल्याच्या बळावर क्रीडाक्षेत्रात स्वतःचे व देशाचे नाव मोठे करू शकते. आपल्या क्रीडनेपुण्याने सर्वांचे मन मोडून, विविध स्पर्धा, पारितोषिके जिंकू शकते. एवढेच नव्हे तर देशासाठी सैन्यदल, नौदल हाईला भरती होऊन देशसेवेसारख्या पवित्र्य कर्तव्यात सहभागी होऊ शकते. मातृभूमीसाठी देऊ शकते. व देशाला अजिंक्य ठेवून राष्ट्राची ताकद, शक्ती वाढवू शकते. म्हणूनच ज्या राष्ट्रात व्यसनमुक्तीची चळवळ जोरात वाहत असते, व्यसनमुक्तीचे वारे वेगवान वाहत असतात, त्या राष्ट्राची शक्ती, ताकदही तेवढ्याच वेगाने वाढत असते. शेवटी ‘व्यसनमुक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती असते.

Also read:-