संत नामदेवांच्या जीवनातील प्रसंग | Story In The Life Of Saint Namdeo

संत नामदेवांच्या जीवनातील प्रसंग | Story In The Life Of Saint Namdeo


इंद्रायणी काठी देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची


असा रसाळ आणि सुंदर अभंग लिहिणारा नामदेव म्हणजे वारकरी संप्रदायाच्या बागेतील एक सुंदर सुवासिक फूल मुळातच देवाकडे कल असणाऱ्या नाम्याला ज्ञानेश्वर सोपान मुक्ता निवृत्ती चोखोबा संतांचा सहवास घडला आणि हिऱ्याला पैलू पडावेत असे नामदेवाच्या जीवनात सुंदर रेखीव चमकदार पैलू पडले परमेश्वराची नात निरामय भक्ती करण्यासाठी माणसाचे मन मुळातच कोमल आणि भावनाप्रधान असावे लागते उत्कृष्ट भक्तांमध्ये ज्याची गणना केली जाते अशा नामदेवाचे मन कोमल मृदू भावनाप्रधान नसतं तर……!


त्यांच्या लहानपणी घडलेल्या एक छोटासा प्रसंग नामदेवाच्या मनातील कोमलतेची ऋणूतेची साक्ष पटवतो भुके जलेला नामदेव भाकरी घेऊन खायला बसला होता बसता बसता त्याची कुठेतरी तंद्री लागली आणि टपून बसलेल्या एका कुत्र्याने चटकन ती भाकरी पळवली नामदेव बघतो तर भाकरी गायब आणि ती तोंडात घेऊन कुत्रा पळतोय क्षणभरात नामदेवाच्या लक्षात आले अरे बिचारा नुसता भाकरी घेऊन गेला तूप तसंच राहिलं ! आता कोरडी भाकरी तो कसा खाणार ? या विचाराने राहिलेलं तूप घेऊन नामदेव कुत्रा च्या पाठी मागे पळू लागला अरे हे तूप घे !

मुक्या प्राण्यांच्या भूकेचा आणि खाण्याचा एवढा विचार करणाऱ्या नामदेवाच्या कोमल म्हणाला विठुरायाची भक्ती लावली नाही तरच नवल ! नाम्याच्या या कोमल मनाला विठू माऊली चे प्रेम आणि भक्ती यांनी भारून टाकले आणि त्या साजिर्‍या सुंदर विठाईला नामाचा भोळा भाव आणि मनाची मृदुता यांनी जिंकुन घेतलं.


देव भावाचा भुकेला
देव भक्तीचा तहानेला


नामदेव जातीचा शिंपी कलाकुसरीत कपडे शिवायचे सोडून या नाम्याने आपल्या वाणीच्या कलाकुसरीनं अभंग सजवले आणि मनाच्या कलाकुसरीने विठुरायाला जिंकले. नामदेवाच्या जीवनातील हा प्रसंग म्हणजे नामदेवाने विठूला जिंकल्याचीच साक्ष आहे.आपल्या साध्या सोप्या अभंगांनी आणि गोड रसाळ वाणींनी नामदेवांनी साऱ्या विठ्ठल भक्तांचे मन जिंकून घेतले होते नामदेवाच्या कीर्तनाला अलोट गर्दी लोटत असे.


नाचू कीर्तनाचे रंगी


असे म्हणत बेभान नाचणारा आणि भक्तीचा महिमा गाणारा नामदेव म्हणजे पांडुरंगाचे साक्षात रूप आपलेच हे रूप पाहायला तो पंढरीनाथ ही किर्तनाला यायचा. नामदेवाच्या कीर्तनात असं अवघ्या भक्तगणांना वेड केलेला पाहून काही जणांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांनी नामदेवा विरुद्ध आघाडी उघडली धर्मशास्त्रांचा आघार घेऊन त्यांनी सांगितले नामदेव अत्यंज आहे त्यांना देवळात येता येणार नाही त्याला देवळात किर्तन करता येणार नाही झालं ! त्यावेळच्या धर्ममार्तडांना समोर कोण बोलणार ? नामदेवांनी देवळासमोर कीर्तन करायला सुरुवात केली तिथे सुद्धा अलोट गर्दी जमू लागली धर्ममार्तंडांच्याडोळ्यात पुन्हा ही गर्दी होऊ लागली त्यांनी पुन्हा नामदेवाला हुकुम केला तुला देवळासमोर ही कीर्तन करता येणार नाही कोमल मनाच्या नामदेवाला भयंकर दुःख झाले पण करतो काय बापडा देवळासमोर पांडुरंगाचे कीर्तन करताना निदान ते सुंदर रूप नजरेस पडत होते पण आता देवळा पाठीमागे कीर्तन ? ठीक आहे जशी पांडुरंगाची मर्जी ! नामदेवाने देवळाच्या पाठीमागच्या आवारात कीर्तन सुरु केले आणि नामदेवाचा चा आर्त स्वर विठुरायाचा धावा करू लागला.


चक्रवाक पक्षी वियोगे वाहती
झाले मज प्रती तैसे आता
वत्सनु देखता गाई हंबरती
झाले मज प्रती तैसे आता


विठुरायाच्या नामघोषाने भरलेली वाणी देवळा पाठीमागे घुमू लागली आणि पंढरीनाथा ला राहावे ना माझा नामदेव कुठे गेला ? समोर दिसत नाही तू ? त्याने कानोसा घेतला अरे नामदेव पाठीमागे आहे ! आणि काय सांगावा चमत्कार ? संपूर्ण देऊळ फिरले संपूर्ण देऊळ ! आणि पुन्हा एकदा ते पंढरीनाथा चे साजिरे ते साजिरे गोजिरे रूप नामदेवाला सामोरे झाले इथे भक्ताच्या भक्तीसाठी देव फिरला काय हा भक्तीचा महिमा ? नामदेवाच्या अमोल भक्तीची आणि विठ्ठलाच्या अमाप प्रतीची साक्ष देत आहे.


देवही फिरला देऊळही फिरले
भक्तीचा हा महिमा नवल ची घडले
भोळ्या भक्ताने नाम्याने पांडुरंगा जिंकले
भक्तांसाठी देवाने देऊळ फिरवले
देवाला जेऊ घातले
देवावर घरच्या माणसाप्रमाणे रागवतो
पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन ना होसी जातो मी माघारा
विसोबाखेचराकडून ज्ञानोपदेश घेऊन
पूर्ण विठ्ठल मय ब्रह्मज्ञान

Download File

Leave a Comment