महाभारतातील एक प्रसंग
आजन्म ब्रह्मचारी राहीन
प्रतिज्ञा करता झाला भीष्म
महाभारताच्या श्रावणी पसरून राहिला जसा ग्रीष्म कुरुकुलाची वैफल्य गाथा
भीष्माची शोकांतिका ही
एका तेजस्वी युगपुरुषाची
व्याकुळ विराणी जीवनव्यथा महाभारताच्या संपूर्ण शोकांतिकेवर आपल्या युगप्रवर्तक प्रतिज्ञेने पसरून राहिलेला भीष्म हा महाभारताचा महान शोकांत नायक ठरतो. पडद्याआडून सूत्र चालवून प्यादी हलविणाऱ्या कृष्णाच्या कावेबाजपणाचा सतत बळी ठरत गेला. हा युगंधर महान त्यागाची, महान तेजाची प्रतिमा ज्याची युगायुगांतून पुसली गेली नाही असा तो भीष्म युगप्रवर्तक महापुरुषच होता. अतुल पराक्रमी आणि महान सामर्थ्य असलेल्या या देवव्रताच्या आयुष्याच्या साच्या दोन्या नियतीनं वाटेल तथा फिरवल्या आणि भाग्य घडविण्याचं सामर्थ्य मनगटात असूनसुद्ध स्वतःचं भाग्य त्याला बदलता आलं नाही.
कुमार देवव्रताच्या जीवनाला तसे साधेच वळण होते. पण एखाद्या झंझावाताप्रमाणे शंतनु आणि सत्यवतीचा प्रेमालाप त्याच्या आयुष्यात शिरला आणि केवळ दुःख घेण्यासाठीच जन्माला आलेल्या आठव्या वसूच्या महान शोकांतिकेला सुरुवात झाली.
गंगापुत्र म्हणून आतापर्यंत लाडाकोडात आणि कौतुकात वाढलेल्या देवताला जीवन म्हणजे इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे मनोहर आहे असंच वाटत होतं. त्याच्या सुकुमार डोळ्यात हजारो स्वप्ने तरळत होती आणि त्या स्वप्नांची पूर्तता करण्याचे सामर्थ्य अजानूबाहू देवव्रतात नक्कीच होतं. सम्राज्ञ शंतनुचा एकुलता एक पुत्र युवराज देवव्रत महत्त्वाकांक्षेच्या अश्वावर आरूढ होऊन पराक्रमी ठरू पाहत होता. आपल्या जीवनाच्या इंद्रधनुष्याला झाकोळणारा, कायमचे झाकोळणारा त्याला कल्पनाही नव्हती. गंगेच्या विरहाने स्वतःला जाळून घेत १९ वर्षे तपस्वी राहिलेला शंतनु सत्यवतीच्या नेत्र कटाक्षाने घायाळ झाला. आपली ही घायाळ अवस्था आपल्या लाडक्या देवव्रताला जन्माचे घायाळ करणार आहे याची त्याला कल्पनाही नव्हती.
धीवरापोटी जन्म घेतलेल्या सत्यवतीला दाहक व्यवहाराशिवाय दुसरे काय माहित असणार? त्याग या भावनांना तिच्या लेखी शून्य किंमत होती. स्वतःच्या आंधळ्या राज्यसत्तेच्या हव्यासापोटी आपण संपूर्ण कुरुकुलाच्या नाशाची बीजे रोवत आहोत हे कळण्याइतकी बुद्धी सत्यवतीकडे कोठून येणार? परिणामाची कल्पना केवळ बुद्धिमान लोकच करू शकतात. पित्याची घायाळ अवस्था, त्याच्या मनाची होणारी घालमेल याच्या तळाशी जाणाऱ्या देवव्रताला सत्यवतीची विचित्र अट कळली आणि केवळ पित्याच्या सुखाचा विचार करणाच्या पितृभक्त देवव्रताने ती अट मान्यही केली. सत्यवतीची सौदेबाजी, शंतूनचा लंपटपणा आणि देवव्रताचे पितृप्रेम त्रिवेणी संगमातून अमृताऐवजी जहर जन्मले आणि संपूर्ण कुरुकुलावर त्या जहराची निळी छाया शेवटपर्यंत प राहिली. राज्य लालसेचा रस्ता माणसाच्या अध:पतनातूनच जातो हेच खरे!
सत्यवतीची विचित्र अट कळताच पित्यासाठी देवव्रत तिला मागणी घालायला येतो. तिच्या अटी ल केल्यास ती पित्याची मागणी कबूल करणार आहे हे त्याला कळताच त्या अटीही तो कबूल करतो आणि इथेच देवव्रताच्या सुकोमल आयुष्यातील अंधारपर्वाला सुरुवात होते.
“सम्राटानंतर माझा पुत्र गादीवर बसेल” सत्यवती अट घालते. ‘कबूल माते’ देवव्रत मातेचा आदेश मंजूर करतो. ‘देवव्रत, शर्त तुम्ही मंजूर कराल पण तुमच्या पुत्रांना कोण रोखणार? त्यांनी बखेडा केला तर?” सत्यवतीने सवाल टाकला. ‘तर? तर? माते ऐक माझी प्रतिज्ञा देवव्रत बोलला….!
आणि पृथ्वीची गती क्षणभर थांबली. वार वाहायचे विसरला. सूर्याला झाकोळण्याची भीती वाटली. खळखळ वाहणारी गंगा एकदम उसळून स्तब्ध झाली. सारी चराचर सृष्टी, सारा निसर्ग जणू मूक सदन करू लागला. कारण देवव्रत प्रतिज्ञा करणार होता. त्याच्या डोळ्यातून तेजाचे स्फूलिंग बाहेर पडत होते. चेहऱ्यारवर शत सूर्याचे तेज होते. आपले अजानबाहू आकाशाकडे करून देवव्रत बोलला…’
“हे आकाशस्य देवतांनो, हे चराचरातील पंचमहातेजांनो, हे प्राणीमात्रांनो, हा गंगापुत्र देवव्रत, सम्राट शंतनुचा युवराज देवव्रत आज तुम्हाला साक्षी ठेवून प्रतिज्ञा करतो की, मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि कुसंच्या सिंहासनापायीच माझी निष्ठा ठेवीन.”
प्रतिज्ञा संपली आणि चहूबाजूंनी आवाज घुमला भीऽऽष्म, भीऽऽम, गंगापुत्र भीष्म, धन्य धन्य हो ! आणि कुरुकुलाचा हा युवराज आपल्या भीष्म प्रतिज्ञेने शेवटपर्यंत स्वतःच्या हाताने निर्माण केलेल्या साखळदंडानी खडला गेला. शोकांतिकेशी त्याचे कायमचे नाते जुळले. कुरुकुलाची लाज राखण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या आयुष्याची राख करून जन्मभर जळत राहिला. कुरुंच्या सिंहासनाची वांझोटी जबाबदारी जन्मभर उचलत राहिला आणि स्वतःच्या आयुष्याची तिलांजली देऊन कुरुंच्या सिंहासनाला प्रतिष्ठा देत राहिला. धन्य तो भीष्म आणि धन्य त्याची भीष्म प्रतिज्ञा.