Ramayan vyaktirekha रामायणातील व्यक्तिरेखा
रामायण हे एक प्राचीन काव्य आहे. ते फक्त काव्यच न राहता तो एक धर्मग्रंथ बनला आहे. वंदनीय, पूजनीय, आर्यांची संस्कृती सांगणारा, आमच्या प्राचीन परंपरांचा इतिहास सांगणारा महान ग्रंथ बनला आहे. एखादी कलाकृती जेव्हा सर्वमान्य ठरते, लोकमान्य ठरते तेव्हा ती सर्वार्थानं चांगली असते किंवा त्यात काही त्रुटी राहिल्या तरी त्या दुर्लक्षित केल्या तरी चालतील इतक्या त्या क्षुल्लक असतात किंवा त्या त्रुटींना झाकणारे अनेक मोठे गुण त्या कलाकृतीत असतात. त्यामुळे ती कलाकृती लोकमान्य ठरते. अपूर्व ठरते. स्थल कालाच्या सीमा ओलांडून ती मानवाचे सारे क्षितीज व्यापते. अशा कलाकृती या नेहमीच सर्व ठिकाणी अदर मिळवून जातात. त्या इतक्या उच्च कोटीच्या असूनदेखील माणसाच्या अंतःकरणाला स्पर्श करणाच्या असतात. माणसाच्या मनाचा उठाव घेणान्या असतात. याचे कारण एकच की, मानवी जीनातील प्रत्येक भाव-भावनांचे, आचार-विचारांचे, सुख-दुःखांचे प्रतिबिंब त्यात स्पष्टपणे पडलेले असते म्हणूनच अतर्क्स आणि अद्भूत घटना असूनुसद्धा त्या माणसाला जवळच्या वाटतात, आपल्या वाटतात. या सर्व दृष्टिकोनातून विचार करता रामायण है महाकाव्य, महाकाव्य असूनसुद्धा ते मानव्य ठरते. मानवी काव्य ठरते. कारण मानवाच्या अवतीभवती असलेली जाती-गोती, स्नेही, सोबती, सुख दुःख, वैरत्व-मैत्री, त्याग-लोभ, राग अनुराग, प्रेम-संघर्ष, शृंगार, साहस, नियती-संकट इत्यादी सर्वच कल्पना, भावनांचा सुस्पष्ट आणि रेखीव आविष्कार त्यात आहे.
राम-लक्ष्मण हे त्याग, प्रेम आणि शौर्य यांचे प्रतीक तर सीता ऋतू स्मीत्वाची प्रतिनिधी, मारूती मित्र सखा म्हणून तर रावण गर्विष्ठ, खलपुरुष म्हणून अशा एक ना अनेक व्यक्तिरेखा माणसाला आजपर्यंत हजारो मोहबीत आल्या आहेत आणि इथून पुढेही मोहविणार आहेत.
व्यक्तिरेखा म्हटलं की त्या व्यक्तीची रेषन् रेष आपल्या डोळ्यासमोर उभी राहते तिचे रंग, रूप, गुण, दुर्गुण, तिचा स्तर, दर्जा सारे काही आपल्याला पाहावे, तपासावे लागते. ही तपासणी अर्थातच रूपागुणांनी मानवी मनाला मोह घालणान्या आहेत. कारण रामायण हेच मुळी मानवी जीवनाचे स्वच्छ प्रतिबिंब दाखविणारा बिहोरी आरसा आहे.
तरीपण या सर्वात मला आवडलेली व्यक्तिरेखा विचारलात तर ‘रावण!’ होय रावणच. रामायणातला खलपुरुष, खलनायक, रामसीतेचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरलेला खलपुरुष.
रामाच्या सगुण, आदर्श व्यक्तिरेखेपुढे रावण ही व्यक्तिरेखा अतिशय खल, दृष्ट अशी वाटते. पण रामाला जर आदर्श मानला तर रावण हे वास्तव आहे. चिरंतन सत्य आहे. असे मानावे लागेल. रावणाच्या व्यक्तित्वाचा सखोल अभ्यास केला तर असे दिसून येते की, रावण हा पुरुषोत्तम आहे. तो महापराक्रमी आहे. विद्वान आहे, वेद, ऋचा, धर्मग्रंथ सर्व कलानिपुण, नृत्य, नाट्य, राजकारण, पराक्रम या सर्वांत पारंगत असा पुरुषोत्तम आहे. राक्षस कुळातील असूनसुद्धा त्याची स्वतःची अशी एक नीती हे स्वतःचा असा एक धर्म आहे. सर्व धर्मशास्त्रे, वाचने त्याने अभ्यासलेली आहेत. सर्व देवांना आणि नवग्रहाना त्याने कित्येकदा आपल्या अंकित केले आहे. असा तो अतुल पराक्रमी आहे. आपल्या भावांवर त्याचे प्रेम आहे. त्यांच्या पराक्रमावर त्याचा विश्वास आहे. शूर्पणखेचा अपमान सहन न करणारा तो प्रेमळ भाऊ आहे. आपल्या सर्व कला शास्त्र निपुणतेबद्दल त्याला सार्थ अभिमान आहे. जगातली प्रत्येक सुंदर वस्तू आपल्या दरबारात असली पाहिजे असा आग्रह धरणारा तो रसिकागुणी, सौंदर्य भोक्ता आहे. याच भावनेतून आणि बहिणीच्या अपमानाचा बदला म्हणून त्याने सीतेला पळवून आणले. मनात भरलेली स्त्री पळवून आणणे हा त्याकाळी सर्वमान्य क्षत्रिय धर्म होता. मग रक्षसनीतीत तो असणारच. मनात भरलेली सुंदर स्त्री पळविण्याचे दाखले, पुराणात आपण आदर्श मानलेल्या पुरुषांच्या बाबतीतही कित्येक ठिकाणी दिसून येतात. मग-रावणाने सीतेला पळवली यात तत्कालीन संस्कृतीपेक्षा त्याने वेगळे असे काय केले? आणि तरीदेखील सीता त्याच्या ताब्यात असून, एकाकी असून आणि शक्य असूनही त्याने सीतेला तिच्या मनाविरुद्ध स्पर्शही केला नाही. त्याचे हे वागणे राक्षसनीतीच्या विरुद्ध असूनही सुसंस्कृतपणाचेच आहे. नाहीतर त्याच्या ताब्यात असलेल्या सीतेला तो केव्हाच भ्रष्ट करू शकला असता.
इतकेच नव्हे तर आपण केले ते चूक की बरोबर याचा खल करत न बसता त्याने ते स्वीकारले आहे. केलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप करत न बसता होणान्या परिणामाला तो धीरोदात्तपणे सामोरे गेला. सीतेला परत पाठवून आपली चूक कबूल करण्याचा भ्याडपणा त्याच्या मनाला कधीच शिवला नाही. झाली गोष्टी होऊन गेली आता मरणे अथवा मारणे हेच सत्य आहे, असे तो स्पष्ट म्हणतो. यात त्याची सुधरिताच दिसते. स्वतःचे कृत्य तो चुकीचेही मानत नाही आणि त्याचे समर्थनही तो करत नाही. यात त्याचा ठामपणा दिसून येतो.
रामाच्या गुळगुळीत आदर्शासमोर रावणाचे बिनधास्त शौर्य अन्यायकारक वाटते खरे. पण खोलवर विचार करता रावण हा प्रत्येक ठिकाणी आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिला असेच म्हणावे लागेल. रावणाच्या प्रत्येक कृत्याला त्याच्या राक्षसनितीच्या धर्मपालनाचे समर्थन आहे आणि हे समर्थन वास्तव आहे. सामान्य माणसाचे हे भावनिक समर्थन आहे. राक्षसनीतीधर्माप्रमाणे वागूनच त्याने दुसऱ्याची सुंदर स्त्री पळवली आणि तरीही रावण आमच्या महाकाव्यातील आणि आर्य संस्कृतीतील आद्य खलनायक ठरवला जातो.
हे जरी खरे असले तरी रावणाची प्रत्येक कृती ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी संवाद साधून आहे. स्वतःच्या राज्याला सवतोपरी संरक्षण देणारा, प्रजेला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करणारा, शंकराची अपरंपार भक्ती करणारा, असा महत्त्वाकांक्षी राजा या रूपात रावण त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा स्वामी आहे. म्हणून काही वेळा गर्विष्ठपणाही त्याला शोभून दिसतो. केवळ दुसऱ्याची स्त्री पळवली तीही राक्षस नीतीनुसार, म्हणून जर त्याच्या इतर सर्व गुणांकडे डोळेझाक करून त्याला आद्य खलपुरुष मानले आहे. तर मग आमच्या आजच्या युगात असे रावण पावलोपावली सापडतील, जे दुसऱ्याच्या स्त्रीच काय स्वतः च्या मातेसमान भावजयाही भ्रष्ट करतात. असो.
केवळ सीतेला पळवली या एकाच कारणासाठी रावणाला इतका नीच, खलपुरुष मानणे म्हणजे त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर, त्याच्या सुसंस्कृतपणावर अन्याय केल्यासारखेच आहे आणि त्याच्यासारख्या पुरुषोत्तमावर आज युगानुयगे हा अन्याय होत आला आहे.
एका बाजूला रामाचा स्वप्नवत आदर्श आणि दुसऱ्या बाजूला रावणाचे प्रखर वास्तव या स्वप्नसृष्टीत रमणान्यांना राम आदर्शच वाटेल. पण स्वप्नसृष्टीतून बाहेर येऊन वास्तवाशी जवळीक साधायचे ठरवले तर रावण अधिक खरा, अधिक वास्तव, अधिक जवळचा वाटेल. पुराण कल्पनेचाही आधार घेतला तर रावणाला मारण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णूंना अवतार घ्यावा लागला इतका तो असामान्य होता हेच खरे.
राम जर या संस्कृतीचा आदर्श पुरुष असेल तर रावण हा या संस्कृतीतील वास्तवतेचा पुरुषोत्तम आहे, असे मानावे लागेल आणि हे सत्य कटू असले तरी स्वीकारावे लागेल. तरच आमची २१ व्या शतकाची पिढी बुद्धीनिष्ठतेचा मान ठेवून हा धर्मग्रंथ स्वीकारू शकेल. अन्यथा शंकराने रामाला नमस्कार केला म्हणजे शंकराला कमीपणा आला अशा पोकळ विचारांनी भावना दुखावल्या जाऊन दंगे झाले तर त्यात नवल ते काय ?.