भ्रष्टाचार निबंध मराठी: Bhrashtachar Essay in Marathi

भ्रष्टाचारा भरमासूर

धरण फुटून वीस हजारांवर ठार, भ्रष्टाचारी इंजिनियर फरार! औषधातील भेसळीमुळे नका अर्भकांचा मृत्यू! डोनेशनमुळे तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या महागाईने त्रस्त होऊन पित्याकडून तीन कन्या व पत्नीचा खून! अ वर्तमानपत्रातील बातम्या की मसणवटीचा अहवाल ? आमच्या आदर्श मानवी मूल्यांचे काय झाले? कुठे गेली आमची आचारसंहिता? हे सारे कशामुळे झाले ?

एक विश्वव्यापी संचार करणारा व्यापक असा आचार सान्या आदर्श तत्त्वांना गिळंकृत करू पाहतोय, आजचा शिष्टाचार बनू पाहतोय त्याचं नाव आहे भ्रष्टाचार ! होय, सन्माननीय परीक्षक आणि स्पर्धक मित्रांनो

मना-मनांत एक विचार

क्षणोक्षणी एक आचार,

काही दिशांतून सर्वत्र संचार

भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार !

खरंच! भ्रष्टाचार म्हणजे काय हो? भ्रष्टाचार म्हणजे पैसा? भ्रष्टाचार म्हणजे अनीती? भ्रष्टाचार म्हणजे स्वार्थ ? भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय? आणि त्याचा उगम कोठे झाला? मित्रहो, भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार? मग ते भ्रष्टपण पैशाचं असेल, स्वार्थाच असेल, अनितीचं असेल! त्याचा उगम झाला माणसाच्या मनात, त्याच्या मनातील पशुत्वात आणि या पशुला पहिले कुरण मिळालं राजकारणाचं प्रथम दबकत वावरणारा हा भ्रष्टाचार पुढाऱ्यांच्या पदरी गेला. त्याला राजाश्रय, विद्वानाश्रय आणि धनिकाश्रय मिळाला आणि आता हा भ्रष्टाचार राजरोसपणे सूर्यकिरणांनी ही जितक्या सहजतेनं बावरावं तितक्या सहजतेन वावरू लागला आहे.

आज जगात नव्हे त्रैलोक्यात एकही जागा अगदी पृथ्वी व स्वर्गसुद्धा अशी नाही की जिथं भ्रष्टाचार पोहोचला नाही. आजकाल शिक्षणक्षेत्र, वैद्यकीय, व्यापारी, औद्योगिक, धार्मिक क्षेत्र, बाजार, नौकरी औषधे, शाळा, कॉलेज विवाह जिथं जिथं माणसाचा संपर्क आला. तिथं तिथं हा भ्रष्टाचार पाठोपाठ जाऊन पोहोचलाच.

माणूसही इतका हुशार की,

“आम्ही बिघडलो तुम्हीही बिघडाना!

या उक्तीप्रमाणे त्याने देवालाही भ्रष्टाचारापासून दूर ठेवलं नाही आणि मग वर्षानुवर्षे माणसाच्या संगतीत राहून देवही बिघडला. बाण नाही पण गुण लागलाच. तोही लाखांनी देणग्या घेऊ लागला आणि सुदाम्याच्या पोह्याची अपूर्वाई विसरला.

‘विद्येनेच मनुजा येई श्रेष्ठत्व अंगी’

असे आमचा समाज म्हणतो. पण विद्यादानाची ही पुण्य क्षेत्रे, सरस्वतीचा, शारदेचा हा दरबार भ्रष्टाचारानं इतका विटाळला की सामान्य माणूस शिक्षण घेण्यासाठी सुद्धा घाबरू लागलाय. ९ वीत ७०/८० टक्के मार्क मिळवणारा आपला मुलगा १० वीत नापास झाला तर बरं होईल निदान डोनेशनचा खर्च तरी वाचेल आणि भेळचा गाडा काढून देता येईल, असा विचार सर्वसामान्य माणसाला सुचला तर त्यात नवल ते काय? कारण शारदेचे भ्रष्टाचारी द्वारपाल त्याला असा विचार करण्यास भाग पाडतात. २ लाख भरा इंजिनियर व्हा, ४ लाख भरा नि डॉक्टर व्हा, ४० हजार भरा नि शिक्षक व्हा आणि भ्रष्टाचार करा नि पुढारी व्हा. हा आमच्या शिक्षणाचा महान संदेश आहे. कसंतरी थोडसं शिक्षण पदरात पाडून घेतलं तर नोकरी मिळणं महाकठीण, कारण तिथही आडवा येतो हा

भ्रष्टाचार. ६५००० एका हातात नोकरीची ऑर्डर दुसऱ्या हातात हा संदेश राजरोसपणे सगळीकडे सांगितला जातो. आता ६५००० भरून नोकरी मिळवायची पूर्ण पगारावर सही करून अर्धा पगार हाती घ्यायचा ही नोकरीतली तत्त्वे, सामान्य मध्यमवर्गीय माणसाला अगदी मृतप्राय करतात. शिक्षणासाठी पैसा, नोकरी मिळविण्यासाठी पैसा आणि जगण्यासाठीही पैसाच हे दुष्ट चक्र माणसाच्या मृत्यनंतर संपतं पण ते फक्त त्याच्या पूरत माणूस मेलाय हे सिद्ध करायलाही भ्रष्टाचाराचा आधार घ्यावा लागतो. मराणान्ती वैराणी है जरी सत्य असलं तरी ‘मरणान्ती भ्रष्टाचाराणी अस होत नाही, ते कटू असलं तरी सत्य आहे.

व्यापार आणि औद्योगिक, वैद्यकीय आणि औषधे ही क्षेत्रे तर माणुसकीहीन भ्रष्टाचाराची जिवंत उदाहरणे आहेत. संजीवनी ठरणारी औषधे आज जटील विषाचे काम करताहेत. कुठं निळे करणारे महाविषारी जहर पिऊन शंकर जिवंत राहिला तो त्याच्या नव सामथ्र्याने पण आज रोग बरे करणारी औषध पिऊनही माणूस मरतोय. तो भ्रष्टाचाराच्या सामय्यान, पोटाची आग शांत करण्यासाठी माणूस माणुसकी सोडतोय. खून, दरोडे यांचे प्रमाणे बाढले आहे आणि भ्रष्टाचाराचा राक्षस हे पाहून खदाखदा हसतो आहे.

धर्म म्हणजे दिशादर्शक! माणसाने वागावे कसे याची आचारसंहिता घालून दिली ती धर्मांनी मग तो धर्म कोणताही असो तो माणसाला माणसासारखं वागायला शिकवणार, सैतानासारखं नाही. पण या पवित्र क्षेत्रातही हा भ्रष्टाचाराचा कली शिरला आणि इथला सच्चेपणा त्यानं हां हां म्हणता म्हणता गीळंकृत केला आणि मग सुरू झाली जीवघेणी चढाओढ मतांच्या गठ्ठ्यांसाठी धर्माचा वापर आणि जातीय दंग्याचा वणवा, पण देवसुद्धा या भ्रष्टाचाराला घाबरला. हे जातीय दंगे विझविण्यासाठी मंदिरातून श्रीराम बाहेर आला नाही, मशिदीतून अल्लानेही बाहेर डोकावले नाही, चर्चमधून येशूही सावरून उतरला नाही की गुरुद्वारातून कुणी गुरुलानाक आणि मग केवळ माणसांचे प्राप्त जात राहिले चारही धर्मात भ्रष्टाचार पसरतच गेला कॅन्सरसारखा

नैतिकता हा आमचा समाजाचा मूल स्रोत आहे. विवाह बंधन हा त्याचा पाया आहे. सुखी जीवन हे त्यांचे मंदिर आहे. पण तिथंही हा भ्रष्टाचार शिरला आणि हे मंदिरच त्याने उद्ध्वस्त केले आणि हा पायाच नष्ट केला. या पवित्र संकेतात भ्रष्टाचाराच्या हातात हात घालून हुंडा नावाचा दैत्य आला आणि कोडकौतुकाच्या लेकीसुना जाळल्या जाऊ लागल्या. असा हा भ्रष्टाचार राक्षस बनून नीतितत्त्वांना आदर्श तत्त्वांना गोळंकृत करू पाहतोय. एक असाध्य रोग बनून माणसाचा बळी घेतोय. आज कॅन्सरसारख्या रोगावर आम्ही उपाय शोधले आहेत, पण भ्रष्टाचाराच्या या असाध्य रोगावर एकही संजीवनी चालेल असे दिसत नाही.

“लाख सूर्याच्या मशाली पेटल्या होत्या जरी मार्ग काटेरी सरेना पाऊले रक्ताळली” अशा अवस्थेत भ्रष्टाचाराशी मुकाबला करायचा कसा? पण थांबा अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आम्ही देवाचे अस्तित्व मानतो आहोत, शांततेचे, मांगल्याचे अधिराज्य मागतो आहोत, अजून अंधार पूरता झाला नाही. पाऊले रक्ताळली असली तरी जिद जिवंत आहे, आशा दुर्दम्य आहे. कारण

यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत

अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्यानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय संभावान युगे युगे

या वर आमचा पूर्ण विश्वास आहे. पूर्ण विश्वास आहे.

Download File

Leave a Comment