एकीचे बळ मिळते फळ निबंध | Marathi essay

एकीचे बळ मिळते फळ

एक सत्यकथा आहे. १३ वर्षाचे शेतकऱ्याचं कोवळं पोरं जंगलच्या वाटेनं घरी चाललं होतं. संध्याकाळसर आली होती. अंधार दाटत होता. अंधारानं ते पोरगं आधीच घाबरलं होतं पावलं चटाचटा पडत होती पण बाट सरत नव्हती. इतक्यात एक महाकाय अस्वल दत्त म्हणून त्याच्यासमोर येऊन ठाकलं. ते पोर भीतीनं अर्ध झालं ते अस्वल त्या पोरावर झेप घेणार एवढ्यात झाडावर असणाऱ्या वानरांनी धडाधड खाली उड्या टाकल्या आणि त्या पोराभोवती फिरू लागले. त्यांनी त्या अस्वलाला त्या पोराच्या अंगाला स्पर्श करू दिला नाही. तासभर बाट बेधून कंटाळून ते अस्वल निघून गेलं. एका माणसाच्या पोराला वाचवून त्या वानरांनी माणसुकी तर दाखवलीच पण एकीची ताकद किती आहे हेही दाखवलं. म्हणूनच मित्रांनो.

https://shikshaved.com

साथी हाथ बढाना

एक अकेला धक जाएगा

मिलकर जोर लगाना

या ओळी सांगताहेत एकीचे बळ, जे काम एक हात करू शकणार नाही तेच काम अनेक हात एकत्र आले की, सहज होऊन जातं. एकीचे बळ, एकतेची जाणीव, एकात्मतेची शक्ती हा तर आमच्या भारत देशाचा मूळ पाया। आहे. ज्यांच्या राज्यावर सूर्य कधीही मावळत नाही, अशांना आमच्या देशातून हाकलण्यासाठी एकट्या गांधीजींचे किंवा एकट्या टिळक नेहरूंचे हात उपयोगी पडले नसते. त्यांच्या दोन हातांना लाखो देशबांधवांच्या हातांची जोड मिळाली आणि भारताचा तिरंगा डौलान आकाशात फडकू लागला. अर्थात

बोली है अलग, भाषा है जुदा

पर एक वतन हम सबका है।

असं आम्ही आज अभिमानाने म्हणतो आहोत. त्यापाठीमागे आमचे एकीचे बळ ठामपणे उभे आहे म्हणून तर मित्रांनो मोरपिसांच्या रंगांनी, इंद्रधनुच्या सात रंगांनी वेगळं व्हायचं ठरवलं तर? छे ! ही कल्पनाच करवत नाही, म्हणजे एकीमध्ये बळाबरोबरच सौंदर्यही लपलं आहे. म्हणून तर त्या एकत्रित रंगांची ती सुंदर उधळण मनाला मोहून टाकते, आपले शरीर विभिन्न अवयवांनी बनलेलं आहे. या प्रत्येक अवयवांना वेगळं होऊन स्वतंत्रपणे काम करायचं ठरवलं तर ? बापरे! काय भयंकर विचार आहे. म्हणजेच सर्व अवयव एकत्रितपणे काम करतायत म्हणून आपण आज जिवंत आहोत.

तुम्हाला इसापची ती गोष्ट माहित आहे का? पारध्यानं लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांनी एकत्रितपणे जोर केला आणि ते जाळ्यासकट उडून गेले. म्हणजे एवढ्या बुद्धिमान मानवाला त्या चिमुरड्या पक्ष्यांच्या एकीमुळं हार खावी लागली. मग सर्व प्राणीमात्रात बुद्धिमान असलेल्या मानवानं एकत्रित येऊन काम केलं तर आजचे पंजाब, काश्मीरचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. या बाबतीत पंजाबात घडलेलं एक उदाहरण मोठं बोलक आहे. एका गावावर अतिरेक्यांनी हल्ला केला. गावात हिंदू आणि शिख दोन्ही धर्माचे लोक होते.

शिख बांधवांना अतिरेक्यांनी सांगितलं की, तुम्ही बाजूला व्हा आम्ही हिंदू लोकांना गोळ्या घालणार आहोत पण आमच्या शिख बांधवांनी स्मरण केलं अखंड हिंदुस्थानचं आणि त्यांनी अतिरेक्यांना सांगितलं. “आम्ही बाजूला होणार नाही. तुम्ही खुशाल गोळ्या घाला. जियेंगे तो साथ-साथ मरेंगे तो साथ-साथ” आणि त्यांचा हा निर्धार पाहून अतिरेकी निघून गेले. एकीचं हे केवढं महान सामर्थ्य ?

हिंद देशके निवासी, सभीजन एक है।

रंग, रूप, वेश, भाषा चाहे अनेक हैं।

आता परवाचं समानियातल उदाहरण घ्या ना. निकोलाच सिझेस्कूच्या अनिर्बंध हुकूमशाहीला तिथल्या जनतेनं नेस्तनाबूत केल ते एकत्रित येऊनच ना? त्यांच्या एकीमुळे केवढी महान क्रांती झाली. हे सर्व एकीचेच बळ म्हणून मित्रांनो

हजारो हातांची दुनिया

करेल जादूची, सुखाचीच छाया

ही तर एकीची माया !

Download File

Leave a Comment