झाडे बोलू लागली तर…
परमेश्वरानं निर्माण केलेली ही चराचर सृष्टी विविधते आणि सौंदर्याने नटलेली. या सौंदर्याबरोबरच अनेक आश्चर्यकारक गोष्टी आणि चमत्कार या सृष्टीत आपल्याला आढळतात आणि त्यात समावेश होतो तो मानवी मनाया, मानवी मन जे कोणालाही दिसत नाही, पण जिथे अनेक प्रकारच्या उलाढाली चाललेल्या असतात, कोणत्या क्षणी कोणता विचार तिथं डोकावला. झाडे बोलू लागली तर… झाडं बोलू लागली तर ती पहिल्यांदा काय बोलतील कशी बोलतील?
सर्वात पहिल्यांदा सकाळच्या वातावरणात विचार करू. फुलांनी बहरलेली टवटवीत झाडे पाहिली की मन कसं प्रसन्न होऊन जातं. त्याच्या त्या प्रसन्न दर्शनाबरोबर तशाच गोड आवाजात ती आपल्याशी बोलू लागतील.. सकाळी आईला आपल्याला हाक मारावीच लागणार नाही. झाडेच पहाटेची भूपाळी म्हणून उठवतील ती म्हणतील
हिरव्या पाणी नटल्या राणी
सुगंध तुम्हा मी दिला.
उघडी डोळे राजस बाळा
बघ सूर्योदय जाहला.
इतकच नाही तर झाडांच्या वेगवेगळ्या आवाजांऐवजी रात्रीसुद्धा अंगाई गीत म्हणून ती आपल्याला झोपवतील.
सकाळी आपल्याशी आनंदानं हसत-हसत बोलतील आणि त्यांच्या हसऱ्या बोलक्या दर्शनानं आपली सकाळ तर
प्रसन्न होऊन जाईलच पण सारा दिवसही आनंदात जाईल.
दुपारच्या वेळी उन्हानं अस्त झालेला एखादा मनुष्य पाहून झाडे म्हणतील ‘ये, ये पांवस्ता, दमला असशील, जरा घे निवारा माझ्या सावलीला, हो शांत आणि मग पुढच्या प्रवासाला जा.’
दमले मन अन् शिवली काय ?
धोडासा घेई विसावा
थांब क्षणभरी वे पांथस्था
उल्हासित कर जिवा
त्याचे ते बोल ऐकून पांथस्थाला किती आनंद वाटेल! झाडांना आम्ही मित्र मानतो. पण ही झाडे खरोखरच एखाद्या मित्रासारखी आपल्याशी गप्पा मारू लागतील. ‘काय दोस्ता’ आज दमलास का?’ किंवा ‘आज काय विशेष? काय म्हणतोय एस. एस. सी. चा निकाल?” असं विचारतील, पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. आजपर्यंत तुम्ही जेव्हा झाडे तोडायला जात होता तेव्हा झाडं काही बोलत नव्हती पण आता ती शांत बसणार नाहीत. काही झाडे अगदी केविलवाणी होऊन म्हणतील “नकारे आमच्यावर घाव घालू. या कालच्या जखमा अजून ओल्या आहेत. किती वेदना होताहेत आम्हाला आमच्या जखमा तुम्ही कधी बांधता का रे? किती उलट्या काळजाचे आहात तुम्ही?”
आणि एवढी विनवणी करूनही तुम्ही जर झाड तोडणं थांबवलं नाहीत तरही तुम्हाला नाव विचारतील की, ‘आम्हा उपकारकर्त्यावरच तुम्ही कुन्हाड चालवता आहात. किती कृतघ्न आहात तुम्ही! का असं करता?”
हे तर होईलच पण याही पुढे जाऊन झाडे माणसासारखी हिशेबी झाली तर तुम्ही तोडलेल्या प्रत्येक फुलामार्ग, प्रत्येक फळामार्ग, प्रत्येक पानामागं आणि प्रत्येक लाकडामागं ती किंमत मागू लागतील आणि मगच झाडांची किंमत काय आहे हे माणसाला समजेल.
इतकं करूनही झाडे थांबणार नाहीत तर झाडे तोडणान्या माणसाविरुद्ध एक आंदोलन उभे करतील, माणसांविरुद्ध घोषणा देऊ लागतील.
“हम से जो टकरायेगा
मिट्टी में मिल जायेगा”
“”हमारी मांगे पूरी करो”
“पेड तोडना बंद करो”
इतकं करूनही आपण जर त्यांचे ऐकले नाही तर ती सर्व झाडे आक्रंदन करू लागतील. तो आवाज इतका कर्कश्य असेल की माणसाच्या कानाचे पडदे फाटून जातील.
झाडे बोलू लागली तर ती त्यांच्यावर होणान्या अन्यायाचा जाब विचारतील आणि त्यावेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतील. निसर्गावर विजय मिळविणाऱ्या मानवाला या निसर्गपुत्रासमोर शरमेने झुकावे लागेल. म्हणून म्हणते लवकर मागे व्हा. झाडे ही आपली जीवनसाथी आहेत. हे लक्षात ठेवा आणि झाडांचे संवर्धन, पालनपोषण करा. त्यांच्या मैत्रीला विश्वासघाताऐवजी कृतज्ञतेने उत्तर द्या. म्हणजे झाडे बोलू लागली तर ती म्हणतील
बहरून जाऊ आनंदाने
उभे आम्ही स्वागता,
तुम्ही मित्रता लाभो आम्हा
हीच खरी धन्यता.