प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी

प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी

एक काळ असा होता की, एखादी घटना घडली की ती सर्वांना समजायला बराच अवधी लागत असे. पण आज विज्ञानानं केलेल्या नेत्रदीपक प्रगतीमुळे जगाच्या पाठीवर कुठेही काही जरा खुद झालं तरी काही क्षणातच आपल्याला ते कळतं. आपल्यापर्यंत पोहोचतं. अर्थात याला कारणीभूत आली आहेत विविध प्रसारमाध्यमं या प्रसारमाध्यमांची संख्या गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली. रेडिओ, टीव्ही, दैनिक, वेगवेगळी नियतकालिकं, इंटरनेट यासारख्या माध्यमांमधून माहितीचा, ज्ञानाचा ओघ आपल्यापर्यंत सतत येत असतो. प्रसारमाध्यमांची जशी संख्या वाढली तशी त्यांच्यात स्पर्धाही वाढली. जास्तीतजास्त वेगाने कोण बातमी आणतो, यासाठी प्रयत्न सुरू झाले. अद्ययावत तंत्रज्ञान वापरून आपली यंत्रणा अधिकाधिक प्रगत ठेवण्यासाठी प्रत्येकाचा प्रयास आहे. पण या स्पर्धेच्या युगात वावरत असताना आपली मूळ भूमिका ही प्रसारमाध्यमं विसरत चालली आहेत काय, याचा एकदा विचार व्हायला हवा. रोडिओ म्हणजेच आकाशवाणी हे पूर्णपणे सरकारी माध्यम आहे. त्यामुळे त्याच्या प्रसारणावरही अनेक बंधन आहेत. मर्यादा आहेत. आकाशवाणीचं बोधवाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय यामुळे श्रोत्यांचं मनोरंजन करणं या प्रमुख हेतूबरोबर ज्ञान वृद्धिंगत करणं ही आकाशवाणीची प्रमुख भूमिका आहे. या भूमिकेला अनुसरूनच आकाशवाणीने सुरवातीपासूनच विकासात्मक कार्यक्रमांवर भर दिला आहे.

कुटुंबकल्याण कार्यक्रमांतर्गत एड्ससारख्या जागतिक समस्येवरही रेडिओने लक्ष केंद्रित केलेले दिसते एड्सची भयानकता आणि आपला त्यात बळी जाऊ नये यासाठी प्यायची काळजी याविषयी नाटक, भाषणं, मुलाखती चर्चा अशा विविध कार्यक्रमांमधून रेडिओ मार्गदर्शन करताना दिसतो आहे आकाशवाणीचे शैक्षणिक कार्यक्रम खेडोपाडी शाळांमधून ऐकले जातात. त्यातून योग्य ते मार्गदर्शन मिळतं. दूरध्वनीवरून संवाद साधून आता धोनेही आपले विचार, मत इतरांपर्यंत पोहचवतात त्यामुळे विचारांची देवा सहजपणे झाली आहे

दूरदर्शनच्या आगमनापूर्वी वाणीचा श्रोतृवर्ग शहरी आणि ग्रामीण भागात सारख्याच प्रमाणात होता. कारण तेच एकमेव मनोरंजनाचं साधन उपलब्ध होतं, पण १९९० नंतर दूरदर्शनवर खाजगी दूरचित्रवाणीच्या वाहिन्याचं आक्रमण झालं आणि बघता बघता शहरातील जनता आकाशवाणीला विसरली. पूर्वी एखादंच वृत्तपत्र लोकापर्यंत पोहायचं आज पाली व देशातलं साक्षरतेचं प्रमाणही वाढलं. त्यामुळे मुद्रित प्रसारमाध्यमांकडे कलाला जनतेची अभिरुचीही बदलली. तेव्हा अशापरिस्थितीत आकाशवाणीला नवी पिढी कितपत स्वीकारेल, याबद्दल खात्री देता येत नाही. म्हणूनच आकाशवाणीला प्रसारमाध्यमांच्या बलाढ्य स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवायचं असेल, श्रोत्यांना आकर्षित करून घ्यायचं असेल तर निर्मिती तंत्रज्ञान अशा सर्वच पातळ्यांवर कालानुरूप बदल घडवून आणणं आवश्यक आहे. हे आव्हान पेललं तर आकाशवाणीचं स्थान या स्पर्धेच्या युगातही अढळ राहील, यात शंका नाही.

भारतातील विविध भाषात आणि विविध प्रांतात वृत्तपत्र, नियतकालिकं, पाक्षिक, साप्ताहिक यांची सुरुवात झाली आणि त्यातून समाजसापेक्ष ज्ञानात्मक परिचयपर असं लेखन प्रसिद्ध होऊ लागलं. त्यामुळे लोकजीवनाला एक अभिरुची देणारं वळण निर्माण झाले आणि आज ही नियतकालिक आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहेत. वृत्तपत्र हे लोकसंवादाचं आणि सुधारणेचं एक प्रभावी माध्यम आहे. नियतकालिकं आणि वृत्तपत्र म्हणजे समाजाच्या ‘बृहत्तर जिव्हा’ आहेत असं जे लोकहितवादींनी म्हटलं आहे ते सार्वकालिक वृत्तपत्रसृष्टीच लागू पडतं. प्रत्येक वृत्तपत्राचं ध्येयधोरण वेगवेगळं असलं तरी वृत्तपत्रानं लोकशिक्षणाचं, जनजागृतीचं कार्य केलंच पाहिजे, यावर कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रात आज बेसुमार होणारी लोकसंख्यावाढ, बेकारी, समाजात अंधश्रद्धेचा पगडा आजही आहेच, मुमाबाजी आहे. अशा अनेक समस्या आहेत. बेकारीमुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. तरुण पिढी डोळयासमोर वाया जाते आहे. या समस्यांना योग्य प्रकारे वाचा फोडणं, त्यावर उपाय शोधणं, समाजात सुधारणा घडवून आणणं हे कार्य वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणावर करायला हवं. लेखणीचा प्रभाव मोठा असतो. समाजमन घडवणं, त्याच्या विचारांना योग्य दिशा दिग्दर्शन करणं हे या नियतकालिकांनी करणं अपेक्षित आहे. लोकशाहीचे जे चार स्तंभ मानले जातात, त्यापैकी वृत्तपत्र हा एक स्तंभ आहे. वृत्तपत्रांना काही बंधनं असतातच, पण आपल्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग त्यांनी विधायक कामांकरिताच करायला हवा. सामान्य माणसाला त्याचं मत बनवण्यासाठी अचूक माहिती पुरविली पाहिजे, ज्या मतदारांच्या अमूल्य मतावर देशाचं भवितव्य अवलं असतं त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वृत्तपत्रांनी कोणत्याही एका पक्षाची बांधिलकी न स्वीकारता निःपक्षपातीपणाचं धोरण स्वीकारलं पाहिजे. अशा स्थितीत समाजाला मार्गदर्शन करणं हे आजच्या वृतपत्रांसमोरील मुख्य आव्हान आहे. दहतवादाला दडपशाहीला खतपाणी न घालता त्यांना नेटानं विरोध करून त्यांचं समूळ उच्चाटन करण्याची लोकांची मानसिकता खंबीरपणाची, धैर्याची बनवणं, त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणं हे वृत्तपत्रांच प्रमुख काम आहे. वर्तमानपत्राचं वाचन करण्यासाठी, त्यातून माहिती मिळविण्यासाठी माणूस किमान साक्षर असावा लागतो. पण टीव्ही म्हणजे दूरचित्रवाणी या माध्यमाचा ज्ञानार्जनासाठी वापर करण्यासाठी कोणतीही पात्रता आवश्यक नसते. इतकं हे प्रभावी माध्यम आहे. २ ऑक्टोबर १९२५ रोजी स्कॉटलंडमधील ग्लासगो या शहरात जॉन लॉगी बेअर्ड याने टेलिव्हीजनचा शोध लावला तो EE या हेतूनं. EE म्हणजे Education through Entertainment. थोडक्यात सांगायचं तर मनोरंजन करता करतालोकशिक्षण ही दूरचित्रवाणीच्या शोधामागची प्रमुख भूमिका होती. व्यावसायिक स्पर्धा, पैसा यांचा विचार करूनही आज दूरचित्रवाणी माध्यमाचा विधायक उपयोग करता येईल. आज खेडोपाडी टीव्ही पाहिला जातो, कधीही पूर्ण न होणारी स्वप्नं या प्रेक्षकांना दाखविण्यापेक्षा देशातलं भयानक वास्तव, वेगवेगळ्या समस्या, त्यांच्यासमोर मांडल्या पाहिजेत. सामान्य माणसामध्ये जागृती घडवून आणली पाहिजे. त्याला विचार करायला भाग पाडलं पाहिजे. तरच या समस्यांवर उपाय निघू शकेल. प्रत्येकजण देशाच्या हितासाठी फुल ना फुलाची पाकळी देईल. दूरचित्रवाणीनं या प्रकाराचे कार्यक्रम प्रसारित करावेत यासाठी कायदेशीर बंधनं घातली पाहिजेत. केवळ मनोरंजनापायी काहीच साध्य होणार नाही. जेव्हा कधी ही सबंगता, बीभत्सता, अनैतिकता छोट्या पडद्यावरून लोप पावेल, तेव्हाच त्याच्या जनकाच्या आत्म्याला शांती लाभेल. अन्यथा टेलिव्हीजनचा शोध लावल्याबद्दल पश्चातापाची भावनाच त्याला छळत राहील!

प्रसारमाध्यमांची मूळ भूमिका, त्यांची सध्याची परिस्थिती आणि नव्या शतकात त्याच्यासमोरची आव्हानं यावरून एकच लक्षात येतं, माध्यम कोणतं असो, त्यांनी कालानुरूप देशातील स्थितीनुरूप आपल्या कामाच्या स्वरुपात, ध्येयधोरणात योग्य आणि ‘इष्ट’ बदल करणं आवश्यक आहे. शेवटी कालाय तस्मै नमः हेच खरं!

Also read:-

अंधश्रद्धा वर मराठी निबंध