स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण | Speech on Veer Savarkar In Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर

इतिहासा तू वळून पाहसी पाठीमागे जरा

झुकवूनी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा

सम्माननीय परीक्षक आणि स्पर्धक मित्रांनो, ज्यांच्याबद्दल बोलताना शब्दशब्दी स्वतःच्या मर्यादिची जाणीव होत राहते आणि हृदयात लाव्हारसाचे स्फूलिंग पेट घेतात असे अमर्याद, लोकोत्तर व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होय! गगनाला भिडणारा झंझावात जेव्हा मानवरूप धारण करतो तेव्हा विनायक दामोदर सावरकरासारखे व्यक्तिमत्व संपन्न होते. त्यांची प्रत्येक कृती म्हणजे आकाश खेचून आणणारी बाली लाटच आणि भारतमातेचे सदन ऐकून ही लाट जेव्हा इंग्रजावर कोसळली तेव्हा तिला एकाच किनान्याची आस होती. स्वतंत्र हिंदुस्थान, अखंड हिंदुस्थान हेच एकमेव ध्येय होते. हीच एकमेव प्रतिज्ञा होती.

https://shikshaved.com

स्वातंत्र्यवीर सावकरांचे संपूर्ण जगणे हीच एक ज्वलंत प्रतिक्षा होती. ब्रिटिश सरकारला नेस्तनाबूत करण्यासाठी मिळमिळीत सपक धोरण उपयोगी पडणार नाही हे त्यांनी कोवळ्या बालपणीचं जाणले होते. म्हणूनच मध्यरात्री नीरव शांततेत दुर्गामातेपुढे लीन होऊन हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी जीवनाचे समर्पण करण्याची प्रतिज्ञा त्यांनी घेतली आणि

तुजसाठी मरण ते जनन

तुजवीण जनन ते मरण

असा आपल्या आयुष्याचा यज्ञ मांडलाला

२८ मे १८८३ मध्ये जन्मलेल्या विनायक दामोदर सावरकरांचे बालपण अशा निखाऱ्याच्या पाऊलवाटेवरच सुरू झाले. उत्तमोत्तम कविता, पोवाडे, कहाण्या चरित्रे ऐकून त्यांचा पिंड पडत गेला. वडील दामोदरपंत व आई राधाबाई या दोघांनी आपल्या सर्व मुलांवर जाणीवपूर्वक संस्कार केले आणि माता-पित्यांच्याचा संस्कारामुळे वादळ निर्माण करण्याचे व वादळाशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण झाले. लहानग्या हातांना जी पुस्तके उचलत नसत अशा अवजड आकाराची व अवघड विचारांची पुस्तके वयाच्या आठव्या नवव्या वर्षीच सावरकरांनी वाचून काढली. त्यांच्या एकूण वाडमयावर संस्कृतचा जो रत्नकांचनी ठसा आहे त्याचे मूळ या अभिजात वाङमयाच्या वाचन-मननात सापडू शकते. वयाच्या १० व्या वर्षीच त्यांच्या कविता विख्यात नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या. त्या बालपणीही प्रौढता, ओज आणि तेज त्यांच्या विचारात होते आणि या सर्वांना होता मातृभूमीच्या प्रेमाचा परिस स्पर्श, वाङमयाच्या व्यासंगामुळे त्यांची वाणी प्रभावी व विचार स्वच्छ झाले. कुतुहलामुळे लेखनाला संशोधनाचे स्वरूप आले आक्रमकतेमुळे शब्द उत्कट व जहाल झाले आणि स्वतंत्र हिंदुस्थाच्या ध्यासामुळे त्याला ज्वालामुखीचे रूप प्राप्त झाले. त्यांच्या अमोघ वाणीने श्रोते भारावून जात. तारुण्यातील पहाटे त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ स्थापन केला. पुढच्या झंझावाताची ही केवळ ठिणगी होती आणि ठिणगी म्हणजे विराट वणव्याची माऊलीच. त्या वणव्याचे भास इंग्रजांना रात्रीही होऊ लागले.

आणि मग सुरू झाला. साक्षात संघर्ष, आपल्या घणाघाती भाषणांनी त्यांनी इंग्रजांची झोप उडवली. त्यांच्या ओजस्वी भाषणांनी आणि तेजस्वी व मातृभूमीच्या प्रेमाने भरलेल्या लेखांनी अनेक तरुणांच्या मनात स्वातंत्र्यांचे स्फूलिंग जन्मले आणि त्या स्कूलिंगाने प्रेरित होऊन मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे असे अनेक तरुण मायभूसाठी हसत-हसत फासावर गेले. बॅरिस्टर होण्यासाठी सावरकर विलायतला गेले. पण मायभूच्या स्वातंत्र्याचा ध्यास तिथेही होताच. तिथेही अभिनव भारताची चळवळ त्यांनी उभारली तर तिथून अनेक शास्त्रे त्यांनी भारतातील क्रांतिकारकांना पाठवली. १९११ साली सावरकरांना राजद्रोहाच्या आरोपाखाली काळ्या पाण्याची शिक्षा झाली. ती अंदमानात ! ती शिक्षा भोगून ते परतले आणि पुन्हा एकदा ब्रिटिशांविरोधी मजकूर लिहिला म्हणून त्यांना सरकारने अटक केली. गरुडाला पिंज-यात कोंडण्याचा प्रयत्न केला आणि मग सिद्ध झाली ती ऐतिहासिक सागर झेप. जिचं कौतुक प्रत्यक्ष हनुमानानंही करावं. मोरिया जहाजाच्या होल.. मधून खवळलेल्या समुद्रात मारलेली उडी. पाठीमागून जहाजातून होणारा गोळीबार पण त्या रत्नाकरालाही त्यांची मायभूची ओढ माहित होती. म्हणूनच तो उसळत राहिला आणि एकाही गोळीचा स्पर्श आपल्या या सुपुत्राच्या अंगाला त्याने होऊ दिला नाही. अंदमानातून सावरकरांनी त्याला घातलेली ती हाक….

ने मजसी ने, परत मातृभूमीला

सागरा प्राण तळमळला /

… तो अजूनही विसरला नव्हता

२६ फेब्रुवारी १९६६ ला या महापुरुषांचे महानिर्वाण झाले. इतिहासकार जेव्हा आधुनिक भारताचा इतिहास लिहितील तेव्हा ब्रिटिशांच्या छाताडावर पाय रोवून स्वातंत्र्यांच्या उंबरठ्यावर उभी असलेली वीर सावरकरांची भव्य मूर्ती त्यांना प्रथम रंगवावी लागेल. कारण भारताच्या स्वातंत्र्य इतिहासाच्या क्षणाक्षणावर सावरकरांची तेजस्वी प्रतिमा उमटलेली आहे. म्हणूनच तू हिमाचलापासून ते सावरकरांचा ऋणी असणाऱ्या रत्नाकरापर्यंतच्या या मातृभूमीला सावरकरांच्याच शब्दात वंदन करून त्यांच्या स्मृतीक्षणांना सजीव करूया

जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती त्वाम्यहम् यशोयुता वंदे वंदे मातरम् ।

Download File

Leave a Comment