Surya Namaskar Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो व्यायाम हा प्रत्येकासाठीच महत्त्वाचा असतो. मग तो लहान असो की थोर, स्त्री असो की पुरुष प्रत्येकाने व्यायाम करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. मात्र आजच्या धावपळीच्या युगामध्ये तुम्हाला सर्वांगीण व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणूनच सूर्यनमस्कार घालण्याचा सल्ला दिला जातो. सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांचा योग्य रीतीने व्यायाम होतो. तसेच शरीर निरोगी बनण्यास मदत मिळते, चेहरावर तेज येते, आणि आपले आयुष्य नक्कीच काहीतरी कालावधीसाठी का होईना वाढत असते.

सूर्यनमस्कारची संपूर्ण माहिती Surya Namaskar Information In Marathi
आजच्या भागामध्ये आपण या सूर्यनमस्कारांविषयी माहिती घेणार आहोत. आणि त्यांच्या विविध फायद्यांविषयी देखील जाणून घेणार आहोत…
नाव | सुर्यनमस्कर |
प्रकार | व्यायामप्रकार |
कार्य | शारीरिक व्यायाम करणे |
फायदे | शरीर मजबूत, आणि तेजपूर्ण होते |
शोध | औंध चे राजे भगवान श्रीनिवासराव पंत |
शोध वर्ष | १९२८ |
संदर्भ पुस्तिका | द टेन पॉईंट्स वे टू हेल्थ |
सूर्यनमस्कार केव्हा करावे:
मित्रांनो, सकाळच्या सूर्योदयाचा वेळ हा सूर्यनमस्कार करण्यासाठी सर्वोत्तम असतो. सूर्य नमस्कार सोबतच इतरही प्रकारचा व्यायाम यावेळी करणे खूपच फायदेशीर ठरते. यावेळी मोकळ्या हवेमध्ये सूर्यनमस्कार करण्यात यावे, आणि पोट अगदी रिकामी असावे. मात्र पाणी पिलेले चालते. या योगासनामुळे आणि सूर्यनमस्कारामुळे तुम्हाला मनशांती लाभण्यास मदत मिळते.
सूर्यनमस्काराचा शोध:
मित्रांनो, सूर्यनमस्काराचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुमच्या मनात सहाजिकरित्या प्रश्न पडला असेल, की या सूर्यनमस्काराचा शोध कोणी लावला. तर सर्वप्रथम १९२८ या वर्षी प्रकाशित झालेल्या द टेन पॉईंट वे टू हेल्थ या पुस्तकामध्ये सूर्यनमस्कारांचे वर्णन आढळून येते.
हे पुस्तक औंध संस्थांनाचे राजे, भगवान श्रीनिवासराव पंथ यांनी लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी अनेक सूर्यनमस्कार विषयी माहिती दिलेली आहे, मात्र त्यांनी या सूर्यनमस्काराच्या पद्धतीचे श्रेय घेण्यास नकार दिला. कारण त्यांचे म्हणणे असे होते की, सूर्यनमस्कार फार पूर्वीपासून चालत आलेली एक मराठी प्रथा आहे.
सूर्यनमस्कारामध्ये कोणकोणती असणे केली जातात?
मित्रांनो सूर्यनमस्कारामध्ये क्रमांने १२ प्रकारची आसने केली जातात, त्यामध्ये सर्वप्रथम अभिवादन करून सुरुवात केली जाते. त्यानंतर हस्त उत्तनासन, उत्तनासन, अश्वासन, चतुरंग दंडासन, अष्टांगासन, भुजंगसान, पर्वतासन किंवा अधोमुक्त स्वानासन, अश्वासन, हस्त उत्तानासन आणि पुन्हा शेवट अभिवादन केले जाते.
सूर्यनमस्कार घालण्याचे फायदे:
मित्रांनो, वेगवेगळ्या सूर्यनमस्काराचे वेगवेगळे फायदे असले, तरीदेखील एकत्रित सर्व सूर्यनमस्काराचे फायदे समान आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवले जाते. कारण सूर्यमास्कारांच्या सर्वच पद्धतींमध्ये श्वासावर नियंत्रण ठेवले जात असल्यामुळे, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी खूपच फायदा होतो. आणि संपूर्ण शरीरामध्ये रक्त सहजतेने फिरत असल्यामुळे, हृदयाच्या नसा देखील खूपच मजबूत होत असतात.
याच बरोबरीने आज कालची सर्वात जास्त समस्या समजली जाणारी म्हणजे लठ्ठपणा होय. लठ्ठ लोकांनी नियमित सूर्यनमस्कार घातल्यास, हळूहळू त्यांचे वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. आणि शरीर देखील योग्य आकारांमध्ये येते.
पचनसंस्था देखील मजबूत करण्याचे काम या सूर्यनमस्कारांद्वारे केली जाते. ज्या लोकांची पचन संस्था खराब असेल, त्यांना खाल्लेले अन्न पचत नाही. परिणामी शरीर देखील म्हणावे तसे वाढत नाही. मात्र सूर्यनमस्कार घातल्यामुळे पचन संस्था सुरळीत होते, आणि शरीर देखील योग्य आकार घेऊ लागते.
अनियमित मासिक पाळी असणाऱ्या स्त्रियांसाठी सुद्धा सूर्यनमस्कार खूपच फायदेशीर ठरत असतात. सोबतच यामुळे पोटात होणाऱ्या तीव्र वेदना देखील कमी होण्यास मदत मिळते.
सूर्यनमस्कारांमुळे शरीरातील स्नायू आणि सांधे अतिशय मजबूत होतात. आणि शरीरामध्ये ताकद भरण्यास मदत मिळते. यामध्ये हात व पाय खूपच मजबूत होत असतात.
मित्रांनो, सूर्यनमस्कारामुळे रक्त संचालन चांगले होते, हे आपल्याला माहितीच आहे. परिणामी शरीरातील सर्वच भागांसह चेहऱ्यामध्ये देखील रक्ताचा चांगला पुरवठा होतो. आणि चेहऱ्यावर चांगले तेज येण्यास मदत होते. यासोबतच शरीराचा रंग देखील उजळतो. याशिवाय दैनंदिन जीवनातील चिंता, आजार, विविध विकार यांच्यापासून सुटका होण्यास मदत मिळते.
सूर्यनमस्कार करताना काय काळजी घ्यावी?
मित्रांनो, सूर्यनमस्कार फायद्याचे असले, तरी देखील काही स्थितीमध्ये सूर्यनमस्कार करणे निशिद्ध मानले गेलेले आहे, किंवा किमान सावधगिरी बाळगणे देखील महत्त्वाचे ठरते.
स्त्रियांना मासिक पाळी मध्ये हा सूर्यनमस्कारांचा प्रकार फायदेशीर ठरत असला, तरी देखील या दिवसांमध्ये सूर्यनमस्कार न करण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा रक्तस्त्रावाचे प्रमाण वाढते.
सूर्यनमस्कार केल्यानंतर लगेचच अंघोळ करू नये, जेणेकरून शरीराचे तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा बिघडते. सूर्यनमस्कार केल्यानंतर कमीत कमी आंघोळीसाठी पंधरा मिनिटे तरी थांबावे असे सांगितले जाते.
सूर्यनमस्कार करताना कोणत्या स्थितीमध्ये श्वास घ्यावा, आणि केव्हा सोडावा याबाबत तुम्हाला योग्य माहिती असली पाहिजे. अन्यथा या सूर्यनमस्काराचा फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो.
ज्या रुग्णांना पाठ किंवा पोट याबाबत समस्या असतील, किंवा ऑपरेशन झालेले असेल, किंवा हल्लीच काही दुखापत झाली असेल. तर त्यांनी सूर्यनमस्कार करू नये.
निष्कर्ष:
मित्रांनो, योगासन हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये मोलाची भूमिका निभावत असते, योगासनामुळे कसाही व्यक्ती असला तरी देखील अगदी प्रसन्न तेजोमय आणि चंचल होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर कुठल्याही शरीराच्या भागाचे दुखणे असेल, तर यावर सूर्यनमस्कार एक रामबाण इलाज ठरत असतो.
आजच्या भागामध्ये आपण या सूर्यनमस्कारांविषयी माहिती घेतलेली आहे. यामध्ये सूर्यनमस्कार म्हणजे काय, सूर्यनमस्कार कधी केले जावेत, याचा शोध कोणी लावला, तसेच यातील विविध आसनांची नावे काय आहेत, सूर्यनमस्कार करण्याची योग्य पद्धती काय आहे, व त्यापासून काय काय फायदे होतात, सूर्यनमस्कार करताना घ्यावयाच्या काळजा, तसेच यासाठीची योग्य वेळ इत्यादी गोष्टींबद्दल माहिती बघितली आहे. सोबतच सूर्यनमस्कारामागे काय विज्ञान आहे, याची देखील कारणमीमांसा बघितलेली आहे. आणि या सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.
FAQ
सूर्यनमस्कार करणे का महत्त्वाचे समजले जाते?
सूर्यनमस्कारामध्ये मुख्य किती प्रकारांचा समावेश होतो?
सूर्यनमस्काराविषयी काय सांगाल?
सूर्यनमस्कारासाठी कोणती वेळ योग्य समजली जाते?
सूर्यनमस्कार कोणी करू नये?
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सूर्यनमस्काराच्या बद्दलची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला अवश्य आवडली असेल, तुमच्यातील अनेक जण सूर्यनमस्कार करत असतील तर काही अद्याप सुरू करणार असतील. या सर्वांना शुभेच्छा. मित्रांनो, सूर्यनमस्काराविषयीची तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये अवश्य कळवा, आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणी पर्यंत या सूर्यनमस्काराच्या विषयीची माहिती पाठवा.
धन्यवाद…!