Rain Water Harvesting Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज काल पावसाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर घटलेले आहे. त्यामुळे वापरासाठी आणि पिण्यासाठी देखील पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग, अर्थात जलसंधारणाची गरज लक्षात येऊ लागलेली आहे. जून २०१९ या महिन्यापर्यंत भारतामध्ये असलेला पाणी पुरवठा सुमारे ६५ टक्के इतका कमी झाला होता. आणि या गंभीर पाणी टंचाईमध्ये शासनाने अनेक धोरणे राबवलेली आहेत.

रेन वॉटर हार्वेस्टिंगची संपूर्ण माहिती Rain Water Harvesting Information In Marathi
ज्या प्रमाणावर लोकसंख्या वाढत आहे, त्या प्रमाणावर पावसाचे प्रमाण मात्र वाढताना दिसत नाही, त्यामुळे वाढत्या लोकसंख्येसाठी पाणी पुरवण्याकरिता इतर पर्याय अवलंबवने खूपच गरजेचे ठरते.
पाणी पुरविण्याकरिता पाणी वाचविणे, आणि आहे त्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे फारच गरजेचे असते. आणि यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग हे कमालीची भूमिका बजावत असते. आजच्या भागामध्ये आपण या रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल इत्यंभूत माहिती बघणार आहोत.
मित्रांनो, रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रक्रियेला रेन्फॉल हार्वेस्टिंग असे देखील नाव आहे. यामध्ये शेत अथवा इतर पृष्ठभागावर पडणाऱ्या पाण्याला साठवून त्याचा गरजेच्या काळामध्ये वापर केला जातो. यामध्ये जमिनीवरील पडणारे पाणी वाहून जाण्याच्या आधी किंवा जमिनीमध्ये मुरण्याच्या आधीच त्याचे संकलन केले जाते.
यामध्ये केवळ पाणी गोळा करणे, इतकेच गोष्ट अंतर्भूत नसून, त्या पाण्याची स्वच्छता करून त्याला वापरण्यायोग्य तयार करणे, आणि योग्य रीतीने साठवून ठेवणे याचा देखील समावेश होतो. या प्रक्रियेचा वापर राजस्थान सारख्या राज्यांमध्ये फार पूर्वीपासून केला जात आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या पद्धती:
मित्रांनो, पावसाचे पाणी जमा करण्याच्या विविध पद्धती असून, या मध्ये अनेक नवनवीन विकसित तंत्रज्ञान देखील वापरले जाते.
भूपृष्ठावर पडणारे पाणी संकलित करण्याकरिता, ते मुरण्याआधीच गोळा करावे लागते. मात्र असे पाणी खराब देखील असू शकते. या पाण्याची साठवन मोठ्या प्रमाणावर केली जाते. यासाठी विहीर, तलाव, किंवा धरणे इत्यादी गोष्टींचा वापर केला जातो.
जलसंधारणाचा छप्पर प्रणाली हा देखील एक प्रकार असून, यामध्ये छतावर जमा झालेले पाणी एका कोपऱ्यामधून ड्रेनेज पाईपच्या साह्याने गोळा केले जाते. आणि गाळून व ब्लिचिंग च्या साह्याने शुद्ध करून घरगुती वापरा करता प्रयोगात आणले जाते. या पाण्याचे चांगल्या रीतीने शुद्धीकरण केल्यास, हे पाणी पिण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.
राजस्थान सारख्या राज्यामध्ये जमिनीखाली टाक्या बांधून, त्यामध्ये पाणी साठवले जाते. हे राजस्थानमध्ये जोहड प्रक्रिया म्हणून देखील ओळखले जाते. यामध्ये अनेक फायदे होतात. जसे की जमिनीमध्ये पाणी साठवल्यामुळे ते थंड राहते, त्यामध्ये बाष्पीभवन होण्याची समस्या देखील कमी असते. मात्र यामध्ये काही दूषित घटक मिसळण्याची किंवा खराब पाणी मुरण्याची देखील समस्या जाणवू शकते. आणि या पाण्याला काढण्याकरिता जास्त कष्ट घ्यावे लागतात.
रेन वॉटर हार्वेस्टिंग चे फायदे:
रेन वॉटर हार्वेस्टिंग मुळे पाण्याची कमतरता असणाऱ्या कालावधीमध्ये घरगुती वापरा करता या पाण्याचा वापर करता येऊ शकतो.
शेती क्षेत्रात उन्हाळ्यामध्ये शेताला पाणी देण्याकरिता तलावासारख्या ठिकाणी साठवलेले पाणी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
ज्या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई जाणवत असते, अशा ठिकाणी अगदी स्वच्छ करून पिण्यासाठी देखील या पाण्याचा वापर केला जातो.
अनेक ठिकाणी उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी पाणी उपलब्ध नसते, मात्र या कालावधीत केलेल्या भाजीपाल्याला चांगला भाव मिळतो. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्नासाठी देखील या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो.
नदीला अतिरिक्त पाणी वाहून गेले, तर त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नदीला पूर येण्याची शक्यता असते. अशा स्थितीला नियंत्रणात आणण्याकरिता देखिल जलसंधारणाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.
या पाण्याचा चांगला उपयोग केला गेल्यामुळे शेतामध्ये अधिक कालावधीसाठी साचणारे पावसाची पाणी देखील कमी केले जाऊ शकते.
निष्कर्ष:
मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटलेले आहे. आणि यासाठी प्रदूषण व झाडांची संख्या कमी होणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. मात्र असे असले तरी देखील वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आणि या दोन्ही वेगवेगळ्या समस्या लक्षात घेता, मानवाला पाण्याची कमतरता भासत आहे.
पहिल्या काळात उन्हाळ्यामध्ये अगदी शेवटी शेवटी पाण्याची टंचाई भासत असे, मात्र आजकाल पावसाळा संपून दोन महिने लोटले नाही तोच हिवाळ्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येत आहे. यासाठी पाणी योग्य रीतीने व जपून वापरणे गरजेचे ठरते.
मित्रांनो, सद्यस्थितीत पृथ्वीवर पडणारा पाऊस मानवाची गरज भागविण्याकरिता पुरेसा आहे. मात्र यातील बरेचसे पाणी वाहून नदीला जाऊन मिळते. आणि ते पुढे समुद्राला गेल्यानंतर पिण्यायोग्य व वापरा योग्य राहत नाही. या करिता पाऊस ज्या ठिकाणी पडतो तेथेच पावसाचे पाणी अडवून आणि जिरवून भूजल पातळी वाढविणे, तसेच छतावर किंवा इतर ठिकाणी पडणारे पाणी गोळा करून त्याचा पुनर्वापर करणे गरजेचे ठरत आहे.
आजच्या भागामध्ये आपण याच प्रक्रियेविषयी अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल माहिती बघितली आहे. यामध्ये मुख्यतः रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय, व त्याच्या पद्धती काय असतात, पाणी वाचवण्यासाठी काय उपाय केले पाहिजे, या रेन वॉटर हार्वेस्टिंग चे प्रकार काय आहेत, व त्यापासून काय फायदे मिळतात.
शासनाच्या याकरिता काही योजना आहेत का, व भारतामध्ये या संकल्पनेची सद्यस्थिती काय आहे, इत्यादी गोष्टींबद्दल माहिती घेतलेली आहे. शिवाय काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितले आहेत. ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरली असेल, व तुम्हाला पाणी वाचवण्याची प्रेरणा देखील मिळाली असेल अशी आशा आहे.
FAQ
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय?
रेन वॉटर हार्वेस्टिंग या संकल्पनेचा शोध कोणी लावलेला आहे?
पावसाचे प्रमाण कमी होण्यामागे कोणते मुख्य कारण आहे?
पावसाच्या पाण्याची साठवण करणे का गरजेचे ठरत आहे?
रेन वॉटर हार्वेस्टिंग करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे असते?
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात जलसंधारण याविषयी माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेलच, तर मग पटापट कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती आवर्जून शेअर करा.
धन्यवाद…!