Janjira Fort Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो अलिबाग पासून अवघ्या ५५ किलोमीटर अंतरावर मुरुड जंजिरा हा किल्ला वसलेला असून, महाराष्ट्राच्या दैदीप्यमान इतिहासामध्ये या किल्ल्याने खूप मोलाची कामगिरी केलेली आहे. समुद्रकिनारी बेटांवर वसलेला हा किल्ला अतिशय अभेद्य स्वरूपाचा असून, तो आजपासून साडेतीनशे वर्ष आधीपासून अस्तित्वात आहे. याच्या बांधकामासाठी तब्बल २२ वर्षांचा कालावधी लागला असून, एक अतिशय मजबूत आणि उत्तम किल्ला म्हणून याची ओळख आहे.

जंजिरा किल्याची संपूर्ण माहिती Janjira Fort Information In Marathi
समुद्रकिनाऱ्यापासून ९० फूट उंचीवर असणारा हा किल्ला वीस फूट खोल पाण्याचा परिसरामध्ये आहे. या संपूर्ण किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे २२ एकर असून, येथे २२ सुरक्षा बुरुज आहेत. सिडके सम्राटांनी नियंत्रण मिळवलेला हा किल्ला जिंकण्यासाठी अनेक शासकाने प्रयत्न केले, मात्र त्यामध्ये ते अपयशी ठरले.
आजच्या भागामध्ये आपण या जंजिरा किल्ल्याबद्दल इत्यंभूत माहिती बघणार आहोत…
नाव | जंजिरा |
जोड नाव | मुरुड जंजिरा |
प्रकार | किल्ला |
ठिकाण | मुरुड, रायगड |
जवळील गाव | राजापुरी |
समुद्रसपाटीपासून उंची | ९० फूट |
किल्ल्याची उंची | ४० फूट |
किल्ल्या जवळील पाण्याची खोली | वीस फूट |
मित्रांनो सुमारे १५ व्या शतकामध्ये बांधण्यात आलेला हा किल्ला बांधण्यामागे समुद्री चाचा पासून मच्छीमारांचे रक्षण व्हावे या उद्देशाने बांधण्यात आला होता. यासाठी अहमदनगर मधील निजामशाही या सल्तनतने परवानगी दिली होती. पुढे तीराम खान यांनी हा किल्ला जिंकला.
त्यानंतर मलिक अंबर सिद्धी यांनी देखील या किल्ल्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काँक्रीट मध्ये हा किल्ला बांधला होता. या किल्ल्याची तटबंदी अतिशय भक्कम असून, या तटबंदीला तोडण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले गेले, मात्र प्रत्येक वेळी हे प्रयत्न अपयशी ठरले.
जंजिरा किल्ल्याची रचना:
मित्रांनो, मुख्यतः पंधराव्या शतकामध्ये लाकडापासून बांधण्यात आला असला तरी देखील हा किल्ला १७ व्या शतकामध्ये संपूर्णतः बांधून पूर्ण झाला होता. आज बघितले तर या किल्ल्यावरील बहुतांश भाग हा भग्नावस्थेमध्ये गेलेला असून, या किल्ल्यावर चावरी, लांडा, आणि कलाल बांगडी नावाच्या अतिशय ऐतिहासिक व उल्लेखनीय तोफा आहेत.
या किल्ल्याला दोन दरवाजे असून, प्रवेशद्वारातून दरबार हॉलमध्ये जाण्यासाठी जेट्टीला तोंड करून असणारा दरवाजा वापरला जातो. या किल्ल्याची इमारत पूर्वीच्या काळी तीन मजल्यांची होती, मात्र हल्ली ही इमारत मोडकळीस आलेली आहे. दुसरा दरवाजा हा समुद्राकडे उघडतो, ज्याला दर्या द्वार नाव दिलेले आहे. व हा पश्चिम दिशेकडे वसलेला आहे.
निजामशहाच्या परवानगी बाबत माहिती:
मित्रांनो, वर आपण बघितले की या किल्ल्यासाठी निजामशाहाची परवानगी घेण्यात आली होती. कारण समुद्री चाच्याबपासून बचाव करण्यात यावा, म्हणून या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले होते. ज्यावेळी हा किल्ला बांधला गेला, त्यावेळी तो लाकडी स्थितीत होता. परवानगी घेतल्यामुळे पंधराव्या शतकापर्यंत या किल्ल्याची देखरेख करण्याचे कार्य निजामशहा करत असे.
मित्रांनो, जंजिरा किल्ला हा २४ तास उघडा नसतो, सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये पर्यटक या ठिकाणी येत असतात, मात्र इतर वेळी हे दरवाजे बंद असतात.
मुरुड जंजिरा हा किल्ला बघण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. मात्र तुम्ही या ठिकाणी गेल्यावर तेथील पार्किंग खर्च आणि किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बोटीच्या तिकिटाचा खर्च एवढाच खर्च तुम्हाला करावा लागेल.
जंजिरा किल्ल्याच्या आसपास असणारे विविध पर्यटन स्थळे:
मित्रांनो, मुरुड जंजिरा हा किल्ला अतिशय आकर्षक असला, तरी देखील त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये अनेक पर्यटन स्थळे असून, ते देखील बघण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहेत. त्यामध्ये कासा किल्ला, गारंबी धरण, अहमद पॅलेस, गारंबी धबधबा, मुरुड बीच, इत्यादी गोष्टींचा समावेश होत असतो. ही सर्व ठिकाणे या जंजिरा किल्ल्यापासून अतिशय जवळच्या अंतरावर असून, जंजिरा किल्ल्याचा सहलीमध्ये तुम्ही ही ठिकाणे बघून तुमच्या आनंदामध्ये आणखी भर घालू शकता.
किल्ल्यावर असणारे गोड्या पाण्याचे तलाव:
मित्रांनो, हा किल्ला समुद्रामध्ये असल्यामुळे इथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा भागवला जात असेल, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येणे साहजिक आहे. त्यासाठी या किल्ल्यावर सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी एका गोड्या पाण्याचा तलाव बनवण्यात आलेला असून, आजूबाजूला समुद्राचे खारे पाणी असले तरी देखील या किल्ल्यामध्ये तुम्हाला गोड पाणी वापरायला मिळू शकते. याच किल्ल्याच्या तलावाजवळ शाह बाबा यांची समाधी देखील आहे.
या किल्ल्यावर भेट देण्याकरिता ऑक्टोबर ते मार्च हा कमी उष्णतेचा कालावधी अतिशय उत्कृष्ट समजला जातो.
या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम जवळील मुरुड या गावांमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी पोहोचणे गरजेचे असते. या जवळच्या ठिकाणावर येण्यासाठी तुम्हाला विमान, रेल्वे किंवा बस यांपैकी कुठलेही साधने वापरता येऊ शकतात. आणि समुद्रकिनाऱ्यापासून किल्ल्यापर्यंत तुम्हाला प्रवास हा स्थानिक बोटीने करावा लागतो.
निष्कर्ष:
मित्रांनो, मुरुड जंजिरा हा किल्ला म्हटलं की आपल्याला लगेच समुद्रकिनारा आठवतो. समुद्रामध्ये असलेला हा किल्ला एक अतिशय अभेद्य किल्ला असून, अनेक लोकांनी या किल्ल्यावर स्वारी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये त्यांना अपयश मिळाले होते.
आजच्या भागामध्ये आपण या मुरुड जंजिरा किल्ला विषयी माहिती बघितली असून, त्यामध्ये तुम्हाला या किल्ल्याचा इतिहास बघायला मिळाला असेल.
सोबतच त्या किल्ल्याची रचना कशी आहे, या किल्ल्याच्या बांधकामासाठी कोणाकडून परवानगी घेण्यात आली होती, त्याचबरोबर या किल्ल्याला उघडण्यासाठी व बंद होण्यासाठी काही वेळा आहेत का, व असतील तर त्या काय, या किल्ल्यावर पर्यटनाला जाताना किती प्रवेश शुल्क द्यावे लागते, या किल्ल्याच्या परिसरामध्ये अजून कोणती पर्यटन स्थळे, व प्रेक्षणीय स्थळे आहेत, त्याबद्दल माहिती दिली आहे.
यासोबतच या किल्ल्यावर असणारे गोडे पाण्याचे स्त्रोत, या ठिकाणी खरेदी करण्यासाठी उत्तम वस्तू, या किल्ल्यावर जाण्यासाठी उत्तम वेळ व मार्ग, तसेच या किल्ल्याच्या प्रवासामध्ये कुठे थांबावे, या किल्ल्याची वैशिष्ट्ये काय आहेत, इत्यादी माहिती बघितल्यामुळे तुमचे अनेक प्रश्न निरसित झाले असतील, त्याचबरोबर आपण काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल.
FAQ
जंजिरा किल्ला कोठे स्थित आहे?
जंजिरा या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून ची उंची साधारणपणे किती आहे?
मुरुड जंजिरा किल्ल्याच्या आसपास समुद्राचे पाणी साधारणपणे किती खोल आहे?
जंजिरा किल्ल्याच्या प्रसिद्धी मागे काय कारण आहे?
जंजिरा या किल्ल्याचे बांधकाम कोणाद्वारे करण्यात आले होते?
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मुरुड जंजिरा या किल्ल्याविषयी माहिती बघितली आहे, ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये लिहा. तसेच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती वाचायला देण्यात यावी, याकरिता त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा.
धन्यवाद…!