15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | Independence day Essay in Marathi

Independence day Essay in Marathi

स्वातंत्र्य सुरक्षित राहायचे असेल तर…

आजादी वतन की ले आए हैं। आजाद दिलों को करना है कागज पे कोरा नक्शा है रंगों को अभी तो भरना है।

१५ ऑगस्ट, १९४७ ची रात्र. रात्रीचे बारा वाजलेले. निसर्ग घोर अंधःकारात निःस्तब्ध असताना आमच्या नेत्यांनी आपल्या हातात सत्ता घेतली. सर्व भारतवर्षात चैतन्याचा संचार झाला. दीडशे वर्षांची ब्रिटिशांची गुलामगिरी झुगारून दिली, श्वास मोकळे झाले. आम्हांला वाटायला लागलं की, आमची गुलामगिरीची शृंखला तोडून

आम्ही स्वतंत्र झालो. स्वातंत्र्याची पाहिलेली सारी स्वप्नं, त्यासाठी केलेले

कष्ट, झेललेल्या यातना साऱ्या साऱ्यांचं चीज झालं.

आता आम्ही स्वतंत्र आहोत. आमचं नागरिकत्व अबाधित राहील. कमजोर लोकांवर आता कोणीही अत्याचार करणार नाहीत. शस्त्र अस्त्रांचा प्रयोग थांबेल. प्रेमाच्या व्यवहाराशिवाय काहीही पाहायला मिळणार नाही. प्रत्येकाच्या मताचा आदर केला जाईल. लोकशाही राज्यात लोकांच्या मताला किंमत असेल. प्रत्येकाला न्याय मिळेल. सर्वांसाठी कायदा एकच असेल.

आज आम्ही केवळ स्वतंत्र नाही, तर सभ्यही आहोत. कारण सभ्येतचं दुसरं नाव सौजन्य. आता आपल्याला आम्ही सभ्य आहोत हे सिद्ध केलं पाहिजे. प्रत्येकाने आज आम्ही या स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत अशी प्रतिज्ञा केली पाहिजे. आम्ही गौरवशाली परंपरा असलेल्या देशाची, मातेची संतानं आहोत. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या सौजन्यपूर्ण व्यवहाराने आणि सौजन्याने देशाची मान उंच केली पाहिजे.

Independence day Essay in Marathi 400 words

आज आम्ही स्वतंत्र आहोत पण ती स्वतंत्रता आमच्या अनुभवात, व्यवहारात देखील आली पाहिजे. आम्ही भारतीय आहोत. म्हणून भारताच्या कल्याणासाठी, देशहितासाठी झटले पाहिजे ही भावना आमच्या हृदयात निर्माण झाली पाहिजे. प्रांत, भाषा, धर्म यांच्या नावाखाली हिंसाचार होता कामा नये. इंग्रजी भाषेचे आक्रमण थांबवलं पाहिजे. उच्च-नीच असा भाव दूर झाला पाहिजे. आज देशात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांच्या उत्तरात आमचं स्वातंत्र्य लपलेलं आहे. जर प्रश्नांची उत्तरे होकारात्मक असतील तरच आम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो आहोत.

केवळ १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करून आपलं कर्तव्य संपत नाही. प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे. प्रत्येकानं प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. तरच आपलं स्वातंत्र्य आपण उपभोगू शकतो. आज आवश्यक वस्तू महागल्या आहेत. अन्नधान्याची टंचाई, व्यापाऱ्यांची फायदेखोरी या गोष्टींचा अंत झाला पाहिजे. जनतेचं पोट भरलं पाहिजे. जनता साक्षर झाली पाहिजे. निरक्षर नागरिक साक्षर झाल्याशिवाय त्यांच्यात स्वतंत्र नागरिकत्वाचा भाव निर्माण होणार नाही.

आज देशातील धर्म एकोप्याने नांदले पाहिजेत. आज कोणतं दृश्य दिसतंय.

मंदिर बाँटा, मस्जिद बाँटी बाँट दिया भगवान को धरती बाँटी, सागर बाँटा मत बाँटो इन्सान को।

तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्यदिन उपभोगायचा असेल तर देशातील प्रत्येक नागरिकानं जागरूकता, उदारता, सहनशीलता, शिस्त हे गुण अंगी बाणवलेच पाहिजेत. तर नि तरच आमचा स्वातंत्र्यदिन सुरक्षित राहील. अन्यथा पुन्हा परचक्राच्या भोवऱ्यात फिरणं नशिबी येईल.

Download File
Sharing Is Caring:

Leave a Comment