Amer Fort Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो महाराष्ट्र सह भारताच्या इतर राज्य मध्ये देखील किल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत असते. ज्यामध्ये राजस्थान देखील मागे नाही. राजस्थानचे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या जयपूर मध्ये देखील एक किल्ला असून, त्याचे नाव अमेर किल्ला आहे. अरवली टेकड्यांवर वसलेला हा किल्ला कलात्मक वास्तू कला व अतिशय समृद्ध भूतकाळ यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे.

अमेर किल्याची संपूर्ण माहिती Amer Fort Information In Marathi
दररोज या किल्ल्याला सुमारे ५००० पेक्षा अधिक पर्यटक भेट देत असतात, त्यामुळे या किल्ल्याची प्रसिद्धी तुमच्या लक्षात येऊ शकेल. या किल्ल्याचे बांधकाम पिवळ्या व गुलाबी वाळूने किंवा दगडाने केलेले आहे. आणि राजस्थान ची राजधानी असणाऱ्या जयपूर शहरापासून ११ किलोमीटरवर हा किल्ला वसलेला आहे. या ठिकाणी दररोज संध्याकाळ च्या वेळी पर्यटकांसाठी आकर्षक दृश्य साकारली जातात. तुम्ही राजस्थानला जात असाल, तर अमेर किल्ल्याला नक्कीच भेट द्या.
आजच्या भागामध्ये आपण या अमेर किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत…
नाव | अमेर |
प्रकार | किल्ला |
नाव मिळणे | भगवान शिवांकडून नाव |
स्थापना | १५९२ यावर्षी |
स्थापक | राजा मानसिंग |
पूर्वीचे नाव | कादिमी महल |
अमेर किल्ल्याबद्दल ऐतिहासिक माहिती:
मित्रांनो, मूलतः मीना या जमातीने आपली एक छोटी वस्ती या किल्ल्याच्या ठिकाणी स्थापन केली होती. पुढे या ठिकाणी किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. या किल्ल्याला आमेर हे नाव भगवान शिवांच्या नावावरून पडलेले आहे, मात्र स्थानिक लोक असे देखील सांगतात की अंबा या देवी दुर्गा यांच्या नावावरून देखील याचे नाव अंबर किंवा आमेर असे पडलेले आहे. या किल्ल्यावर पूर्वी अकराव्या शतकाच्या आसपास अतिशय धुरंदर कचवाहन यांची सत्ता होती.
पुढे १५९२ या वर्षी या किल्ल्याची स्थापना राजा मानसिंग यांनी केली, आणि त्यांच्या वारसांनी हा किल्ला सुमारे दीडशे वर्षांपर्यंत सांभाळाला. व त्याचा विस्तार करून, त्याचे पुनर्बांधकाम देखील केले. या किल्ल्याला कादीमी महल अथवा जुना राजवाडा म्हणून देखील ओळखले जाते. या किल्ल्यावर राजा मानसिंग यांच्याद्वारे त्यांची संरक्षक देवी असलेल्या शिलामाता यांचे देखील एक मंदिर उभारले आहे.
काळाच्या ओघामध्ये या किल्ल्यावरील अनेक इमारती पाडल्या गेल्या, व नवीन देखील बांधल्या गेले. मात्र किल्ल्याचे मुख्य स्वरूप मात्र आज देखील आपल्याला बघायला मिळते.
अमेर किल्ल्या मधील वस्तू कलेचे नमुने:
मित्रांनो, आमेर हा किल्ला संगमरवरी दगड व लाल वाळूच्या किंवा पिवळ्या दगडापासून तयार करण्यात आलेला आहे. त्याच्या बांधकामाची शैली ही राजपुताना प्रकारची असून, या किल्ल्याच्या आत मध्ये तुम्हाला शिकारीच्या प्रसंगांचे अनेक कलाकृती बघायला मिळतात.
या किल्ल्यामध्ये चार विभाग असून प्रत्येकाला एक स्वतंत्र प्रवेशद्वार आहे. आणि सोबत अतिशय मोठे प्रांगण देखील आहे. मात्र या किल्ल्याला सर्वांमिळून एक मुख्य दरवाजा देखील आहे. ज्याला सन गेट अथवा सुरजपूर या नावाने ओळखले जाते. कारण या दरवाजाचे तोंड उगवत्या सूर्याकडे आहे.
पायऱ्या चढून गेल्यानंतर तुम्हाला या किल्यांमधील जलेब चौक नावाचे एक अप्रतिम अंगण दिसेल.
अमेर किल्ल्याबद्दल रहस्यमय माहिती:
मित्रांनो, जयपुर किल्ल्याच्या सौंदर्याचे एक आभूषण असणारा हा किल्ला त्याच्या उत्कृष्ट रचनेसह विविध रहस्यांसाठी देखील ओळखला जातो.
राजा मानसिंग यांनी आपला सर्व खजिना या किल्ल्यामध्येच दडवून ठेवला आहे, असे सांगितले जाते. मात्र याबाबत अजून देखील काही पुरावा हाती लागलेला नाही. काही इतिहासकार असे सांगतात, की या किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम होण्यासाठी शंभर वर्षांचा कालावधी लागला होता. मात्र त्याबाबत देखील अजूनही काही पुरावे आढळत नाही. याशिवाय राजवाडा संदर्भात देखील अनेक अशा गोष्टी आहेत ज्या एक रहस्य बनून राहिलेल्या आहेत.
अमेर किल्ल्याच्या आसपास मिळणारे स्थानिक खाद्यपदार्थ:
मित्रांनो, राजस्थानला गेल्यानंतर तुम्हाला तेथील खाद्य संस्कृतीची ओळख देखील होत असते. त्या ठिकाणी शक्यतो थाळी प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. या थाली मध्ये डाळ बाटी, चुरमा, घेवर, इमरती यांसारख्या सुप्रसिद्ध पदार्थांशिवाय चाट चे प्रकार देखील आढळून येतात. येथील मूग डाळ हलवा देखील खूप प्रसिद्ध आहे. अनेक लोक येथे जेवणाचा मनमुराद आनंद लुटत असतात. या राजस्थानी जेवणामध्ये मोठ्या प्रमाणावर साजूक तुपाचा व गोड पदार्थांचा वापर केलेला असतो.
किल्ल्याला भेट देण्यासाठी ची उत्तम वेळ:
मित्रांनो, राजस्थान हे वाळवंटी प्रदेशात मोडत असल्यामुळे हिवाळा हा हंगाम येथे जाण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो. त्यामुळे ऑक्टोबर ते मार्च या महिन्यादरम्यान या किल्ल्याची भेट अतिशय चांगला अनुभव देत असते.
आमेर किल्ल्यावर जाताना:
मित्रांनो, अनेकांना या किल्ल्यावर जायचे असते. मात्र कसे जावे याबद्दल माहिती नसते. तुम्ही जयपुर मध्ये पोहोचल्यास उत्तर दिशेने ११ किलोमीटरचा प्रवास करून, तुम्ही या किल्ल्यावर पोहोचू शकता. तसेच येथील बसेस देखील या किल्ल्यावर जात असतात.
ज्या दर ३० मिनिटांनी सुटत असतात. तुम्हाला बसने जायचे नसेल, तर तुमच्यासाठी टॅक्सी किंवा कॅब चे पर्याय देखील उपलब्ध आहेत. जयपूर शहर हे रेल्वे मार्ग, रस्ते मार्ग, आणि हवाई मार्ग यांनी जोडलेले असल्यामुळे जयपूर मध्ये आल्यानंतर या किल्ल्यावर जाणे तुमच्यासाठी अतिशय सोपे असते.
निष्कर्ष:
मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये तुम्हाला अनेक किल्ले बघायला मिळतील, त्याचबरोबर भारतातल्या इतरही राज्यांमध्ये किल्ल्यांची संख्या आढळून येते. राजस्थान देखील किल्ल्यांच्या बाबतीत आघाडीवर असून, राजस्थानच्या राजधानीच्या शहरांमध्ये अर्थात जयपुर मध्ये अमेर नावाचा किल्ला वसलेला आहे.
आजच्या भागामध्ये आपण या अमीर किल्ल्याबद्दल माहिती बघितलेली आहे. यामध्ये तुम्हाला या किल्ल्याचा इतिहास, या किल्ल्यामध्ये असणाऱ्या विविध वस्तू, कला व त्याचे रहस्य, त्याचबरोबर असणाऱ्या रहस्यमय इमारती, जसे की दिवाण ए खास, त्याचबरोबर काचेपासून तयार केलेला वाडा, या किल्ल्याच्या आसपास मिळणारे स्थानिक खाद्यपदार्थ, या किल्ल्याला भेट देणे विषयीची उत्तम वेळ, किल्ल्यावर जाण्याचे मार्ग, इत्यादी माहिती बघितली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरली असेल अशी आशा आहे.
FAQ
अमीर हा किल्ला कोठे वसलेला आहे?
अमेर किल्ला कोणी व केव्हा बांधला होता?
अमेर किल्ल्यावर कोणते खास मंदिर आहे, व त्याच्या इतिहास काय आहे?
अमेर किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला कोणत्या नावाने ओळखले जाते?
अमेर किल्ला इतका प्रसिद्ध होण्यामागे काय कारण आहे?
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जयपूर शहरांमध्ये वसलेल्या अमीर या किल्ल्याबद्दल माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तर मग पटापट कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहा. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती अवश्य शेअर करा.
धन्यवाद…!