शिवाजी महाराज निबंध मराठी | Essay ON Shivaji Maharaj In Marathi

शिवरायांचा आठवावा प्रताप

“उजळेल दीप लक्ष लक्ष, आता होऊ चला दक्ष, जिकाया सारे गगन नवे, ‘शिवाजी महाराज’ आपले आशिष हवे।”

१९ फेब्रुवारी या दिवशी आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. कारण हा दिवस माझाच नाही तर सान्या शिवप्रेमीचा आनंदाचा दिवस. कारण या दिवशी हिंदुत्वाचा बुलंद आवाज करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती.

१९ फेब्रुवारी १६३० साली तो सोन्याचा दिवस उजाडला. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजू लागला. त्याच दिवशी जिजाबाईच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरीच्या किल्ल्यावरील शिवाईदेवीच्या नावावरून त्यांचे नाव ‘शिवाजी’ असे ठेवण्यात आले. शिवाजीची पहिली सात वर्षे खूप धावपळीत गेली. तरीही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. त्या रोज सायंकाळी सांजवात लावत. त्याला मायेने आपल्या जवळ घेऊन रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. त्याचप्रमाणे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना या थोर पुरुषांच्या गोष्टी फार आवडत. त्याचप्रमाणे : -संतांची चरित्रेही साधू खूप आवडत.

शिवाजीमहाराज, गरीब मावळ्यांच्या मुलांबरोबर खेळत. ते उच्च-नीच असा भेद कधीच मानत नसत. ते त्यांच्या पडक्याझडक्या झोपडीत जात. त्यांची असेल ती चटणी भाकर मायेने खात. मावळ्याची मुले जणू रानातली पाखरे ! ती मुळे पोपट, कोकिळा, वाघ यांची हुबेहूब आवाज काढत. मातीचे किल्ले रचणे हे त्याचे आवडते ‘छंद’!

शहाजीराजांची तीन-चार वर्षे खूप धावपळीत गेली. ते मुघलांशी झुंज देत. त्यात त्यांना यश आले. मग शहाजीराजांनी जिजाबाईंना व शिवाजीमहाराजांना ‘बंगळूरास नेले. त्यांनी शिवाजीच्या शिक्षणाची व्यवस्था केली. शिवाजीमहाराज ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘भगवदगीता’ वाचू लागले. त्याचप्रमाणे पावणे कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरविणे, तलवार चालविणे या गोष्टी शिकू लागले.

दादोजींच्याबरोबर शिवराय स्वतः जात. दादोजी शिवरायांच्या समक्ष लोकांचे तंटे सोडत, न्यायनिवाडा करत. लोकाना आपलेसे कसे करावे, न्याय कसा करावा. या गोष्टी शिवरायांना कळू लागल्या. राम, कृष्ण, भीम, अर्जुन यांनी केलेले पराक्रम शिवरायांना आठवू लागले. शिवरायांच्या ध्यानी मनी, स्वप्नी त्यांना सतत बाटू लागले, आपणही प्रजेलासुखी कराये ते जिजाईजब आऊन हितगुज करत. तेव्हा जिजाई म्हणत शिजवा भोसल्यांच्या पूर्वज श्रीरामाने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांच्या पूर्वज श्रीकृष्णाने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशांत तुझा जन्म झाला आहे. “अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. गरीब प्रजेला सुखी करू शकतील. जिजाईच्या उपदेशाने शिवरायांचे हृदय हुरुपाने भरून आले. गरूड प्रतापी शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय!!

शिवराय आपल्या मावळ्यांबरोबर हर हर महादेव अशी सिंहगर्जना करत ते एक-एक किल्ला जिंकू लागले. किल्ला ताब्यात असला म्हणजे आपल्याला आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता येते, असे त्यांना वाटे. “जय भवानी, जय शिवाजी!! असे म्हणत शिवराय व त्यांचे मावळे एकदा पुण्याच्या नेत्येला असलेल्या रायरेश्वराच्या शिवालयात गेले.

शिवराय म्हणाले, “गड्यांनो! आपला मार्ग ठरला. आपण सर्वांनी स्वातंत्र्यासाठी झटायचे, सर्वांनी आपले प्राण पणाला लावून झटायचे हे आपले ध्येय आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे. त्यासाठी आता आम्हाला परक्यांची गुलामी नको. उठा आता आम्ही या रायरेश्वराला साक्षी मानून प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्वजण हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा.” असे म्हणून आम्ही आमचे प्राण या स्वराज्यासाठी सर्वस्वपणे वाहणार! तेव्हा हा राजा आपल्यासाठी खूप काही करून गेला. आपणही त्यांच्यासारखं कार्य करावं व प्रजेला सुखी करावं. मला त्यांचा सार्थ अभिमान !

“संघटित सामर्थ्यावरती लोळविले दुश्मन

राज्य हिंदवी स्थापन केले, ध्वज भगवा उभारून !!

Also read:-