जीवनात संयम हवाच | Life requires rest

जीवनात संयम हवाच Life requires rest

लहानपणी आजीबरोबर देवळात जायचो. देवळातील कासव पाहिल्यावर माझी जिज्ञासा जागी व्हायची. मी आजीला विचारायचो, “हे कासव ग कशाला?” “अरे, हे कासव म्हणजे संयमाचं प्रतीक.” मी मोठा झाल्यावर त्याचा विचार करू लागलो.

खरंच जीवनात या संयमाचं महत्त्व आहेच. म्हणूनच भारतीय संस्कृतीनं संयमाला महत्त्व दिलं. जीवनात उत्कृष्ट कर्म घडावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असली पाहिजे. पण त्यासाठी संयम हवा, संयमात फार मोठे सामर्थ्य सामावले आहे. आपण नेहमी बघतो, की मितभाषी, मितआहारी मनुष्य प्रसन्न असतो. आणि तो इतरांना देखील प्रसन्न ठेवतो. लोभ हा नेहमीच माणसाचा नाश करतो. लोभी वृत्तीपासून दूर राहायचं असेल तर संयम बाळगलाच पाहिजे.

आपण सृष्टीचे अवलोकन केलं तर काय समजतं? सृष्टी संयमामुळे सुंदर दिसते. भव्य दिसते. झाडाचंच उदाहरण घ्या ना. वृक्ष मुळांनी बांधलेला आहे. म्हणूनच त्याला फुलं-फळं येतात. त्याला विशालता प्राप्त होते.

नदीचं उदाहरण घ्या. तिला तीराचं बंधन असतं. हे बंधन आहे म्हणूनच तिला प्रवाह आहे, गती आहे. खोली आहे, गंभीरता आहे. संयमामुळेच ती स्वतःच्या जीवनाने इतरांचे जीवन फुलवण्याचे काम करते. ती जाता जाता जमीन सुपीक करते. अन विशाल अशा सागराला जाऊन मिळते.

Life requires rest

वाफ आपण दररोज बघतो. बंधनयुक्त वाफेत प्रचंड शक्ती असते, पण

स्वैराचारी वाफ मात्र दुबळी असते. बंधनयुक्त संयमित वाफ मोठमोठी यंत्रे

चालविते.

म्हणूनच मित्रांनो, आपणही ‘संयम’ हा मंत्र मानून तसं आचरण केलं पाहिजे. उदरभरणासाठी अन्नाचे सेवन करावे. पण पदार्थ आवडला म्हणून त्याचे अतिसेवन टाळले पाहिजे. नाहीतर त्याचे परिणाम तुम्ही जाणताच.

जगात जेवढे म्हणून थोर पुरुष होऊन गेले ते सर्व संयमी होते. त्यांची राहणी साधी, पण विचारसरणी उच्च होती. संयमामुळे आपण आपल्या क्रोधावर ताबा मिळवू शकतो. आणि त्यामुळे कलह टाळू शकतो. कलह नाहीसा झाला तर शांतीचं साम्राज्य प्रस्थापित व्हायला वेळ लागणार नाही. आजचं आपल्या देशाचं चित्र पाहा. अतिरेकी संघटनांनी अराजक माजवलंय. पंजाब, बिहार अशांत. सर्वत्र हिंसाचार त्यामुळे भयभीत वातावरण. एकही दिवस असा जात नाही की, त्या दिवशी वर्तमानपत्रात खून, मारामारी, दरोडा. अत्याचार, आत्महत्या यांची बातमी नाही. याचं कारण अगदी स्पष्ट आहे की, आज आमच्यातील संयम ढळत चाललाय. पशुवृत्ती वाढत चाललीय. मग आम्ही बुद्धिमान आहोत असा टेंभा मिरवण्याचा आम्हांला काय अधिकार आहे? त्यातून माणसं एकमेकांपासून दुरावत चालली आहेत. अविचारी असणं याचाच अर्थ संयमाचा अभाव. म्हणूनच कॉपी करणं, शिस्त बिघडवणं, अभ्यास न करणं, खोटं बोलणं यात संयमाचा अभाव दिसतो.

गांधीजी, विवेकानंद, सर्व संतमंडळी ही विलक्षण संयमी होती. त्याचमुळे ते क्रोधावर विजय मिळवू शकले. ज्यांनी ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांना त्यांनी क्षमाच केली. संयमी मनुष्यच क्षमाशील असतो.

तुकाराम म्हणतात, ‘क्षमाशास्त्र जया नराचिया हाती। दुष्ट तयाप्रति काय करी। म्हणजेच क्षमा ही दुष्टालाही सुष्ट बनवू शकते. काहींना संयम म्हणजे शरणता वाटते. नेभळटपणा वाटतो. पण ही चुकीची समजूत आहे. संयम वाटतो तेवढा सोपा नाही. क्षणाक्षणाला आमचे निश्चय ढळतात. मोहाचे क्षण येतात. यावर विजय मिळविणे म्हणजे मनावर विलक्षण नियंत्रण हवे. प्रयत्नाने साध्य होईल. ते

“सामर्थ्य आहे, संयमाचे, जो जो पाळील तयाचे परंतु तेथे विवेकाचे अधिष्ठान पाहिजे”

Download File
Sharing Is Caring:

Leave a Comment